Posts

Showing posts from November, 2023

कराडच्या विमानतळ विस्तारीकरणास 221.51 कोटींचा निधी मंजूर...

Image
कराडच्या विमानतळ विस्तारीकरणास 221.51 कोटींचा निधी मंजूर... माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांनी पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केल्याने शासनाकडून निधी मंजूर... कराड दि.29-येथील एम ए डी सी अंतर्गत असणाऱ्या विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी राज्य सरकारकडून 221.51 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून त्यास प्रशासकीय वित्तीय मान्यता दिली असल्याचा शासन आदेश आज प्रसिद्ध झाला आहे. पावसाळी अधिवेशनात माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांनी विमानतळ विस्तारिकरणांबाबतचा प्रश्न सभागृहात उपस्थित केला होता. त्यावेळी आ. चव्हाण म्हणाले होते कि, महाराष्ट्रातील तालुका ठिकाणचं पहिलं विमानतळ कराड येथे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी सुरू केलं होतं कारण कराड हे पश्चिम महाराष्ट्रातील मध्यवर्ती ठिकाण आहे.  कराड विमानतळ विस्तारीकरणासाठी तेथील ग्रामस्थांचा विरोध नसून त्याबाबत योग्य तो निधी त्यांना हवा आहे. यासाठी राज्य शासनाकडून त्वरित तोडगा काढण्याची अपेक्षा आहे. या आ. चव्हाण यांच्या मागणीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढील तीन महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक ...

मुंढे प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांसाठी लवकरच उपमुख्यमंत्र्यांना भेटणार : डॉ. अतुल भोसले...

Image
 मुंढे प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांसाठी लवकरच उपमुख्यमंत्र्यांना भेटणार : डॉ. अतुल भोसले... कराड, दि .29: मुंढे (ता. कराड) येथील महापारेषण प्रकल्पात बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेण्यात आले आहे. पण त्यांना अद्याप सेवेत कायम करण्यात आलेले नाही. या प्रकल्पग्रस्तांना सेवेत कायम करावे, यासाठी त्यांच्या शिष्टमंडळासमवेत लवकरच उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांना भेटण्याची ग्वाही भारतीय जनता पार्टीचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले यांनी दिली.  कराड येथील शासकीय विश्रामगृहात मुंढे येथील प्रकल्पग्रस्तांची बैठक डॉ. अतुल भोसले यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी प्रकल्पग्रस्तांनी आपली कैफीयत डॉ. भोसले यांच्यासमोर मांडली. मुंढे येथील महापारेषणच्या प्रकल्पासाठी येथील नागरिकांच्या जमिनींचे ४ वेळा अधिग्रहण करण्यात आले. त्यावेळी प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यानुसार २०१६ साली ३५ जणांना नोकरीत घेण्यात आले. प्रशिक्षणार्थी म्हणून नोकरीस लागलेल्या या प्रकल्पग्रस्तांना गेली ७ वर्षे नोकरीत कायमच करण्यात आलेले नाही. याप्रश्नी शासन...

मराठी पाटया लावा अन्यथा खळखटयाक;मनसेच्या वतीने तहसिलदारांना निवेदन...

Image
मराठी पाटया लावा अन्यथा खळखटयाक;मनसेच्या वतीने तहसिलदारांना निवेदन... कराड दि.29-सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही कराड शहर व तालुक्यातील अनेक दुकानांना इंग्रजी भाषेत पाटया आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्ल्घन करणाऱया संबधित विभागाच्या अधिकाऱयांवर कारवाई करावी तसेच आठ दिवसांत इंग्रजी पाटया काढुन मराठी पाटया लावाव्यात अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा ईशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे. याबाबत तहसिलदार विजय पवार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी, जिल्हाअध्यक्ष ऍड.विकास पवार, तालुका अध्यक्ष दादासाहेब शिंगण, शहरअध्यक्ष सागर बर्गे, विद्यार्थी सेनेचे जिल्हाअध्यक्ष विनायक भोसले, पै.सतिश यादव, नितीन महाडीक, हणमंत भिंगारदेवे, नितीन शिंदे, अमोल सकट, विश्वास संकपाळ केतन जाधव,शंभूराजे भिसे व कार्यकर्ते उपस्थित होते. वास्तवीक सक्तीपेक्षा महाराष्ट्रातील प्रत्येकाला मराठी भाषेविषयी आदर असणे गरजेचे आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही काही व्यवसाईक दुकानाला मराठीत पाटी लवत नाही. सर्वोच्च न्यायालयाने मराठी पाटया लावण्यासाठी 25 नाहेंबर पर्यंत मुदत दिली होती. मात्र कराड शह...

ढासळलेला चेंबर बनतोय धोकादायक; नगरपरिषदेकडून दुरुस्तीस प्रारंभ...

