जिल्ह्यात लंपी त्वचा रोगाचे प्रतिबंधात्मक लसीकरण 85 टक्के पुर्ण; डॉ. अंकुश परिहार...
सातारा जिल्ह्यात आज 13 बाधिताची वाढ ...
कराड दि.28 (प्रतिनिधी) सातारा जिल्ह्यात आज आलेल्या आवाहलात 13 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर आज दिवसभरात 7 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यातील सक्रिय रूग्णसंख्या आता 44 झाली असून सध्या 1 गंभीर रुग्ण तर 3 रूग्णांवर विविध हाॅस्पिटलमध्ये उपचार सूरू आहेत.
सातारा जिल्ह्यात आज जाहीर केलेल्या तालुकानिहाय रिपोर्टनुसार... जावली-0, कराड-1, खंडाळा- 0, खटाव- 1, कोरेगाव-5, माण-1, महाबळेश्वर-0, पाटण-0, फलटण-1, सातारा-2, वाई-1, इतर 1 असे 13 बाधितांची वाढ झाली आहे.
नमूने-चाचणी-222 (एकूण-26 लाख 22 हजार 724)
आज बाधित वाढ- 13 (एकूण-2 लाख 80 हजार 660)
आज कोरोनामुक्त- 7 (एकूण-2 लाख 73 हजार 873)
आज मृत्यू- 0 (एकूण-6 हजार 719)
उपचारार्थ रूग्ण-44
गंभीर रुग्ण--1
रूग्णालयात उपचार -3
सातारा जिल्ह्यात लंपी त्वचा रोगाने आज 8 जनांवराचा मृत्यू...
सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर वगळता 10 तालुक्यातील 100 गावांमध्ये लंपी त्वचा रोगाची लागण झाली आहे. आज अखेर गाय 1278 व 157 बैल असे एकूण 1434 जनावरांस लंम्पी रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. तसेच आज जिल्हयामध्ये 8 जनावरांचा मृत्यु झाला असून (आजअखेर 72 गायी + 19 बैल असे एकूण 91 पशुधन मृत झाले आहे ) आजअखेर 196 गाई व 20 बैल असे एकूण 216 जनावरे नियमित औषध उपचाराने बरी झालेली आहेत,लंपी त्वचा रोगाचे प्रतिबंधात्मक लसीकरण 85 टक्के पुर्ण झाले आहे. अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. अंकुश परिहार यांनी दिली आहे.

Comments
Post a Comment