Posts

Showing posts from August, 2022

गेल्या चोविस तासात देशात व राज्यात कोरोना बाधित नव्या रुग्णांची मोठी वाढ.....

Image
  सातारा जिल्ह्यात 12 बाधिताची वाढ ... कराड दि. 31 (प्रतिनिधी) सातारा जिल्ह्यात आज आलेल्या आवाहलात जिल्ह्यात 12 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर आज दिवसभरात 0 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यातील सक्रिय रूग्णसंख्या आता 37 झाली असून सध्या 8 रूग्णांवर विविध हाॅस्पिटलमध्ये उपचार सूरू आहेत. तर 5  रुग्ण  गंभीर   आहे. सातारा जिल्ह्यात आज जाहीर केलेल्या तालुकानिहाय रिपोर्टनुसार... जावली-2,  कराड-2,  खंडाळा- 0, खटाव- 3, कोरेगाव-1, माण-1, महाबळेश्वर-0, पाटण-0, फलटण-2, सातारा-0, वाई-0, इतर 1 असे 12 बाधितांची वाढ झाली आहे. नमूने-चाचणी- 348 (एकूण-26 लाख 16 हजार 542) आज बाधित वाढ- 12 (एकूण-2 लाख 80 हजार 387) आज कोरोनामुक्त- 0 (एकूण-2 लाख 73 हजार 613) आज मृत्यू- 0 (एकूण-6 हजार 715) उपचारार्थ रूग्ण-37 गंभीर रुग्ण--5 रूग्णालयात उपचार -8 राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत गेल्या 24 तासांत 1  हजार  600 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. 1 हजार 864 जण आज कोरोनामुक्त झाले. तर 5 कोरोना बाधिताचा मृत्यू झाला आहे.  राज्यात 10  हजार 633 रुग्ण सक्रिय आहेत.आज मुंबईत...

कराड नगरपरिषद कर्मचार्‍यांनी बनवली रद्दीतील कागदापासून गणेश मूर्ती....

Image
नगरपरिषद कर्मचार्‍यांनी बनवली रद्दीतील कागदापासून गणेश मूर्ती.... कराड दि.31 (प्रतिनिधी) कराड नगरपालिकेचे कर्मचारी गेल्या अनेक वर्षापासून स्वच्छ सर्वेक्षण, माजी वसुंधरा अभियान असो किंवा अन्य उपक्रमात टाकाऊ वस्तु पासून टिकाऊ वस्तू व सुंदर कलाकृती करून त्याच्या माध्यमातून नागरिकांना विविध संदेश देण्याचा काम करीत आहेत. असाच संदेश यावर्षी गणेशोत्सवात या कर्मचाऱ्यांनी दिला आहे. चक्क कागदाच्या रद्दीपासून आकर्षक गणेश मूर्ती तयार केली आहे. पालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके, आरोग्य अभियंता आर डी भालदार, आरोग्य निरिक्षक मिलिंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ मुकादम मारुती काटरे यांच्या सूचनेनूसार कर्मचार्‍यांतील कलाकार किशोर कांबळे यांच्यासह सोनू चव्हाण, योगेश उथळे, सागर सातपूते, श्रीकांत कांबळे, भास्कर काटरे, अतूल माने व अन्य आरोग्य कर्मचाऱ्यांनी मिळून ही मूर्ती बनवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. कराड नगरपालिकेच्या माध्यमातून पर्यावरण पूरक गणेश उत्सव साजरा करण्यासाठी विविध उपक्रमाच्या आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शाडूच्या मूर्ती बनवण्याची कार्यशाळा ही घेतली होती. या कार्यशाळेत उत्स्फूर्त प...

सोशल मिडियातील मेसेजमुळे रक्तदात्यांची रूग्णालयात धाव....

