मराठी पाटया लावा अन्यथा खळखटयाक;मनसेच्या वतीने तहसिलदारांना निवेदन...
मराठी पाटया लावा अन्यथा खळखटयाक;मनसेच्या वतीने तहसिलदारांना निवेदन...
कराड दि.29-सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही कराड शहर व तालुक्यातील अनेक दुकानांना इंग्रजी भाषेत पाटया आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्ल्घन करणाऱया संबधित विभागाच्या अधिकाऱयांवर कारवाई करावी तसेच आठ दिवसांत इंग्रजी पाटया काढुन मराठी पाटया लावाव्यात अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा ईशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे.
याबाबत तहसिलदार विजय पवार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी, जिल्हाअध्यक्ष ऍड.विकास पवार, तालुका अध्यक्ष दादासाहेब शिंगण, शहरअध्यक्ष सागर बर्गे, विद्यार्थी सेनेचे जिल्हाअध्यक्ष विनायक भोसले, पै.सतिश यादव, नितीन महाडीक, हणमंत भिंगारदेवे, नितीन शिंदे, अमोल सकट, विश्वास संकपाळ केतन जाधव,शंभूराजे भिसे व कार्यकर्ते उपस्थित होते.
वास्तवीक सक्तीपेक्षा महाराष्ट्रातील प्रत्येकाला मराठी भाषेविषयी आदर असणे गरजेचे आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही काही व्यवसाईक दुकानाला मराठीत पाटी लवत नाही. सर्वोच्च न्यायालयाने मराठी पाटया लावण्यासाठी 25 नाहेंबर पर्यंत मुदत दिली होती. मात्र कराड शहर व तालुक्यातील अनेक दुकानांना अध्याप इंग्रजीत पाटया आहेत. प्रशासनाने अशा दुकानांचा सर्व्हें करावा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱया संबधित विभागाच्या जबाबदार अधिकाऱयांविरोधात करावाई करावी. तसेच येत्या आठ दिवसांत सर्व दुकानांना मराठीत पाटया लावण्यात याव्यात अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा ईशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे.


Comments
Post a Comment