Image
ढासळलेला चेंबर बनतोय धोकादायक; नगरपरिषदेकडून दखल... कराड दि. 28-येथील सोमवार पेठेत शिवाजी क्रीडा मंडळाच्या प्रवेशद्वारातच असलेला ड्रेनेजचा मोठा चेंबर ढासळल्याने मैदानावर तो धोकादायक बनला आहे. चेंबर पडून दोन दिवस झाले असून नगरपरिषदने ढासळलेल्या चेंबरची तातडीने दुरुस्ती सुरू केली आहे. त्या परिसरातील नागरिकांनी चेंबर दुरुस्त करावा अशी मागणी केली होती. या ठिकाणी अनेक मुले या मैदानावर खेळत असतात त्यामुळे एखादी दुर्घटना घडू शकते. शिवाजी क्रीडा मंडळाच्या गेट समोरच मैदानावर सुमारे पन्नास वर्षांपूर्वीचा हा चेंबर आहे. जमिनीपासून साधारण पंचवीस फुटावून अधिक खोल असणारा हा चेंबर आहे. नगरपरिषद, मंडई परिसर, कन्या शाळा अशा मोठ्या परिसरातून या ठिकाणी चेंबर मध्ये असणाऱ्या मोठ्या सिमेंटच्या पाईप मधून सांडपाणी वाहत असते. या ठिकाणी विटांचा बांधकाम असलेला चौकोनी चेंबर दोन दिवसापूर्वी अचानक ढासळला. दरम्यान ढासळलेल्या चेंबरमुळे परिसरात मोठा खड्डा पडला असून मैदानावर संबंधित जागा धोकादायक बनली आहे. नगर परिषदेच्या संबंधित विभागाने याची तातडीने दखल घेऊन दुरुस्ती करण्यास प्रारंभ केला आहे. या मैदानावर सतत मुले खेळत ...

'कृष्णा' ही नर्सिंगचे सर्वोत्तम शिक्षण देणारी संस्था : डॉ. नीलिमा सोनवणे...

Image
'कृष्णा' ही नर्सिंगचे सर्वोत्तम शिक्षण देणारी संस्था : डॉ. नीलिमा सोनवणे... कृष्णा नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा शपथग्रहण सोहळा उत्साहात... कराड, दि .27: कृष्णा नर्सिंग महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी- विद्यार्थीनी देश-विदेशात वैद्यकीय क्षेत्रासह शासकीय व उच्च शैक्षणिक क्षेत्रात मोठ्या संख्येने कार्यरत आहेत. ‘कृष्णा’ ही नर्सिंगचे सर्वोत्तम शिक्षण देणारी संस्था आहे, असे गौरवोद्गार महाराष्ट्र राज्य सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अतिरिक्त संचालक डॉ. नीलिमा सोनवणे यांनी काढले. कृष्णा विश्व विद्यापीठाच्या नर्सिंग अधिविभागातील विद्यार्थ्यांच्या शपथग्रहण सोहळ्यात प्रमुख पाहुण्या म्हणूत त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे होते. व्यासपीठावर विद्यापीठाचे कार्यकारी संचालक पी. डी. जॉन, कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, मेडिकल ॲडमिनिस्ट्रेटर डॉ. आर. जी. नानिवडेकर, ‘नर्सिंग’च्या अधिष्ठाता डॉ. वैशाली मोहिते, चीफ नर्सिंग ऑफिसर सौ. रोहिणी बाबर उपस्थित होत्या.  यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. तस...

शेतकर्‍यांच्या मालास ही मॉलमध्ये विक्रीसाठी जागा उपलब्ध करुन देणार; पालकमंत्री शंभूराज देसाई...

Image
शेतकर्‍यांच्या मालास ही मॉलमध्ये विक्रीसाठी जागा उपलब्ध करुन देणार; पालकमंत्री शंभूराज देसाई... कराड दि. 25 - नवी मुंबई, ठाणे, वाशी आदी ठिकाणी मोठमोठे मॉल आहेत. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद माझ्याकडेच असल्यामुळे सातारा जिल्ह्यातील महिला बचत गटांना सवलतीच्या दरात स्टॉल उपलब्ध करून देण्याचा निर्णय ठाणे जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला आहे. त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील शेतकर्‍यांची उत्पादनेही ठेवण्यात येतील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. येथील शेती उत्पन्न्न बाजार समितीच्या आवारात भरविण्यात आलेल्या आठराव्या राज्यस्तरीय स्वर्गीय यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याहस्ते उद्घाटन झाले. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, आ. पृथ्वीराज चव्हाण, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख, रयत साखर कारखानाचे अध्यक्ष अ‍ॅड.उदयसिंह पाटील, शेती उत्पन्न बाजार समिती कराडचे सभापती विजय कदम, उपसभापती संभाजीराव चव्हाण, जिल्हा मध्यवर्ती बँके...

कृष्णा विश्व विद्यापीठात राष्ट्रीय दंतविज्ञान विद्यार्थी परिषदेला उत्साहात प्रारंभ...

Image
कृष्णा विश्व विद्यापीठात राष्ट्रीय दंतविज्ञान विद्यार्थी परिषदेला उत्साहात प्रारंभ... देशभरातील ८०० हून अधिक विद्यार्थी - संशोधकांचा सहभाग... कराड दि.24-: कृष्णा विश्व विद्यापीठाच्या दंतविज्ञान अधिविभागातर्फे आयोजित २ ऱ्या राष्ट्रीय दंतविज्ञान विद्यार्थी परिषदेला उत्साहात प्रारंभ झाला. इंडियन डेंटल असोसिएशनच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या परिषदेत देशभरातील ८०० हून अधिक विद्यार्थी – संशोधक सहभागी झाले आहेत.  कृष्णा विश्व विद्यापीठाच्या कुलपतींचे प्रधान सल्लागार डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. व्यासपीठावर कुलगुरु डॉ. नीलम मिश्रा, कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे, महाराष्ट्र डेंटल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय जोशी, डॉ. बजरंग शिंदे, डॉ. मानसिंग पवार, ‘दंतविज्ञान’चे अधिष्ठाता डॉ. शशिकिरण एन. डी. उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना डॉ. वेदप्रकाश मिश्रा म्हणाले, आज जगभरात दंतचिकित्सकांना मोठी मागणी आहे. अशावेळी दंतचिकित्सकांनी सातत्याने आपल्यातील कौशल्ये विकसित करणे व ज्ञानकक्षा वृद्धींगत करणे गरजेचे आहे. जगात सर्वश्रेष्ठ असे दंतवैद्यकीय मनुष्यबळ निर्मा...

