मलकापूर नळ पाणीपुरवठा योजनेच्या विस्तारासाठी 18.61 कोटीची मंजुरी...

मलकापूर नळ पाणीपुरवठा योजनेच्या विस्तारासाठी 18.61 कोटीची मंजुरी...

कराड दि.16- माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण (बाबा) यांच्या शिफारशीने मलकापूरच्या २४x७ नळ पाणीपुरवठा योजनेच्या विस्तार व बळकटीकरण करण्या साठीच्या 18.61 कोटी रुपयांच्या प्रस्तावास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली असल्याची माहिती आज मलकापूर नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी दिली.

मलकापूर नगरपरिषद २४x७ नळपाणीपुरवठा योजना स्व.भास्करराव शिंदे यांचे संकल्पनेतून साकारलेली योजना तत्कालिन ग्रामपंचायत, नगरपंचायत व सध्या नगरपरिषदेने सन २००९ पासून अखंडितपणे कार्यरत ठेवली आहे. या योजनेच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना प्रतिमाणसी ११० लिटर या प्रमाणे २४ तास पाणीपुरवठा केला जात आहे. या योजनेस सन २०११ सालचे नॅशनल अर्बन वॉटर अंबाई तत्कालिन केंद्रीय मंत्री ना. कमलनाथ यांचे हस्ते व पंतप्रधान पुरस्कार मनमोहन सिंह यांचे हस्ते वितरण करून सन्मानित करण्यात आले असुन नुकतेच दिनांक २७/०६/२०२३ रोजी नवी दिल्ली येथे उत्कृष्ठ पाणी वितरण व व्यवस्थापन BEST LOCAL URBAN BODY अंतर्गत देशामधील तृतीय क्रमांकाचे राष्ट्रीय पारितोषिक उपराष्ट्रपती  जयदिप धनखड यांचे शुभहस्ते व ना. गजेंद्रसिंह शेखावत, केंद्रीय जलशक्ती मंत्री यांचे उपस्थितीत सन्मानित करणेत आले आहे. तसेच सन २०१३ चा महाराष्ट्र उर्जा अभिकरण महामंडळाचा वीजबचतीचा राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार प्राप्त झालेला आहे. स्वच्छ सर्वेक्षण व माजी वसुंधरा अभियानामध्ये उत्कृष्ट कामगिरी करुन बक्षिस प्राप्त केले.

मलकापूर शहरामध्ये आ. पृथ्वीराज चव्हाण (बाबा) यांच्या सहकार्याने उपलब्ध झालेल्या नागरी मूलभूत सुविधा व २४x७ नळपाणीपुरवठा योजना यामुळे मलकापूर शहराचे नागरिकरण इस्पा होत आहे. यामुळे मलकापूर शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असलेने सध्याचे अंदाजे ४५००० लोकसंख्येस सध्या पाणीपुरवठा करणेसाठीची योजना २० ते २२ तास पंपिंग करुन चालविली जात आहे. त्यामुळे भविष्यात मलकापूर शहराची लोकसंख्या वाढीचा विचार करुन सन २०५४ साल ची १०६००० गृहित धरुन दुरदृष्टी ठेवून केंद्र शासनाचे अमृत २० अभियाना अंतर्गत २४x७ नळपाणीपुरवठा योजना विस्तार व बळकटीकरणाचा प्रस्ताव दाखल केला होता. केंद्रशासनाने राज्यातील एकूण ४४ स्थानिक स्वराज्य संस्थाचा या योजनेमध्ये समावेश केला होता त्यामध्ये मलकापूर शहराचासुध्दा समावेश होता. नगरपरिषदेने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातुन मलकापूर शहराच्या वाढीचा विचार करून पुढील ३० सालचे लॉकसाठी ही योजना तयार केली आहे. नगरपरिषदेने मुख्य अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पुणे यांचे शिफारशीने सदर योजनेचा प्रस्ताव नगरविकास विभाग महाराष्ट्र शासन यांचेकडे मंजूरीसाठी सादर केला होता. त्यानुसार अमृत २.० अभियानाअंतर्गत गठित करणेत आलेल्या राज्यस्तरीय तांत्रिक समितीने त्यास २२ नोव्हेंबर २०२२ रोजी व राज्यस्तरीय उच्च अधिकार सुकाणू समितीने दिनांक ८ डिसेंबर २०२२ रोजी सदर योजनेस मान्यता देऊन अंतिम मंजुरीसाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडे सादर केला होता.