Image
कृष्णा रूग्णालयात रक्तदान करताना अनिकेत पाटील व नदीम आवटे.... केवळ सोशल मिडियातील मेसेजमुळे रक्तदात्यांची रूग्णालयात धाव.... कराड दि.31 (प्रतिनिधी) समाजाचे आपण काहीतरी देणं लागतो, याच भावनेने एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याला मदत व्हावी या उद्देशाने कालपासून मोठी करण्यात आली व त्याला सोशल मिडियामुळे चांगलं यश ही आलं.ज्या विद्यार्थ्याला तो शिकत असलेल्या महाविद्यालयात अर्धांग वायूचा झटका आला त्या विद्यार्थ्याला रूग्णालयात मदत करणे हे आपल्या सारख्या सुज्ञ व जागरूक समाज उपयोगी व्यक्तीचं कर्तव्य आहे, आणि ते आपण पार पाडलंच पाहिजे. समाजात अशा दररोज शेकडो घटना घडतात कधी त्या आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत. परंतु ज्या पोहोचतात त्या मध्ये आपले योगदान देणं हे आपलं कर्तव्य आहे याच भावनेतून गणेश उत्सवाच्या धामधूमीत एकास मोठी मदत झाली.रक्तदाते आमच्यासाठी देवदूत म्हणून मदतीस आल्याबद्दल आष्टेकर व पोळ कूटूंबियांनी रक्तदात्यांचे आभार मानले आहेत. अभिषेक विजय पोळ (वय 17),  याच्या सर्वांगाला 20 दिवसापूर्वी कराडच्या यशवंतराव चव्हाण कॉलेजमध्ये अचानक लकवा मारला गेला होता. त्यावेळी तेथिल शिक्षकांनी त्याला कृष्णा...

उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मिळणार पुरस्कार....

Image
  उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मिळणार पुरस्कार.... स्पर्धेत सहभागी होण्यासाठी २ सप्टेंबर २०२२ पर्यंत अर्ज करता येणार- सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती... मुंबई, दि.31: राज्य शासनाने दि. ३१ ऑगस्ट २०२२ पासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाकरीता राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना स्पर्धा घेऊन पुरस्कार देण्याचा निर्णय सांस्कृतिक कार्य विभागामार्फत घेण्यात आला आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी अर्ज करण्यास २ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. श्री. मुनगंटीवार म्हणाले की, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना यापूर्वी ३० ऑगस्ट २०२२ पर्यंतची मुदत देण्यात आली होती,परंतु वाढता प्रतिसाद आणि मुदतवाढीची मागणी विचारात घेऊन  सदर ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत आता २ सप्टेंबर करण्यात येत आहे.  राज्यस्तरावरील प्रथम क्रमांकास रुपये पाच लाख, द्वितीय क्रमांकास रुपये दोन लाख ५० हजार आणि तृतीय क्रमांकास रुपये एक लाख इतक्या रकमेचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन मंडळांना गौरव...

दिलासादायक;आज देशात व राज्यात कोरोनामुक्तीचा आलेख वाढला......

Image
  सातारा जिल्ह्यात 10 बाधिताची वाढ ... कराड दि. 30 (प्रतिनिधी) सातारा जिल्ह्यात आज आलेल्या आवाहलात जिल्ह्यात 10 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर आज दिवसभरात 18 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यातील सक्रिय रूग्णसंख्या आता 31 झाली असून सध्या 11 रूग्णांवर विविध हाॅस्पिटलमध्ये उपचार सूरू आहेत.6  रुग्ण  गंभीर   आहे. सातारा जिल्ह्यात आज जाहीर केलेल्या तालुकानिहाय रिपोर्टनुसार... जावली-0,  कराड-0,  खंडाळा- 0, खटाव- 1, कोरेगाव-0, माण-0, महाबळेश्वर-1, पाटण-0, फलटण-1, सातारा-5, वाई-0, इतर 1 असे 10 बाधितांची वाढ झाली आहे. नमूने-चाचणी- 309 (एकूण-26 लाख 16 हजार 194) आज बाधित वाढ- 10 (एकूण-2 लाख 80 हजार 375) आज कोरोनामुक्त- 18 (एकूण-2 लाख 73 हजार 613) आज मृत्यू- 0 (एकूण-6 हजार 715) उपचारार्थ रूग्ण-31 गंभीर रुग्ण--6 रूग्णालयात उपचार -11 राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत गेल्या 24 तासांत 1  हजार  444 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. 2 हजार 6 जण आज कोरोनामुक्त झाले. तर 8 कोरोना बाधिताचा मृत्यू झाला आहे.  राज्यात 10  हजार 902 रुग्ण सक्रिय आहेत. देशात गेल्...

सातारा जिल्ह्यात गणेश उत्सवातील काही दिवस वाद्य वाजवण्यास सूट...