कोयना धरणात पाणी कमी असल्यामुळे कमतरतेच्या अनुषंगाने सिंचन आणि विज निर्मितीच्या पाणी वापरामध्ये कपात प्रस्तावित.

Image
कोयना धरणात पाणी कमी असल्यामुळे कमतरतेच्या अनुषंगाने सिंचन आणि विज निर्मितीच्या पाणी वापरामध्ये कपात प्रस्तावित. .. सातारा दि. 22 : चालु वर्षी अल्प पर्जन्यमानामुळे धरणामध्ये कमी प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध झाल्याने सिंचन आणि वीज निर्मितीच्या नियोजित पाणी वापरामध्ये कपात प्रस्तावित करण्यात आली आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे. कोयना धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता 105.25 टी.एम.सी. आहे. चालू वर्षी पावसाळी हंगमापूर्वी दि. 1 जून 2023 रोजी धरणामध्ये एकूण 17.64 टी.एम.सी. पाणी साठा होता. मागील वर्षीच्या तुलनेत पर्जन्यमानात 440 मि.मी. व पाणी आवाकमध्ये 39.71 टी.एम.सी. इतकी घट झाली आहे.दि. 1 जून ते 14 ऑक्टोंबर 2023 या दरम्यान सिंचन व वीज निर्मितीसाठी अनुक्रमे 5.46 टी.एम.सी. व 23.03 टी.एम.सी. वापर  झाला आहे. खरीप हंगाम सिंचन पाणी वापर...  कोयना धरणामधून सिंचनासाठी 42.70 टी.एम.सी. वार्षिक पाणी वापराचे प्रकल्पीय नियोजन आहे. त्यापैकी दि. 1 जुलै ते 14 ऑक्टोंबर 2023 या खरीप हंगामामध्ये 4.39 टी.एम.सी. पाणीवापराचे प्रकल्पीय नियोजन आहे. कोयना प्रकल्पांतर्गत सिंचीत होणारे बहुतांशी सिंचन क्षेत...

कृष्णा फार्मसी इन्स्टिट्यूटमध्ये ‘नेटवर्क फर्माकॉलॉजी’वर कार्यशाळा उत्साहात...

Image
कृष्णा फार्मसी इन्स्टिट्यूटमध्ये ‘नेटवर्क फर्माकॉलॉजी’ वर कार्यशाळा उत्साहात... कराड दि.22-येथील कृष्णा विश्व विद्यापीठाच्या कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी अधिविभागाच्यावतीने ‘नेटवर्क फर्माकॉलॉजी : अनफोल्डिंग मल्टिट्यूड ऑफ ड्रग टार्गेटस्’ या विषयावरील दोनदिवसीय कार्यशाळा नुकतीच उत्साहात पार पडली. कार्यशाळेत महाराष्ट्रासह कर्नाटक व गोवा अशा विविध राज्यांतील सुमारे ८७ प्राध्यापक व विद्यार्थी सहभागी झाले होते. कृष्णा विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले, कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांनी नेहमीच संशोधनाला महत्व दिले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठात साततत्याने विविध विषयांवरील अभ्यासपूर्ण कार्यशाळा व चर्चासत्रे संपन्न होत असतात. ‘नेटवर्क फर्माकोलॉजी’ ही आजच्या वैज्ञानिक युगातील एक अत्यंत महत्त्वाची विद्या आहे. औषधांच्या प्रभावाचे सर्व संभाव्य परिणाम समजून देणारे तंत्रज्ञान अवगत करणे, हा या कार्यशाळेचा उद्देश आहे. औषधनिर्माणशास्त्र विषयात उच्चशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही का...

मलकापूर नळ पाणीपुरवठा योजनेच्या विस्तारासाठी 18.61 कोटीची मंजुरी...

Image
मलकापूर नळ पाणीपुरवठा योजनेच्या विस्तारासाठी 18.61 कोटीची मंजुरी... कराड दि.16- माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण (बाबा) यांच्या शिफारशीने मलकापूरच्या २४x७ नळ पाणीपुरवठा योजनेच्या विस्तार व बळकटीकरण करण्या साठीच्या 18.61 कोटी रुपयांच्या प्रस्तावास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली असल्याची माहिती आज मलकापूर नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी दिली. मलकापूर नगरपरिषद २४x७ नळपाणीपुरवठा योजना स्व.भास्करराव शिंदे यांचे संकल्पनेतून साकारलेली योजना तत्कालिन ग्रामपंचायत, नगरपंचायत व सध्या नगरपरिषदेने सन २००९ पासून अखंडितपणे कार्यरत ठेवली आहे. या योजनेच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना प्रतिमाणसी ११० लिटर या प्रमाणे २४ तास पाणीपुरवठा केला जात आहे. या योजनेस सन २०११ सालचे नॅशनल अर्बन वॉटर अंबाई तत्कालिन केंद्रीय मंत्री ना. कमलनाथ यांचे हस्ते व पंतप्रधान पुरस्कार मनमोहन सिंह यांचे हस्ते वितरण करून सन्मानित करण्यात आले असुन नुकतेच दिनांक २७/०६/२०२३ रोजी नवी दिल्ली येथे उत्कृष्ठ पाणी वितरण व व्यवस्थापन BEST LOCAL URBAN BODY अंतर्गत देशामधील तृतीय क्रमांकाचे राष्ट्रीय पार...

