कराडच्या त्या स्फोटातील जखमी कुटुंब प्रमुखाचा उपचारा दरम्यान मृत्यू...
राजू सनदी, कराड
कराड दि.3 (प्रतिनिधी) येथील मुजावर कॉलनीत मुल्ला यांच्या घरात अचानक झालेल्या स्फोटामुळे जखमी झालेल्या पैकी कुटुंब प्रमुख शरीफ मुबारक मुल्ला यांचा आज उपचार सुरू असताना मृत्यू झाला. चारच दिवसांपूर्वी त्यांच्या पत्नी सुलताना मुल्ला यांचाही उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता. या दोघांच्या जाण्याने त्यांची दोन लहान मुले पोरखी झाली आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
25 ऑक्टोंबर रोजी मुजावर कॉलनीत शरीफ मुबारक मुल्ला यांच्या घरात सकाळी अचानक स्पोट झाला. या स्फोटामुळे शरीफ मुल्ला यांच्या घरासह परिसरातील अन्य पाच घरांचे नुकसान झाले. याशिवाय सहा दुचाकींचे नुकसान झाले. तसेच या स्फोटामुळे तीन घरातील सात जण जखमी झाल्याची घटना घडली होती. हा स्पोट झाल्यानंतर सातारा पुणे व अन्य ठिकाणाहून फॉरेन्सिक चाचणी पथक बोलवण्यात आले होते. मात्र त्यानंतरही या हा स्फोट नेमका कशाने झाला याची अद्याप माहिती संबंधित प्रशासनाने जाहीर केलेली नाही. मात्र हा स्फोट गॅस गळतीमुळे झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलीस विभागाने वर्तवला आहे.
या स्फोटात शरीफ मुल्ला यांच्यासह त्यांची दोन लहान मुले व त्यांच्या पत्नी व नजीकच्या घरातील अन्य तीन ते चार जण जखमी झाले होते. या जखमीवर कराडच्या स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय व कृष्णा हॉस्पिटल येथे उपचार सुरू होते. यादरम्यान शरीफ मुल्ला यांच्या पत्नी सुलताना मुल्ला यांचे 31 रोजी उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता. तर आज त्यांचे पती शरीफ मुल्ला यांचे दुपारी उपचार सुरू असताना निधन झाले.
दरम्यान आज दुपारी शरीफ मुल्ला यांच्यावर कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने त्यांची दोन मुले पोरखी झाली आहेत. गेल्या काही दिवसापासून या संपूर्ण कुटुंबावर कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. नजीकच्या नातेवाईकांनी या उपचारादरम्यान खर्च केला. मात्र त्यानंतरही उपचाराचा खर्च अधिक लागू लागल्याने जवळच्या नातेवाईकांनी व आप्त लोकांनी शरीफ मुल्ला यांच्यावर उपचार करण्यासाठी पैसे जमा करण्याची किंवा त्यांना मदत करण्याचे आवाहन केले होते. दोनच दिवसांपूर्वी या आव्हानास प्रतिसाद देत समाजातील लोकांनी पुढाकार घेतला होता. अशातच आज शरीफ मुल्ला यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याने सर्वत्र हळूहळू व्यक्त होत आहे.


Comments
Post a Comment