तडीपार गुंडास कराड शहर पोलीसांनी पाठलाग करुन ठोकल्या बेड्या...
तडीपार गुंडास कराड शहर पोलीसांनी पाठलाग करुन ठोकल्या बेड्या...
कराड दि.7-कराड शहरातून तडीपार असूनही शहरात येऊन दहशत माजवणाऱ्या तडीपार गुंड अविनाश प्रताप काटे याला गुन्हे प्रकटीकरण शाखेने पाठलाग करून बेडया ठोकल्या आहेत. कराड शहर पोलीस स्टेशन मधील गुन्हे प्रकटीकरण शाखेने शनिवारी रात्री ही कारवाई केली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कराड शहर पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार अविनाश प्रताप काटे व त्याचे इतर साथिदार यांना कराड शहर पोलीसांनी 2 वर्षासाठी हद्दपार केले असुन देखील अविनाश हा कराड शहर पोलीस ठाणे हद्दीतील कराड बसस्थानक येथे येवुन दहशत माजवत असल्याची बातमी कराड शहर पोलीस ठाणेचे पोलीस उप निरिक्षक आर.एल.डांगे यांना मिळाली होती. पोलीस उप निरिक्षक डांगे हे तात्काळ डी. बी. पथकासह त्या ठिकाणी पोहचले व तडीपार गुंड अविनाश प्रताप काटे याचा पाठलाग करुन त्यास ताब्यात घेतले.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख,अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरिक्षक आर. एल. डांगे, सफौ देसाई, सफौ देवकुळे, पोलीस हवालदार शशिकांत काळे, पोलीस नाईक संतोष पाडळे, पोलीस नाईक कुलदिप कोळी, आनंदा जाधव, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, अमोल देशमुख, सोनाली पिसाळ, यांनी केलेली आहे.

Comments
Post a Comment