कराड- मनोज जरांगे-पाटील यांच्या सभेसाठी जोरदार तयारी...

Image
  कराड- मनोज जरांगे-पाटील यांच्या सभेसाठी जोरदार तयारी...  कराड दि.13- मराठा समाजाचे क्रांतीसुर्य मनोज जरांगे-पाटील यांची जाहीर सभा कराड येथे १७ नोव्हेंबरला छत्रपती शिवाजी स्टेडीयमवर सायंकाळी सात वाजता सभा होणार आहे. त्यासंदर्भात पोलिस प्रशासन आणि मराठा समन्वयक यांची बैठक झाली. त्यानुसार सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात येत असुन सभेची तयारीही पुर्णत्वाकडे आली आहे.  मराठा समाजातील आबावलवृध्दांशी संवाद साधण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे कराडला येत आहेत. त्यांच्या सभेसाठी कराड, पाटण, सातारा, खटाव, कडेगाव, शिराळा, तालुक्यातील मराठा बांधव मोठ्या संख्येने येणार आहेत. त्याचा विचार करुन नुकतीच पोलिस उपाधिक्षक अमोल ठाकुर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप सुर्यवंशी, वाहतुक विभागाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक चेतन मछले यांच्याशी मराठा समन्वयकांची बैठक झाली. त्यात सुरक्षा, पार्किंग व अन्य वाहतुकीच्या विषयासंदर्भात चर्चा झाली. सभेसाठी गावोगावी जनजागृतीसाठी बैठका घेण्यात येत आहेत.  ................. सभेसाठी असणारी पार्किंग व्यवस्था सुरक्षेच्या दृष्टीने साई मंदिर ते छत्रपती शिवाजी महाराज स्टेडि...

कराडला स्व. यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशु-पक्षी प्रदर्शनाचे 24 ते 28 दरम्यान आयोजन...

Image
  कराड-कृषी प्रदर्शनाची माहिती पत्रकार परिषदेत देताना बाजार समितीचे सभापती विजयकुमार कदम... कराडला स्व. यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशु-पक्षी प्रदर्शनाचे 24 ते 28 दरम्यान आयोजन... कराड दि.13- महाराष्ट्र राज्याच्या कृषी औद्योगिक क्रांतीचे प्रणेते स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिवर्षा प्रमाणे यावर्षीही कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या वतीने दिनांक २४ ते २८ नोव्हेंबर २०२३ च्या दरम्यान १८ वे राज्यस्तरीय स्व. यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशु-पक्षी प्रदर्शन भरविले जाणार असल्याची माहिती शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजयकुमार कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली. कराड येथे गेली १८ वर्षे लोकनेते स्व. विलासराव पाटील-उंडाळकर यांचे संकल्पनेतून कृषी प्रदर्शन भरविले जाते. यावर्षी ही मागील परंपरा जोपासत शेती उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाने प्रदर्शन भरविणेची प्रक्रीया सुरु केली आहे. हे प्रदर्शन स्वा. सै. शामराव पाटील फळे व भाजीपाला मार्केटच्या आवारात भरत आहे. प्रदर्शनात ४०० पेक्षा अधिक विविध प्रकारचे स्टॉल सहभागी होणार असून यातील १०० स्टॉल शेतक-यांच्या कृषी माल ...

कराड तहसील कार्यालयात कुणबी अभिलेख कक्ष स्थापन...

Image
कराड तहसील कार्यालयात कुणबी अभिलेख कक्ष स्थापन... कराड दि.9-कराड तहसील कार्यालयाकडून महसुली अभिलेखे खासरापत्रक, पाहणीपत्रक, क- पत्रक, कुळ नोंद वही, नागरिकांचे राष्ट्रीय रजिस्टर, हक्क नोंद पत्रक, ७/१२ उतारा, जन्म नोंदणी रजिस्टर संबंधित अभिलेखांमध्ये कुणबी जात नमूद असलेले अभिलेख उपलब्ध करून देण्याबाबतची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.. कुणबी जात नमूद असलेल्या अभिलेखांची माहिती सादर करण्याच्या सूचना पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, गट शिक्षण अधिकारी, उपअधीक्षक भूमी अभिलेख, मुख्याधिकारी नगरपालिका कराड, दुय्यम निबंधक कार्यालय कराड, वरिष्ठ पोलिस निरिक्षक कराड शहर, पोलिस निरीक्षक कराड तालुका, सहाय्यक पोलीस निरिक्षक उंब्रज, तळबीड व मसूर, या कार्यालयांना दिल्या आहेत. महसूल विभागामार्फत खासरापत्रक, पाहणी पत्रक, क- पत्रक, कुळ नोंदवही, नागरिकांचे राष्ट्रीय रजिस्टर सन 1951, नमुना नं. 1 हक्क नोंदपत्रक, नमुनानं. 2 हक्क नोंद पत्रक, 7/12 उतारा,जन्म मृत्यु रजिस्टर संबंधिांचे अभिलेखे (गाव नमुना नं. 14) इत्यादी नोंदी शोधण्याचे काम चालू आहे. कराड तालुक्यातील नागरिकांनी आपल्याजवळील कुणबी जात नमूद असलेले कागद...

