मुंबईतील प्रदर्शनात कराड नगरपरिषदेच्या स्टाॅलला मुख्यमंत्र्यांची भेट....
मुंबईतील प्रदर्शनात कराड नगरपरिषदेच्या स्टाॅलला मुख्यमंत्र्यांची भेट...
कराड नगरपरिषदेत अद्रिशा बायोलाॅजिकच्या मदतीने राबवण्यात आलेल्या ओल्या कचर्याचे निमूर्लन करणार्या प्रकल्पाची माहिती मुख्याधिकारी डाके यांनी प्रदर्शनात मुख्यमंत्र्यांना दिली.कचरा निमूर्लनात महत्वाची भूमिका बजावणार्या बीएसएफ आळ्यांची पाहणी यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी केली.
स्वच्छ सर्वेक्षण अभियान पारितोषिक वितरण समारंभ तसेच स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत गेली दोन दिवस दिल्ली व मुंबई येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे या दोन्ही ठिकाणी विविध नगरपरिषदांचे प्रदर्शन ही भरवण्यात आले आहे कराड नगर परिषदेने मुंबई येथे भरवण्यात आलेल्या प्रदर्शनात भाग घेतला असून प्रदर्शनातील स्टॉलवर आज मुख्यमंत्र्यांनी भेट देऊन पाहणी केली. प्रदर्शनात आलेल्या अनेकांनी कराड नगरपरिषदने मांडलेल्या कलाकृती, विविध उपक्रमांच्या प्रतिकृती पाहत माहिती घेतली.
यावेळी मुख्याधिकारी रमाकांत डाके, नगर परिषदेचे अधिकारी शुभांगी पवार तसेच गणेश जाधव, सुधीर खर्जुले, प्रमोद जगदाळे, अमित कांबळे, पुनम गव्हाणे, आनंद डांगे, श्रीकांत लोहार, सुजित साळुंखे, प्रताप पाटील, सुधीर एकांडे यावेळी उपस्थित होते.

Comments
Post a Comment