कराड तहसील कार्यालयात कुणबी अभिलेख कक्ष स्थापन...
कराड तहसील कार्यालयात कुणबी अभिलेख कक्ष स्थापन...
कराड दि.9-कराड तहसील कार्यालयाकडून महसुली अभिलेखे खासरापत्रक, पाहणीपत्रक, क- पत्रक, कुळ नोंद वही, नागरिकांचे राष्ट्रीय रजिस्टर, हक्क नोंद पत्रक, ७/१२ उतारा, जन्म नोंदणी रजिस्टर संबंधित अभिलेखांमध्ये कुणबी जात नमूद असलेले अभिलेख उपलब्ध करून देण्याबाबतची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे..
कुणबी जात नमूद असलेल्या अभिलेखांची माहिती सादर करण्याच्या सूचना पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, गट शिक्षण अधिकारी, उपअधीक्षक भूमी अभिलेख, मुख्याधिकारी नगरपालिका कराड, दुय्यम निबंधक कार्यालय कराड, वरिष्ठ पोलिस निरिक्षक कराड शहर, पोलिस निरीक्षक कराड तालुका, सहाय्यक पोलीस निरिक्षक उंब्रज, तळबीड व मसूर, या कार्यालयांना दिल्या आहेत.
महसूल विभागामार्फत खासरापत्रक, पाहणी पत्रक, क- पत्रक, कुळ नोंदवही, नागरिकांचे राष्ट्रीय रजिस्टर सन 1951, नमुना नं. 1 हक्क नोंदपत्रक, नमुनानं. 2 हक्क नोंद पत्रक, 7/12 उतारा,जन्म मृत्यु रजिस्टर संबंधिांचे अभिलेखे (गाव नमुना नं. 14) इत्यादी नोंदी शोधण्याचे काम चालू आहे.
कराड तालुक्यातील नागरिकांनी आपल्याजवळील कुणबी जात नमूद असलेले कागदपत्र तहसील कार्यालयात सादर करावे, तसेच आवश्यक पुराव्यासह कुणबी जातीचा दाखला मिळण्याकामी अर्ज करावेत, असे आवाहन तहसीलदार विजय पवार यांनी केले आहे.

Comments
Post a Comment