कराड नगरपरिषदेचा दिल्लीत डंका;सांडपाणी प्रकल्पाचे सादरीकरण...
कराड नगरपरिषदेचा दिल्लीत डंका;सांडपाणी प्रकल्पाचे सादरीकरण... कराड दि.30 (प्रतिनिधी) कराड शहराचा डंका पून्हा एखदा दिल्ली दरबारी वाजला आहे.48 (1974 साली) वर्षापूर्वी तत्कालिन नगराध्यक्ष स्व.पी डी पाटील यांनी शहरात भूयारी गटर संकल्पना प्रत्यक्षात कार्यान्वित केली.आज त्याच भूयारी गटर योजनेच्या माध्यमातून उभा राहिलेल्या सांडपाणी प्रकल्प देशासाठी मार्गदर्शक ठरु पाहत आहे.याचेच उदाहारण आज संपूर्ण देशाने पाहिले.सबंधित प्रकल्पातून प्रक्रिया केलेल्या पाण्याचा शेती साठी वापर केला जात असल्याचे सादरीकरण नगरपरिषदेच्या वतीने आज दिल्लीत करण्यात आल्याने कराडचे नाव देशपातळीवर आधोरिकेत झाले आहे.स्व. पी डी पाटील यांच्या दूरदृष्टीचे यानिमित्ताने कौतूक होत आहे. केंद्रीय नगरविकास राज्य मंत्री कौशल किशोर यांनी प्रत्यक्ष सादरीकरण ऐकल्यानंतर कराड नगरपरिषदेचे विशेष कौतूक केले.यावेळी केंद्रीय नगरविकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी, देशभरातील विविध राज्याचे IAS अधिकारी, राज्यातील विविध महापालिका, नगरपालिकांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कराड नगरपरिषद देशात स्वच्छ सर्वेक्षण अभियानात अव्वल ठरल्याने कराड नगर परिष...