दिवाळी सणानिमित्त शहरातील पाणीपुरवठा वेळेत बदल...

Image
  दिवाळी सणानिमित्त शहरातील पाणीपुरवठा वेळेत बदल... दिवाळी सणानिमित्त कराड शहरातील पाणीपुरवठा वेळेत बदल करण्यात आल्याची माहिती नगरपालिकेच्या वतीने देण्यात आली आहे. रविवार 12 नोव्हेंबर, मंगळवार 14 नोव्हेंबर व बुधवार 15 नोव्हेंबर या तीन दिवशी सकाळच्या पाणीपुरवठा वेळेत बदल करण्यात आला आहे. सोमवार पेठ येथील पाण्याच्या टाकीतून सकाळी साडेपाच ते साडेसहा या वेळेत पाणीपुरवठा होईल तर सूर्यवंशी मळा येथील पाण्याच्या टाकीतून नेहमीप्रमाणे पाणीपुरवठा होणार आहे. रुक्मिणी नगर येथील पाण्याचे टाकीतून सकाळी सहा ते सात या वेळेत तर गजानन हाउसिंग सोसायटीतील पाण्याच्या टाकीतून नेहमीप्रमाणे पाणीपुरवठा होणार आहे. रविवार पेठ येथील पाण्याच्या टाकीतून सकाळी सहा ते सात, टाऊन हॉल येथील पाण्याच्या टाकीतून सकाळी सहा ते सात तर मार्केट यार्ड येथील पाण्याची टाकीतून नेहमीप्रमाणे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. मंगळवार दिनांक 14 नोव्हेंबर पासून सायंकाळचा पाणीपुरवठा नेहमीप्रमाणे करण्यात येणार आहे.

माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून कराड तालुक्यासाठी ५ कोटींचा निधी मंजूर...

Image
  माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून कराड तालुक्यासाठी ५ कोटींचा निधी मंजूर... कराड दि.8- माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून 2515 इतर ग्रामीण विकास कार्यक्रम अंतर्गत कराड तालुक्यातील 52 गावांमध्ये 5 कोटींचा भरघोस निधी मंजूर झाला असून या माध्यमातून विविध विकासकामे केली जाणार आहेत. यामध्ये कराड दक्षिण साठी 3 कोटी 87 लाख रुपयांचा तर कराड उत्तर साठी 1 कोटी 13 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.  कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील गावांमध्ये विविध विकासकामांसाठी 3 कोटी 87 लाख रुपयांचा निधी मंजूर असून यामध्ये विंग येथील विंग पासून शिंदेवाडीकडे घोरपडे वस्तीतून जाणारा रस्ता सुधारणा करणेसाठी रु. 15 लाख, किरपे येथील एस. टी. स्टँड ते छ. शिवाजी महाराज चौकापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण करणेसाठी रु. 10 लाख, सैदापूर येथील अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणेसाठी रु. 10 लाख, खोडशी येथील निनाई मंदिर ते कृष्णा डेअरी पर्यंतचा रस्ता डांबरीकरण करणेसाठी रु. 10 लाख, वारुंजी येथील नामदेव काशिनाथ पाटील यांचे घर ते गावविहीरी पर्यंत आर.सी.सी. गटर करणेसाठी रु. 15 लाख, येरव...

कोयत्याने वार करणाऱ्या दोन सराईत गुंड कराड डीबी पथकाकडून जेरबंद...

Image
  कोयत्याने वार करुन गंभीर जखमी करण्याचा प्रयत्न करुन सोनसाखळी जबरीने चोरणा-या सराईत गुंडांना शिताफीने जेरबंद, हत्यार व रोकड असा मुद्देमाल हस्तगत. कराड शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेची उल्लेखनीय कामगिरी.... कराड दि.7-कराड शहर पोलीस ठाणे हद्दीत कराड शहरातील गुन्हेगारीचे कंबरडे मोडण्यासाठी शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेने कंबर कसली असुन गुन्हेगारांना वठणीवर आणण्याचे व गुन्हेगारी समुळ उच्चाटन करण्याचे कार्य शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी प्रदिप सुर्यवंशी, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रमुख पो. उपनिरीक्षक राजु डांगे व त्यांचे पोलीस टीमने स्विकारले असुन त्यादृष्टीने वाटचाल सुरु केलेली आहे. गोविंद बाबुराव पवार, रा. मलकापुर ता. कराड हे दि. 19.10.2023 रोजी रात्रीचे जेवणानंतर फेर फटका मारत असताना मलकापुर ता. कराड गांवचे हद्दीत हॉटेल सफायर जवळ रोडवर अनोळखी इसमाने आडवुन हातातील कोयत्याने वार करुन गंभीर जखमी करण्याचा प्रयत्नं करीत गळयातील सुमारे ५ तोळे सोन्याची चैन जबरीने तोडुन चोरुन नेत असताना गोविंद पवार यांनी आरडाओरडा करून चैन हाताने धरलेने सुमारे ३ तोळे ३ ग्रॅम व...

