जिल्ह्यात 81 गावांमध्ये लंपी त्वचा रोगाचा प्रादुर्भाव; 99 जनावरे नियमित औषध उपचाराने बरी...
सातारा जिल्ह्यात आज 13 बाधिताची वाढ ...
कराड दि.25 (प्रतिनिधी) सातारा जिल्ह्यात आज आलेल्या आवाहलात 13 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर आज दिवसभरात 12 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यातील सक्रिय रूग्णसंख्या आता 50 झाली असून सध्या 2 गंभीर रुग्ण तर 6 रूग्णांवर विविध हाॅस्पिटलमध्ये उपचार सूरू आहेत.
सातारा जिल्ह्यात आज जाहीर केलेल्या तालुकानिहाय रिपोर्टनुसार... जावली-1, कराड-0, खंडाळा- 0, खटाव- 1, कोरेगाव-1, माण-0, महाबळेश्वर-0, पाटण-0, फलटण-1, सातारा-8, वाई-1, इतर 0 असे 13 बाधितांची वाढ झाली आहे.
नमूने-चाचणी-190 (एकूण-26 लाख 22 हजार 192)
आज बाधित वाढ- 13 (एकूण-2 लाख 80 हजार 634)
आज कोरोनामुक्त- 12 (एकूण-2 लाख 73 हजार 843)
आज मृत्यू- 0 (एकूण-6 हजार 719)
उपचारार्थ रूग्ण-50
गंभीर रुग्ण--2
रूग्णालयात उपचार -6
जिल्ह्यात 81 गावांमध्ये लंपी त्वचा रोगाचा प्रादुर्भाव; 99 जनावरे नियमित औषध उपचाराने बरी...
सातारा जिल्ह्यात फलटण, सातारा, खटाव, कराड, पाटण, कोरेगाव, माण, खंडाळा, जावली व वाई असे 10 तालुक्यातील 81 गावांमध्ये लंपी त्वचा रोगाची लागण झाली आहे. आज अखेर गाय 934 व 122 बैल असे एकूण 1056 जनावरांस लंम्पी रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. तसेच आज जिल्हयामध्ये 9 जनावरांचा मृत्यु झाला असून (आजअखेर 48 गायी + 14 बैल असे एकूण 62 पशुधन मृत झाले आहे ) आजअखेर 93 गाई व 6 बैल असे एकूण 99 जनावरे नियमित औषध उपचाराने बरी झालेली आहेत, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. अंकुश परिहार यांनी दिली आहे.
लंम्पी चर्म रोग उपचारासाठी आवश्यक असलेली सर्व आवश्यक औषधे, शासकीय पशुवैद्यकीय दवाखाने आणि तालुका लघु पशुचिकीत्सालायांमध्ये उपलब्ध आहेत. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार बाधित क्षेत्राच्या ५ किमी परिघातील एकूण 463 गावातील 1 लाख 51 हजार 256 पशुधनास लसीकरण करण्यात येत आहे.
लंपी त्वचा रोग औषधोपचाराने बरा होत असल्याने पशुपालकांनी रोग प्रादुर्भावाची लक्षणे आढळून आल्यास त्यांची माहिती तात्काळ नजीकच्या पशुवैदयकीय दवाखान्यात अथवा पशुसंवर्धन विभागाच्या टोल फ्री क्र.18002330418 अथवा राज्यस्तरीय कॉल सेंटर मधील पशुसेवेचा टोल फ्री क्र. 1962 यावर तात्काळ संपर्क साधावा.
आजमितीस सातारा जिल्ह्याकडे 2,81,900 एवढ्या लस मात्रा उपलब्ध असून यांमधुन आजअखेर बाधित क्षेत्रातील गावांमध्ये 145852 व इतर अबाधित क्षेत्रातील गावांमध्ये 69806 असे एकूण 215658 पशुधनाचे लसीकरण पुर्ण करण्यात आले आहे.
जिल्हयामध्ये खाजगी पशुवैद्दकीय सेवादाते यांचेमार्फतही लंपी चर्म रोगाचे लसीकरण करणेबाबत मा. जिल्हाधिकारी यांनी आदेश पारित केले असुन सर्व निरोगी पशुधनास लसीकरणाचे कामकाज वेगाने करण्यात येत आहे.

Comments
Post a Comment