ओबीसी समाजाची जात निहाय जणगणना करुन लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्या...
ओबीसी समाजाची जात निहाय जणगणना करुन लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्या...
कराड दि.27 (प्रतिनिधी) ओबीसींची जनगणना न करणाऱ्या सरकारचा निषेध व्यक्त करीत राज्य सरकार मुर्दाबाद, ओबीसींच्या आरक्षणाला संरक्षण मिळालेच पाहिजे, शिक्षणाचे खाजगीकरण बंद करा, शिक्षणाचे राष्ट्रीयकरण झालेच पाहिजे,शिक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं अशा घोषणा देत ओबीसी समाजाची जात निहाय जणगणना करुन लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळावे यासह विविध मागण्यासाठी आज सातारा जिल्हा ओबीसी संघटनेच्या कराड तालुक्याच्यावतीने तहसिलदार कचेरीवर मोर्चा काढण्यात आला.यावेळी मागण्यांचे निवदेन तहसिलदार कचेरीत देण्यात आले.
अनेक प्रकरणात सुप्रिम कोर्टाने ओबीसीची निश्चित आकडेवारी मागितली. १९३१ ची आकडेवारी कोर्टाने ग्राहय मानली नाही. केंद्र सरकारने ओबीसीच्या आकडेवारीचा डाटा कोर्टाला दिला नाही. त्यामुळे ओबीसीचे राजकीय आरक्षण धोक्यात आले होते. या व इतर अनेक महत्वपूर्ण कारणामुळे ओबीसींची जनगणना आवश्यक असून अनेक वर्षापासूनची मागणी असुन ती जातीनिहाय व्हावी अशी मागणी निवेदनात केली आहे.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ओबीसींना आरक्षण मिळण्यात ४० वर्षे गेली. आरक्षण मिळून ३० वर्षे झाली तरी ओबीसींचे मागासलेपण गेले नाही. याला सत्ताधारी समाज जबाबदार आहे. गरीबाना गरीबच ठेवण्याचे तंत्र राज्यकर्त्यांनी अवलंबले आहे. असे ओबीसी समाजाला वाटू लागले आहे. मंडल आयोगाच्या सर्व शिफारशीची अंमलबजावणी केली असती तर भूमीहिनांना पडीक जमिनीचे वाटप झाले असते. भटक्या समाजाला घरे देवून त्यांना स्थायिक करता आले असते. ओबीसींचा नोकर्यातील कोठा पूर्ण करुन त्यांना समाजाच्या प्रवाहाबरोबर आणता आले असते. राज्यकर्त्यांनी हे आजपर्यंत केले नाही. म्हणून जातीनिहाय जनगणना करून ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थेबरोबरच विधानसभा व लोकसभेमध्ये सुध्दा लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधीत्व मिळावे. तसेच ओबीसी आर्थिक विकास महामंडळ स्थापन व्हावे.
यासाठी जातीनिहाय जनगणना होणे आवश्यक आहे. ती यावेळी न झाल्यास ओबीसी समाज आक्रमक होवन आंदोलन करेल असे ही निवदेनात म्हंटले आहे.या निवेदनावर जिल्हाध्यक्ष भरत लोकरे, जिल्हा उपाध्यक्ष भानुदास वास्के, कराड शहर अध्यक्ष अक्षय कुरकुले (गवळी), कराड शहर महिला अध्यक्षा सौ. प्रिया आलेकरी,नंदकूमार बटाणे, रविंद्र मुंढेकर,उदय हिंगमिरे, संदीप मुंढेकर, दत्ता तारळेकर, सतिश भोंगाळे,सचिन गायकवाडसर यांच्यासह मोठ्यासंख्येने समाजातील नागरिक ऊपस्थित होते.
Comments
Post a Comment