तडीपार गुंडास कराड शहर पोलीसांनी पाठलाग करुन ठोकल्या बेड्या...

Image
  तडीपार गुंडास कराड शहर पोलीसांनी पाठलाग करुन ठोकल्या बेड्या... कराड दि.7-कराड शहरातून तडीपार असूनही शहरात येऊन दहशत माजवणाऱ्या तडीपार गुंड अविनाश प्रताप काटे याला गुन्हे प्रकटीकरण शाखेने पाठलाग करून बेडया ठोकल्या आहेत. कराड शहर पोलीस स्टेशन मधील गुन्हे प्रकटीकरण शाखेने शनिवारी रात्री ही कारवाई केली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कराड शहर पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार अविनाश प्रताप काटे व त्याचे इतर साथिदार यांना कराड शहर पोलीसांनी 2 वर्षासाठी हद्दपार केले असुन देखील अविनाश हा कराड शहर पोलीस ठाणे हद्दीतील कराड बसस्थानक येथे येवुन दहशत माजवत असल्याची बातमी कराड शहर पोलीस ठाणेचे पोलीस उप निरिक्षक आर.एल.डांगे यांना मिळाली होती. पोलीस उप निरिक्षक डांगे हे तात्काळ डी. बी. पथकासह त्या ठिकाणी पोहचले व तडीपार गुंड अविनाश प्रताप काटे याचा पाठलाग करुन त्यास ताब्यात घेतले. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख,अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरिक्षक ...

राज्य उत्पादन शुल्कच्या कराड सातारा भरारी पथकाकडून बनावट दारु तयार करणा-या टोळीवर धडक कारवाई; कराड तालुक्यात तीन ठिकाणी धाडी...

Image
  राज्य उत्पादन शुल्कच्या कराड सातारा भरारी पथकाकडून बनावट दारु तयार करणा-या टोळीवर धडक कारवाई; कराड तालुक्यात तीन ठिकाणी धाडी... कराड दि. 6 राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सातारा व कराड कार्यालयाच्या भरारी पथकाने कराड तालुक्यात तीन ठिकाणी धाडी टाकून बनावट दारू तयार करणाऱ्या अड्ड्यावर धडक कारवाई केली आहे. यामध्ये पाच आरोपीसह मोठा मुद्देमाल तसेच बनावट दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे. दरम्यान तालुक्यात अशा पद्धतीने बनवतात तयार करणाऱ्या अड्ड्यावर छापा टाकल्याने कराड तालुक्यात खळबळ माजली आहे. ही बनावट दारू नेमकी कुठल्या ठिकाणी विकली जात होती याची आता उत्सुकता लागली आहे. दरम्यान कराड शहर व परिसरात ही अनेक ठिकाणी मोठमोठ्या ब्रँडच्या नावाखाली बनावट दारू विकली जात असल्याची गेली काही दिवसापासून चर्चा सुरू आहे. शहरासह परिसरात असणाऱ्या वाईन शॉप व बारमध्ये सुद्धा राज्य उत्पादन शुल्क विभागाने विकली जाणाऱ्या दारूच्या विविध कंपन्यांची तपासणी करणे गरजेचे आहे. अनेक ठिकाणी बनावट लेबल लावून जुन्या बाटलीत नवीन बनावट दारू विकली जात असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. या पार...

कराडात 'आनंदाचा शिधा' वितरित करण्यास प्रारंभ...

Image
कराड येथील खरेदी विक्री संघाच्या स्वस्त धान्य दुकानात आनंदाचा शिधा आज वितरित करण्यात आला... कराडात 'आनंदाचा शिधा' वितरित करण्यास प्रारंभ... कराड दि.6 (प्रतिनिधी) कराड शहरात सुमारे 9 हजार 828 कुटुंबांना ‘आनंदाचा शिधा’ वितरीत करण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये एक किलो साखर, एक लिटर खाद्यतेल तर प्रत्येकी अर्धा किलोची रवा, चणाडाळ, मैदा आणि पोह्याची पाकिटं असे एकूण सहा जिन्नस प्रति शिधापत्रिकास ई-पॉस प्रणालीद्वारे प्रति संच शंभर रुपये या दराने वितरीत करण्यात येत आहे. राज्य सरकारकडून दिवाळीनिमित्त वाटप करण्यात येणारा आनंदाचा शिधा सर्व पात्र लाभार्थ्यांना मिळेल याची दक्षता घ्यावी अशा सूचना कराडचे प्रांताधिकारी अतुल मेत्रे, तहसीलदार विजय पवार यांनी पुरवठा विभागाला दिल्या आहेत. आनंदाचा शिधा व इतर धान्य योजनांचा लाभ सर्व पात्र लाभार्थ्यांना मिळावा, यासाठी जे शिधापत्रिका धारक ऑनलाइन नाहीत त्यांना तत्काळ ऑनलाइन करून घ्यावे. दिवाळीत राज्यातल्या नागरिकांना १०० रुपयांमध्ये आनंदाचा शिधा दिला जात आहे. राज्यातील सर्व अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारकांना हा आनंदाचा शिधा मिळ...

