देशात गेल्या 24 तासांत 3 हजार 947 नवीन कोरोना बाधितांची वाढ झाली.....
सातारा जिल्ह्यात आज 6 बाधिताची वाढ ...
कराड दि.30 (प्रतिनिधी) सातारा जिल्ह्यात आज आलेल्या आवाहलात 6 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर आज दिवसभरात 12 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यातील सक्रिय रूग्णसंख्या आता 43 झाली असून एक जणाचा मृत्यु झाला आहे.सध्या 2 रूग्णांवर हाॅस्पिटलमध्ये उपचार सूरू आहेत.
सातारा जिल्ह्यात आज जाहीर केलेल्या तालुकानिहाय रिपोर्टनुसार... जावली-0, कराड-3, खंडाळा- 0, खटाव-0, कोरेगाव-0, माण-0, महाबळेश्वर-0, पाटण-0, फलटण-0, सातारा-1, वाई-0, इतर 2 असे 6 बाधितांची वाढ झाली आहे.
नमूने-चाचणी-179 (एकूण-26 लाख 23 हजार 113)
आज बाधित वाढ- 6 (एकूण-2 लाख 80 हजार 672)
आज कोरोनामुक्त- 12 (एकूण-2 लाख 73 हजार 890)
आज मृत्यू- 1 (एकूण-6 हजार 723)
उपचारार्थ रूग्ण-43
गंभीर रुग्ण--0
रूग्णालयात उपचार -2
देशात गेल्या 24 तासांत 3 हजार 947 नवीन कोरोना बाधितांची वाढ झाली आहे.दिवसभरात एकूण 5 हजार 96 रुग्ण कोरोनामुक्त झाले तर 18 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. देशात 39 हजार 583 अॅक्टीव्ह रूग्ण आहेत.
सातारा जिल्ह्यात लंपी त्वचा रोगाने आज 14 जनांवराचा मृत्यू...
लंपी त्वचा रोगाने मृत्यूमुखी पडलेल्या जनावरांच्या मालकांना नुकसान भरपाईचे चेक वाटप...
पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते लंपी रोगाने मृत्यूमुखी पडलेल्या जनावरांच्या मालकांना नुकसान भरपाईचे चेक वाटप करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात झालेल्या या कार्यक्रमास खा. उदयनराजे भोसले, खा. श्रीनिवास पाटील, खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आ.शशिकांत शिंदे, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे, दिपक चव्हाण, महेश शिंदे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डाँ.अंकुश परिहार यांच्यासह विविध विभागांचे विभाग प्रमुख आणि पशुपालक उपस्थित होते.
जिल्हयात आजपर्यंत एकूण 3,40,863 म्हणजेच 96% पशुधनाचे लसीकरण पुर्ण करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. अंकुश परिहार यांनी यावेळी दिली.
सातारा जिल्ह्यात एकूण 10 तालुक्यामध्ये लंम्पी चर्म रोगाची लागण झाली आहे. आज अखेर 1472 गाय व 180 बैल असे एकूण 1652 जनावरांस लंम्पी रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. तसेच आज जिल्हयात 14 जनावरांचा मृत्यु झाला असून आज अखेर 87 गाई व 32 बैल असे एकूण 119 जनावरे मृत्यूमुखी पडली आहेत. या सर्व जनावरांच्या मालकांस शासन निर्णयानुसार नुकसान भरपाई देणयाची कार्यवाही सुरू आहे. एकूण 335 जनावरे नियमित औषध उपचाराने बरी झालेली आहेत.
लंम्पी चर्म रोग उपचारासाठी आवश्यक असलेली औषधे शासकीय पशुवैद्यकीय दवाखाने आणि तालुका लघु पशुचिकीत्सालायांमध्ये उपलब्ध आहेत.
लंम्पी चर्म रोग औषधोपचाराने बरा होत असल्याने पशुपालकांनी रोग प्रादुर्भावाची लक्षणे आढळून आल्यास त्यांची माहिती तात्काळ नजीकच्या पशुवैदयकीय दवाखान्यात अथवा पशुसंवर्धन विभागाच्या टोल फ्री क्र.18002330418 अथवा राज्यस्तरीय कॉल सेंटर मधील पशुसेवेचा टोल फ्री क्र. 1962 यावर तात्काळ संपर्क साधावा.

Comments
Post a Comment