Image
  सातारा जिल्ह्यात उत्सवातील काही दिवस वाद्य वाजवण्यास सूट.... सातारा दि. 30 : सातारा जिल्ह्यात यावर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यास प्रशासनाने परवानगी दिली असून ध्वनीक्षेपक वापरण्यास ठराविक दिवशी सूट देण्यात आली आहे.तसेच आवाजावर मर्यादा घालण्यात आल्या असून नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर पोलिसांची कारवाई होणार आहे. काही दिवस डॉल्बीला परवानगी मिळणार का? या आशेवर गणेश मंडळाचे कार्यकर्ते होते, मात्र न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेनूसार ध्वनी प्रदूषण नियम 2000 मध्ये आवाजाची असणारी मर्यादा घालून डाॅल्बीसह अन्य वाद्य वाजवण्यास तसेच आवाजाचे ऊल्लंंघनास प्रतिबंध करण्यात आले आहे. सातारा जिल्ह्यामध्ये दि. 31 ऑगस्ट 2022 रोजीच्या सकाळी 7 वा.पासून ते दि. 10 सप्टेंबर 2022 रोजीच्या 10 वाजेपर्यंत या कालावधीसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नियमानुसार ध्वनी प्रदूषण नियमानुसार व आवाजाच्या घालून दिलेल्या तीव्रतेबाबतच्या नुसार ध्वनीक्षेपक, ध्वनीवर्धक, डॉल्बी आवाजाचे उल्लंघन करणाऱ्या चालक-मालक, धारक तसेच संबंधित गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्यावर नियमानुसार पोलीस कारवाई होणार असल्याचे आदेशात ...

वाठारची पाणीयोजना आदर्शवत करा : आ. पृथ्वीराज चव्हाण...

Image
  वाठार : येथील पाणीयोजनेच्या भूमिपूजन प्रसंगी आ. पृथ्वीराज चव्हाण, समवेत गजानन आवळकर, अविनाश पाटील व इतर... वाठारची पाणीयोजना आदर्शवत करा : आ. पृथ्वीराज चव्हाण... कराड दि. 30-: वाठार गावाला होणारी पाणीयोजना महत्वाची व ग्रामस्थांचे आरोग्य टिकवणारी योजना आहे. जागतिक बँकेच्या सहकार्यातून मी मुख्यमंत्री असताना तालुक्यात सहा गावच्या योजना केल्या. त्यामधील रेठरे बुद्रुकची योजना अजूनही रेंगाळत पडली आहे. मी उंडाळे प्रादेशिक योजना जिवंत करण्यासाठी प्रयत्न केले. यावर्षीपासून टप्प्याटप्प्याने उंडाळे प्रादेशिक योजना कार्यान्वित होणार आहे, असे सांगून वाठारला योजना आणण्यासाठी गेली सात वर्षे आमचे प्रयत्न सुरू होते. मलकापूरप्रमाणे ही योजना राबवावी. व आदर्शवत करावी. असे मत माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. वाठार (ता. कराड) येथे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून जलजीवन मिशन अंतर्गत २४ बाय ७ नळ पाणीपुरवठा योजनेच्या साडेपाच कोटी रुपये कामाच्या भूमिपूजन समारंभात ते बोलत होते. संयोजक गजानन आवळकर, कराड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, प्रा. धनाजी काटकर,...

कराडला आयजींची भेट;गणेश विसर्जन स्थळ,मार्गाची केली पाहणी...

Image
कराडला आयजींची भेट;गणेश विसर्जन स्थळ,मार्गाची केली पाहणी... कराड दि.30 (प्रतिनिधी) गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज कुमार लोहिया यांनी कराड शहरातील गणेश विसर्जन मार्गासह कृष्णा घाटावरील विसर्जन स्थळाची पाहणी केली.यावेळी लोहिया यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना काही सूचनाही केल्या. कोरोना नंतर हा गणेश उत्सव मोठ्या आनंदाने साजरा होणार असून सार्वजनिक गणेश मंडळांनी जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या नियमावलीनुसार उत्सव साजरा करत पोलीस प्रशासनास सहकार्य करून हा उत्सव उत्साहात साजरा करावा असे आव्हान ही यावेळी माध्यमांशी बोलताना लोहिया यांनी केले. यावेळी सातारा जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोर्‍हाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.रणजीत पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी आर पाटील, वाहतूक विभागाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सरोजिनी पाटील, कराड नगरपालिकेचे अभियंता मुरलीधर धायगुडे, आरोग्य अभियंता आर डी भालदार उपस्थित होते.