रेठरे बुद्रुक ग्रामपंचायतीवर डॉ. अतुल भोसले गटाचे निर्विवाद वर्चस्व...सरपंचपदासह सर्व १८ जागांवर विजय; विरोधकांना धोबीपछाड...

Image
  रेठरे बुद्रुक ग्रामपंचायतीवर डॉ. अतुल भोसले गटाचे निर्विवाद वर्चस्व...सरपंचपदासह सर्व १८ जागांवर विजय; विरोधकांना धोबीपछाड... कराड दि.6: कराड तालुक्यात महत्वपूर्ण ठरलेल्या रेठरे बुद्रुक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत डॉ. अतुल भोसले समर्थक कृष्णा विकास आघाडीने सरपंचपदासह सर्वच १८ जागांवर घवघवीत यश मिळवून, विरोधकांना आसमान दाखविले. विजयी उमेदवारांनी विजयाचा जल्लोष साजरा करत, कृष्णा हॉस्पिटल कॅम्पसमधील सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करुन आशीर्वाद घेतले. रेठरे बुद्रुक गावात यावेळच्या निवडणुकीत सत्ताधारी डॉ. अतुल भोसले समर्थक आणि आ. पृथ्वीराज चव्हाण समर्थक गटात सामना रंगला होता. पण सत्ताधारी भोसले समर्थक कृष्णा विकास आघाडीने अर्ज माघारीच्या दिवशीच ७ जागांवर बिनविरोध विजय संपादन करत, विरोधी आ. पृथ्वीराज चव्हाण गटावर सरशी केली होती. सरपंचपदासह ११ जागांसाठी रविवारी (ता. ५) मतदान पार पडले.  आज जाहीर झालेल्या निकालात कृष्णा विकास आघाडीचे सरपंचपदाचे उमेदवार हणमंत बाबुराव सूर्यवंशी यांनी ४,२३२ मते मिळवित विजय संपादन केला. तसेच कृष्णा विकास आघाडीच्या उमे...

कराड दक्षिणमध्ये काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व...

Image
  कराड दक्षिणमध्ये काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व... कराड दि 6-कराड दक्षिण विधानसभा मतदार संघातील 4 ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मोठ्या चूरशीने लढत झाली. त्यापैकी 3 ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेसने आपले वर्चस्व राखले आहे. माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण आणि अॅड उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या गटाने सत्ता मिळवत कराड दक्षिण मधील आपले वर्चस्व कायम राखले आहे. फक्त रेठरे बु या एकाच ग्रामपंचायत मध्ये अपेक्षेप्रमाणे भाजप ची सत्ता कायम राहिली आहे. यापरिस्थितीत सुद्धा आ. पृथ्वीराज चव्हाण गटाचे सरपंच पदाचे उमेदवार दिग्विजय सूर्यवंशी यांनी चुरशीची लढत देत 2200 मते मिळवली तसेच अपक्ष उमेदवार धनंजय मोहिते यांना 400 मते मिळाली.  कराड दक्षिण मधील जिंकलेल्या तीनही ग्रामपंचायतीच्या उमेदवारांनी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या कराड येथील निवासस्थानी येऊन जल्लोष करून गुलालाची उधळण करीत फटाक्यांची आतिषबाजी केली. यावेळी युवानेते इंद्रजीत चव्हाण यांनी सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन करीत सत्कार केला.  कराड दक्षिण मधील शेळकेवाडी ग्रामपंचायतीच्या आठही जागा आ.पृथ्वीराज चव्हाण आणि अॅड. उदयसिंह...

कराडात अपहरण करुन खुन करणाऱ्या गुन्हेगारानां अवघ्या 2 तासात अटक...

Image
कराड शहर डीबी पथकाची कामगिरी...अपहरण करुन खुन करणाऱ्या गुन्हेगारानां अवघ्या 2 तासात अटक... राजू सनदी, कराड  कराड दि.3-कराड शहर पोलीस ठाणे हद्दीतील ओगलेवाडी परीसरातील राजमाची हजारमाची भागात प्रेम प्रकरणातुन एका इसमाचा खुन झाला होता. या बाबत कराड शहर पोलीसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या गुन्हयातील 6 आरोपीना कराड शहर डी बी पथकाने अवघ्या 2 तासात लोकेशन व गोपनिय बातमीदारचे मदतीने अटक केली आहे.  याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बाबासाहेब पवार रा. हजारमाची यांची मुलगी राजमाची गावात राहणारा प्रविण पवार याचेसोबत पळुन गेल्याचा संशय होता. सदर प्रकरणाची माहिती आरोपी बाबासाहेब पवार व त्यांचे इतर साथीदार नातेवाईक यांना मिळाली होती. त्यामुळे सदरचे आरोपी हे त्या युवकाचे मागोव्यावर होते. दि. 30 रोजी सकाळी 10.15 वा. चे दरम्यान आरोपी बाबासाहेब याची मुलगी व युवक हे यशंवतराव चव्हाण कॉलेज परिसरातुन पळुन गेले. त्याचा राग मनात धरुन आरोपी बाबासाहेब पवार रा. हजारमाची हा व त्याचे साथीदार यांनी युवकाचे वडील, भाऊ व पळुन जाण्यास मदत केली असा संशय असलेले मयत इसम जनार्धन गुरव यांना राजमाची गाव...

कराडच्या त्या स्फोटातील जखमी कुटुंब प्रमुखाचा उपचारा दरम्यान मृत्यू...

