कराड नगरपरिषदेचा दिल्लीत डंका;सांडपाणी प्रकल्पाचे सादरीकरण...


कराड नगरपरिषदेचा दिल्लीत डंका;सांडपाणी प्रकल्पाचे सादरीकरण...

कराड दि.30 (प्रतिनिधी) कराड शहराचा डंका पून्हा एखदा दिल्ली दरबारी वाजला आहे.48 (1974 साली) वर्षापूर्वी तत्कालिन नगराध्यक्ष स्व.पी डी पाटील यांनी शहरात भूयारी गटर संकल्पना प्रत्यक्षात कार्यान्वित केली.आज त्याच भूयारी गटर योजनेच्या माध्यमातून उभा राहिलेल्या सांडपाणी प्रकल्प देशासाठी मार्गदर्शक ठरु पाहत आहे.याचेच उदाहारण आज संपूर्ण देशाने पाहिले.सबंधित प्रकल्पातून प्रक्रिया केलेल्या पाण्याचा शेती साठी वापर केला जात असल्याचे सादरीकरण नगरपरिषदेच्या वतीने आज दिल्लीत करण्यात आल्याने कराडचे नाव देशपातळीवर आधोरिकेत झाले आहे.स्व. पी डी पाटील यांच्या दूरदृष्टीचे यानिमित्ताने कौतूक होत आहे.

केंद्रीय नगरविकास राज्य मंत्री कौशल किशोर यांनी प्रत्यक्ष सादरीकरण ऐकल्यानंतर कराड नगरपरिषदेचे विशेष कौतूक केले.यावेळी केंद्रीय नगरविकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी, देशभरातील विविध राज्याचे IAS अधिकारी, राज्यातील विविध महापालिका, नगरपालिकांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कराड नगरपरिषद देशात स्वच्छ सर्वेक्षण अभियानात अव्वल ठरल्याने कराड नगर परिषदेस दिल्ली येथे गेली दोन दिवस सुरू असलेल्या कार्यक्रमात राबवलेल्या उपक्रमाबद्दल माहिती देण्याची संधी मिळाली. या भुयारी गटार योजनेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या सांडपाणी प्रक्रियातून बाहेर पडणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर शेतीसाठी केला जात असल्याच्या पार्श्वभूमीवर स्वच्छ सर्वेक्षण अभियानात समन्वयक म्हणून काम करणाऱ्या आशिष रोकडे यांनी आज या प्रकल्पाविषयी एका परिसंवादात महत्त्वपूर्ण सादरीकरण करुन संपूर्ण देशाला कराड सारख्या ग्रामीण भागातील या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची माहिती दिली.

कराड नगर परिषदेने स्वच्छ सर्वेक्षण अभियान स्पर्धा सुरू झाल्यापासून देशपातळीवर आपल्या कामाची छाप पडली  आहे. सलग दोन वर्षे देशात प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या कराड नगर परिषदेने याही वर्षी अव्वल स्थान पटकावले आहे. याच निमित्ताने दिल्ली येथे काल व आज स्वच्छ सर्वेक्षण अभियान अंतर्गत प्रदर्शन व परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. आणि याच परिसंवादात देशभरातील नामवंतांच्या तसेच केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत कराड नगर परिषदेने राबवलेल्या उपक्रमांची माहिती देण्यासाठी कराड नगर परिषदेला मान मिळाला. 

यावेळी नगरपरिषदेच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात महत्वपूर्ण अशी समन्वयकाची भूमिका बजावणाऱ्या आशिष रोकडे यांनी आज सादरीकरण केले. यावेळी कराड नगर परिषदेचे आरोग्य अभियंता आर.डी. भालदार, जलनिष्सारण विभागाचे अभियंता ए आर पवार, नगर परिषदेचे वरिष्ठ मुकादम मारुती काटरे हे यावेळी त्या समारंभात सहभागी झाले होते.

स्वच्छ सर्वेक्षण अभियान स्पर्धेत कराड नगरपरिषद सलग चौथ्या वर्षी देशात अव्वल ठरली आहे.याचा उद्या पारितोषिक वितरण समारंभ आयोजित केला आहे.देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांच्या हस्ते कराड नगर परिषदेचा  सन्मान होणार आहे. हा सन्मान  मुख्याधिकारी रमाकांत डाके व नगरपरिषद अधिकारी स्वीकारणार आहेत.


दिल्ली येथे आयोजित कार्यक्रम व प्रदर्शनातील काही क्षणचित्रे...


केंद्रीय नगरविकास राज्य मंत्री कौशल किशोर यांचे समवेत आरोग्य अभियंता आर डी भालदार, ए आर पवार,अशिष रोकडे....











Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक