राज्य उत्पादन शुल्कच्या कराड सातारा भरारी पथकाकडून बनावट दारु तयार करणा-या टोळीवर धडक कारवाई; कराड तालुक्यात तीन ठिकाणी धाडी...
राज्य उत्पादन शुल्कच्या कराड सातारा भरारी पथकाकडून बनावट दारु तयार करणा-या टोळीवर धडक कारवाई; कराड तालुक्यात तीन ठिकाणी धाडी...
कराड दि. 6 राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सातारा व कराड कार्यालयाच्या भरारी पथकाने कराड तालुक्यात तीन ठिकाणी धाडी टाकून बनावट दारू तयार करणाऱ्या अड्ड्यावर धडक कारवाई केली आहे. यामध्ये पाच आरोपीसह मोठा मुद्देमाल तसेच बनावट दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे. दरम्यान तालुक्यात अशा पद्धतीने बनवतात तयार करणाऱ्या अड्ड्यावर छापा टाकल्याने कराड तालुक्यात खळबळ माजली आहे. ही बनावट दारू नेमकी कुठल्या ठिकाणी विकली जात होती याची आता उत्सुकता लागली आहे.
दरम्यान कराड शहर व परिसरात ही अनेक ठिकाणी मोठमोठ्या ब्रँडच्या नावाखाली बनावट दारू विकली जात असल्याची गेली काही दिवसापासून चर्चा सुरू आहे. शहरासह परिसरात असणाऱ्या वाईन शॉप व बारमध्ये सुद्धा राज्य उत्पादन शुल्क विभागाने विकली जाणाऱ्या दारूच्या विविध कंपन्यांची तपासणी करणे गरजेचे आहे. अनेक ठिकाणी बनावट लेबल लावून जुन्या बाटलीत नवीन बनावट दारू विकली जात असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने याची चौकशी करणे गरजेचे आहे.
याबाबत त्यांच्या विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार डॉ.विजय सुर्यवंशी, आयुक्तसो, राज्य उत्पादन शुल्क, सुनील चव्हाण संचालकसो, विजय चिंचाळकर विभागीय उपायुक्तसो, राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापूर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती किर्ती शेडगे, अधीक्षकसो, राज्य उत्पादन शुल्क, सातारा यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक, सातारा व निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क कराड विभागाने पाच नोव्हेंबर रोजी मौ.जुळेवाडी ता.कराड गावचे हद्दीत बनावट दारुची वाहतूक पकडून 1) रोहित रमेश सोळवंडे वय 26 वर्षे रा.कुंडल ता.पलूस जि.सांगली याच्या ताब्यातून बनावट देशी दारुचा साठा व एक चारचाकी वाहनासह एकूण 1,94,800/- किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
सदर इसमास चौकशी कामी ताब्यात घेवून मौ.जुळेवाडी ता.कराड येथील देशी दारु दुकानाच्या पाठीमागे छापा टाकून 2) फैय्याज मुसा मुल्ला वय 53 वर्षे रा.मलकापूर ता.कराड 3) शेखर गुणवंत बनसोडे वय 50 वर्षे रा. रा.रेठरे बु.ता.कराड यांच्या ताब्यातून प्रथम दर्शनी बनावट दारुसाठा तसेच चारचाकी वाहनासह एकूण 1,40,480 किंमतीचा मुददेमाल जप्त केला. वरील तिन्ही आरोपींना सोबत घेवून मलकापूर ता.कराड गावचे हद्दीत एका हॉटेलच्या पाठीमागे व रेठरे बु. ता. कराड येथील कॅनॉल चौकी या परिसरातील मुलानकी नावाच्या शिवारात छापे टाकून आयाज आबू मुल्ला वय 53 वर्षे रा.रेठरे बु. व इर्शाद उर्फ बारक्या शहाबुध्द्दीन मुल्ला वय 34 वर्षे रा. रा.रेठरे बु. यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या ताब्यातून बनावट दारुचा साठा तसेच बनावट दारु र्निर्मितीसाठी लागणारे साहित्य, कॅप सिलींग मशीन, बनावट लेबले, बनावट बुचे व इतर साहित्य असा चार ठिकाणी मारलेल्या छाप्यांमध्ये एकूण रुपये 19,12,010 किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर गुन्हयातील इसमां विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे कलम 65(अ)(ब) (क) (ड)(ई)(फ),81,82,83,90,103 नुसार गुन्हा नोंद करुन अटक करण्यात आली आणि वरील सर्व आरोंपीना कराड न्यायालया समोर हजर केले. तसेच मौ.जुळेवाडी ता.कराड येथील देशी दारु दुकान फैय्याज मुसा मुल्ला याने त्याच्या मालकीच्या देशी दारु दुकानात प्रथमदर्शनी बनावट दारुचा साठा विक्री करण्याच्या इराद्याने जवळ बाळगला म्हणून सदर देशी दारु दुकानावर सुदधा विभागीय गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर कारवाईमध्ये निरीक्षक माधव चव्हाण, संजय साळवे, दुय्यम निरीक्षक किशोर नडे, शरद नरळे, प्रशांत नागरगोजे, सहा.दु.निरीक्षक नितीन जाधव, महेश मोहिते, सागर आवळे, मनिष माने, भिमराव माळी, अजित रसाळ, आबासाहेब जानकर, राजेंद्र अवघडे, अरुण जाधव, किरण जंगम, सचिन जाधव, राणी काळोखे जवान यांनी सहभाग घेतला. गुन्हयाचा पुढील तपास माधव चव्हाण निरीक्षक हे करीत आहेत.
जिल्हयामध्ये बनावट दारु तसेच हातभट्टी दारु निर्मिती, विक्री, वाहतूक तसेच इतर कोणत्याही प्रकारच्या दारुची निर्मिती, विक्री व वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याची माहिती तात्काळ या कार्यालयास देण्यात यावी असे आवाहन श्रीमती किर्ती शेडगे अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सातारा यांनी केले आहे.


Comments
Post a Comment