दिवाळी सणानिमित्त शहरातील पाणीपुरवठा वेळेत बदल...
दिवाळी सणानिमित्त शहरातील पाणीपुरवठा वेळेत बदल...
दिवाळी सणानिमित्त कराड शहरातील पाणीपुरवठा वेळेत बदल करण्यात आल्याची माहिती नगरपालिकेच्या वतीने देण्यात आली आहे. रविवार 12 नोव्हेंबर, मंगळवार 14 नोव्हेंबर व बुधवार 15 नोव्हेंबर या तीन दिवशी सकाळच्या पाणीपुरवठा वेळेत बदल करण्यात आला आहे.
सोमवार पेठ येथील पाण्याच्या टाकीतून सकाळी साडेपाच ते साडेसहा या वेळेत पाणीपुरवठा होईल तर सूर्यवंशी मळा येथील पाण्याच्या टाकीतून नेहमीप्रमाणे पाणीपुरवठा होणार आहे. रुक्मिणी नगर येथील पाण्याचे टाकीतून सकाळी सहा ते सात या वेळेत तर गजानन हाउसिंग सोसायटीतील पाण्याच्या टाकीतून नेहमीप्रमाणे पाणीपुरवठा होणार आहे.
रविवार पेठ येथील पाण्याच्या टाकीतून सकाळी सहा ते सात, टाऊन हॉल येथील पाण्याच्या टाकीतून सकाळी सहा ते सात तर मार्केट यार्ड येथील पाण्याची टाकीतून नेहमीप्रमाणे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. मंगळवार दिनांक 14 नोव्हेंबर पासून सायंकाळचा पाणीपुरवठा नेहमीप्रमाणे करण्यात येणार आहे.


Comments
Post a Comment