यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सभा....
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची गुरुवारी वार्षिक सभा....
शिवनगर,ता.27 : येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची सन २०२१-२२ या आर्थिक वर्षाच्या अधिमंडळाची ६६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी दुपारी १ वाजता कारखाना कार्यस्थळावर होणार आहे. कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांचे अध्यक्षतेखाली ही सभा होणार आहे, अशी माहिती कार्यकारी संचालक सुर्यकांत दळवी यांनी दिली.
या सभेत गेल्या हंगामातील प्रगतीचा आढावा मांडला जाणार आहे. तसेच विषयपत्रिकेवरील विषयांवर विचारविनिमय करण्यात येणार आहे. सभेस येताना सभासदांनी प्रवेशपत्रिका, ओळखपत्र / स्मार्टकार्ड आणणे आवश्यक आहे. तरी सर्व सभासदांनी सभेसाठी उपस्थित रहावे, असे आवाहन कार्यकारी संचालक सुर्यकांत दळवी यांनी केले आहे.

Comments
Post a Comment