याअनुषंगाने आ. पृथ्वीराज चव्हाण (बाबा) यांनी सदर प्रस्तावास मान्यता देणेबाबत शिफारस पत्र दि.१८/१०/२०२३ रोजी मुंबई येथे समक्ष भेटून २४x७ योजना पाणी बचतीचे महत्त्व व राज्यातील संपूर्ण शहराला२४ तास पाणीपुरवठा करणारी एकमेव मलकापूर शहर असलेने प्रस्तावास मंजुरी देण्याच्या अनुषंगाने चर्चा केली होती. या अनुषंगाने सदर प्रस्तावास एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी ०९/११/२०१३ रोजी मान्यता देवून मलकापूर वासियांना दिवाळी भेट दिली आहे. याकामी ना.शंभूराज देसाई, आ.सतेज उर्फ बंटी पाटील, आ. विश्वजीत कदम, उदयसिंह पाटील-उंडाळकर यांचे  सहकार्य लाभले आहे. नगरपरिषदेने मलकापूर शहरातील नागरिकांना लोक सहभागाच्या माध्यमातून विविध उपक्रम यामध्ये घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, सांडपाणी प्रक्रिया योजना श्रीमती प्रेमलाताई चव्हाण कन्या सुरक्षा अभियान, प्रियदर्शिनी कन्यारत्न योजना, मलकापूर सोलर सिटी, महात्मा गांधी दिव्यांग पेन्शन योजना यामुळे शहरातील नागरिकांचे राहणीमान उंचावले असून नियोजनबरित्या होत असलेला विकास यामुळे मलकापूर शहरास इतर शहरांच्या तुलनेत लोकसंख्या वाढीचा वेग जास्त आहे. तसेच शहराच्या विस्ताराला मोठी संधी निर्माण झाली असून यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत.

मलकापूर नगरपरिषद २४x७ नळ पाणीपुरवठा योजनेस देशातील विविध राज्याचे पदाधिकारी व अधिकारी भेट देत असतात. सदर योजनेचे सादरीकरण हैद्राबाद येथील Administrative Staff College of India विद्यापीठामध्ये होत असून, या माध्यमातून लोकप्रतिनिधी व अधिकारी यांना २४x७ योजना राबविण्यासाठी कशा प्रकारे नागरिकांच्यात जागृकता निर्माण व्हावी याबाबत प्रशिक्षण दिले जाते. सन २००९ पासून गेली १४ वर्षे सदरची योजना सुरु असलेने तज्ञांमध्ये योजनेबद्दल उत्सुक्ता निर्माण झालेली आहे. सदर योजनेमध्ये नागरिकांचा लोकसहभाग महत्त्वाचा आहे. या योजनेमुळे मलकापूर शहर संपूर्ण राष्ट्रीय अंतरराष्ट्रीय स्तरावर २४x७ नळ पाणीपुरवठा योजनेसाठी ओळखले जात असून, यामुळे शहराची एक वेगळी ओळख निर्माण झालेली आहे. अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये मलकापूर नगरपरिषदेचे पदाधिकारी व अधिकारी यांचा या योजनेच्या अनुषंगाने सहभाग असतो

मलकापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ.निलम येडगे, राजेंद्र यादव सभापती बांधकाम, नियोजन सभापती प्रशांत चांदे, महिला बालकल्याण समिती कमल कुराडे, सौ.मंदा भोसले उपसभापती महिला व बालकल्याण समिती, तत्कालिन मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर, पराग कोडगुले, तसेच सध्याचे मुख्याधिकारी प्रताप कोळी, पाणीपुरवठा विभागाचे विभाग प्रमुख आत्माराम मोहिते, आरोग्य अभियंता सौ. प्रिया तारळेकर , जगन्नाथ मुडे, प्रोजेक्ट कॉर्डिनर रवींद्रनाथ टीळे यांनी सदर प्रस्ताव पाठपुरावा करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. सदरचा प्रस्ताव तयार करणेकामी आर. जी. होलानी, सेवा निवृत्त सदस्य सचिव म.जी. प्रा. यु.पी. बागडे, सेवा निवृत्त उपअभियंता म. जी. प्रा. तसेच तांत्रिक सल्लागार श्री. कुलकर्णी प्रायमुव्ह इन्फ्रास्ट्रक्चर यांनी सहकार्य केले आहे.

सदरची योजना मंजूर होणेकामी मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधानसचिव श्री.विकास खार्गे, नगरविकास विभागाचे प्रधानसचिव श्री. के. एच. गोविंदराज, उपसचिव श्री. श्रीकांत आडंगे, महाराष्ट्र शासन नगरविकास विभागाचे कक्ष अधिकारी श्री गजानन आलेवाड, पुणे विभागाचे मुख्य अभियंता श्री. राजेंद्र रहाने, श्री. व्ही. डी. वाईकर, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, कराड, शाखा अभियंता श्री.एस.के. भोपळे,.आ. पृथ्वीराज चव्हाण यांचे खाजगी स्वीय सहाय्यक गजानन आवळकर, नगरपरिषदेचे वरिष्ठ लिपिक श्री.ज्ञानदेव साळुंखे, नगरपरिषदेचे सर्व नगरसेवक, नगरसेविका यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक