कराडात अपहरण करुन खुन करणाऱ्या गुन्हेगारानां अवघ्या 2 तासात अटक...
कराड शहर डीबी पथकाची कामगिरी...अपहरण करुन खुन करणाऱ्या गुन्हेगारानां अवघ्या 2 तासात अटक...
राजू सनदी, कराड
कराड दि.3-कराड शहर पोलीस ठाणे हद्दीतील ओगलेवाडी परीसरातील राजमाची हजारमाची भागात प्रेम प्रकरणातुन एका इसमाचा खुन झाला होता. या बाबत कराड शहर पोलीसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या गुन्हयातील 6 आरोपीना कराड शहर डी बी पथकाने अवघ्या 2 तासात लोकेशन व गोपनिय बातमीदारचे मदतीने अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बाबासाहेब पवार रा. हजारमाची यांची मुलगी राजमाची गावात राहणारा प्रविण पवार याचेसोबत पळुन गेल्याचा संशय होता. सदर प्रकरणाची माहिती आरोपी बाबासाहेब पवार व त्यांचे इतर साथीदार नातेवाईक यांना मिळाली होती. त्यामुळे सदरचे आरोपी हे त्या युवकाचे मागोव्यावर होते. दि. 30 रोजी सकाळी 10.15 वा. चे दरम्यान आरोपी बाबासाहेब याची मुलगी व युवक हे यशंवतराव चव्हाण कॉलेज परिसरातुन पळुन गेले. त्याचा राग मनात धरुन आरोपी बाबासाहेब पवार रा. हजारमाची हा व त्याचे साथीदार यांनी युवकाचे वडील, भाऊ व पळुन जाण्यास मदत केली असा संशय असलेले मयत इसम जनार्धन गुरव यांना राजमाची गावातुन अपहरण करुन सुर्ली घाटात नेवुन मारहाण केली. सदर मारहाणीत जनार्धन गुरव हा इसम मृत्युमुखी पडल्याने आरोपी रानावनात पसार झाले होते. सदर आरोपीना कराड शहर डी. बी. पथकाने अवघ्या 2 तासात लोकेशन व गोपनिय बातमीदारचे मार्फत एकुण 6 आरोपी यांना अटक केली असुन बाकी आरोपीचा यांचा शोध सुरु आहे. अटक आरोपीत यांना दिनांक 6/11/2023 रोजी पर्यंत पोलीस कोठडी मिळालेली आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, कराड उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे, गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उप निरीक्षक डांगे, पोलीस उपकनिरीक्षक पवार, सफी संजय देवकुळे, पोलीस हवा. सचिन सुर्यवंशी, शशि काळे, पोलीस नाईक संतोष पाडळे, कुलदिप कोळी, पो.शि. धिरज कोरडे, महेश शिंदे, आनंदा जाधव, अमोल देशमुख, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, सोनाली पिसाळ यांनी केलेली आहे.

Comments
Post a Comment