Image
   कराडच्या त्या स्फोटातील जखमी शरीफ मुल्ला यांचा उपचारा दरम्यान मृत्यू... राजू सनदी, कराड  कराड दि.3 (प्रतिनिधी) येथील मुजावर कॉलनीत मुल्ला यांच्या घरात अचानक झालेल्या स्फोटामुळे जखमी झालेल्या पैकी कुटुंब प्रमुख शरीफ मुबारक मुल्ला यांचा आज उपचार सुरू असताना मृत्यू झाला. चारच दिवसांपूर्वी त्यांच्या पत्नी सुलताना मुल्ला यांचाही उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता. या दोघांच्या जाण्याने त्यांची दोन लहान मुले पोरखी झाली आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. 25 ऑक्टोंबर रोजी मुजावर कॉलनीत शरीफ मुबारक मुल्ला यांच्या घरात सकाळी अचानक स्पोट झाला. या स्फोटामुळे शरीफ मुल्ला यांच्या घरासह परिसरातील अन्य पाच घरांचे नुकसान झाले. याशिवाय सहा दुचाकींचे नुकसान झाले. तसेच या स्फोटामुळे तीन घरातील सात जण जखमी झाल्याची घटना घडली होती. हा स्पोट झाल्यानंतर सातारा पुणे व अन्य ठिकाणाहून फॉरेन्सिक चाचणी पथक बोलवण्यात आले होते. मात्र त्यानंतरही या हा स्फोट नेमका कशाने झाला याची अद्याप माहिती संबंधित प्रशासनाने जाहीर केलेली नाही. मात्र हा स्फोट गॅस गळतीमुळे झाला असावा असा प्...

प्रा. डॉ. माणिक बनकर यांना पीएच. डी. पदवी प्रदान...

Image
प्रा. डॉ. माणिक बनकर यांना पीएच. डी. पदवी प्रदान... कराड दि.1-प्रा. डॉ. माणिक नामदेव बनकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून मराठी विषयातील सुरेश शिंगटे यांच्या समग्र साहित्याचा अभ्यास" या विषयावर सादर केलेल्या प्रबंधास विद्यापीठाने नुकतीच पीएच.डी.- डॉक्टरेट विद्यावाचस्पती ही शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पदवी प्रदान करण्यात आली आहे.  या परीक्षेसाठी अध्यक्ष म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ मराठी विभागाचे प्रमुख डॉ. दासू वैद्य, बाहय परीक्षक म्हणून राणी चेन्नम्मा विद्यापीठ बेळगाव येथील मराठी विभाग प्रमुख डॉ. संजय कांबळे आणि मार्गदर्शक म्हणून अॅड. बी. डी. हंबर्डे महाविद्यालय आष्टीचे मराठी विभाग प्रमुख डॉ. राजाराम सोनटक्के हे मान्यवर होते.  या शिक्षण क्षेत्रातील दैदिप्यमान यशाबद्दल प्रा. डॉ. माणिक बनकर यांचे प्रा. डॉ. रघुनाथ केंगार कराड, प्रा. डॉ. प्रकाश दुकळे कोल्हापूर, कराड नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी शंकर खंदारे व कार्यालयीन पदाधिकारी, कर्मचारी संघटना, बहुसंख्य हितचिंतकांनी अभिनंदन केले आहे. प्रा. डॉ. माणिक बनकर हे निमगाव केतकी ता. इंदापू...

जागतिक फ्रीस्टाईल फुटबॉलचा जादूगार 'जेमी नाईट' याची पोदार स्कूलला भेट...

Image
जागतिक फ्रीस्टाईल फुटबॉलचा जादूगार 'जेमी नाईट' याची पोदार स्कूलला भेट... कराड दि.1 (प्रतिनिधी):फुटबॉल हा जगातील सर्वांत लोकप्रिय खेळ आहे. जगातील टॉप 10 फुटबॉल फ्रीस्टाइल पैकी एक असलेल्या जेमी नाईट याने पोदार स्कूलमध्ये भेट दिली. शाळेच्या विद्यार्थ्यांनी लेझिमच्या गजरात जेमी नाईट यांचे जंगी स्वागत केले. यावेळी फ्री स्टाईल फुटबॉल वर्कशॉप मध्ये जेमी नाईट याने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून फुटबॉलच्या त्याच्या विविध ट्रिक प्रत्यक्ष करून दाखवल्या. यावेळी बोलताना जेमी नाईट म्हणाले, “पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांमध्ये खेळाबद्दल इतका उत्साह, प्रतिभा आणि आवड आहे हे पाहून खूप आनंद झाला.भारत फुटबॉल खेळात जागतिक खेळाडू बनू शकतो आणि कदाचित फुटबॉल विश्वचषकात लवकरच भाग घेईल अशी मी अशा बाळगतो. मला इथे यायला खूप आवडले आणि आशा आहे की मी लवकरच परत येईल.” जेमी नाईट यांच्या नावे अनेक गिनीज बुक विक्रम आहेत,  जेमी जगातील सर्वात अनुभवी आणि सर्वाधिक मागणी असलेल्या व्यावसायिक फुटबॉल फ्रीस्टाइलर्सपैकी एक आहेत. ते ब्रिटन मधील फ्रीस्टाइल फुटबॉल वर्कशॉपचे संस्थापक असून  त्यांनी 30 पेक्षा जास्त द...