भाजपाचे बाईक रॅलीतून कराडमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन

Image
भाजपाचे बाईक रॅलीतून कराडमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन कराड,दि.30 : सन २०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची तयारी भारतीय जनता पार्टीने आत्तापासूनच सुरु केली आहे. याचाच एक भाग म्हणून सातारा लोकसभा मतदारसंघाच्या विशेष दौऱ्यावर आलेले केंद्रीय वाणिज्य तथा उद्योग राज्यमंत्री सोम प्रकाश यांच्या प्रमुख उपस्थितीत कराड शहरातून भव्य बाईक रॅली काढण्यात आली. या बाईक रॅलीच्या निमित्ताने भाजपाने कराडमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन केले.  ढेबेवाडी फाट्यापासून बाईक रॅलीचा प्रारंभ करण्यात आला. रॅलीच्या अग्रस्थानी असलेल्या वाहनात केंद्रीय राज्यमंत्री सोम प्रकाश, भाजपा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले, जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे, प्रदेश सचिव विक्रम पावसकर, धैर्यशील कदम, रामकृष्ण वेताळ आदी मान्यवर उभे होते.  भारत माता की जय अशा घोषणात देत निघालेली ही बाईक रॅली कोल्हापूर नाका, दत्त चौक, चावडी चौक मार्गे प्रीतिसंगम घाटावर पोहचली. त्याठिकाणी ना. सोम प्रकाश यांनी लोकनेते स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाला पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले. तसेच रॅली दरम्यान महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत...

लोकसभा निवडणुकीत विजयाचा उत्तुंग इतिहास रचला जाईल : ना. सोम प्रकाश...

Image
आटके : भाजप कराड दक्षिणच्यावतीने आयोजित महिला संवाद मेळाव्याला संबोधित करताना केंद्रीय वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री सोम प्रकाश... लोकसभा निवडणुकीत विजयाचा उत्तुंग इतिहास रचला जाईल : ना. सोम प्रकाश... भाजपाच्या कराड दक्षिणेतील महिला संवाद मेळाव्याला महिलांचा उदंड प्रतिसाद... कराड, दि.30 : देशाची अखंडता व एकता कायम ठेऊन, भारताला जगात शक्तिशाली बनविण्याचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यरत आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत साताऱ्यासह देशातील सर्वच लोकसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार विजयी होतील आणि विजयाचा उत्तुंग इतिहास रचला जाईल, असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य तथा उद्योग राज्यमंत्री सोम प्रकाश यांनी केले. भाजपा कराड दक्षिणच्यावतीने आटके टप्पा येथील विराज मल्टिपर्पज हॉलमध्ये आयोजित महिला संवाद मेळावा उदंड प्रतिसादात पार पडला. याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर भाजपा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले, जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे, आ. शिवेंद्रराजे भोसले, प्रदेश सचिव विक्रम पावसकर, धैर्यशील कदम, रामकृष्ण वेताळ, कृष्णा महिला औद्योगिक संस्थेच्या संस्थापिका सौ. उत्तरा भोसले, भा...

दिलासा;आज देशात व राज्यात बाधित वाढ घटली;कोरोनामुक्ती वाढली....

Image
  सातारा जिल्ह्यात 5 बाधिताची वाढ ... कराड दि. 29 (प्रतिनिधी) सातारा जिल्ह्यात आज आलेल्या आवाहलात जिल्ह्यात 5 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर आज दिवसभरात 9 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यातील सक्रिय रूग्णसंख्या आता 33 झाली असून सध्या 8 रूग्णांवर विविध हाॅस्पिटलमध्ये उपचार सूरू आहेत.4  रुग्ण  गंभीर   आहे. सातारा जिल्ह्यात आज जाहीर केलेल्या तालुकानिहाय रिपोर्टनुसार... जावली-2,  कराड-1,  खंडाळा- 0, खटाव- 0, कोरेगाव-0, माण-0, महाबळेश्वर-0, पाटण-0, फलटण-0, सातारा-2, वाई-0, इतर 0 असे 5 बाधितांची वाढ झाली आहे. नमूने-चाचणी- 85 (एकूण-26 लाख 15 हजार 885) आज बाधित वाढ- 5 (एकूण-2 लाख 80 हजार 365) आज कोरोनामुक्त- 9 (एकूण-2 लाख 73 हजार 595) आज मृत्यू- 0 (एकूण-6 हजार 715) उपचारार्थ रूग्ण-33 गंभीर रुग्ण--4 रूग्णालयात उपचार -8 राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत गेल्या 24 तासांत 810 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे.1 हजार 12 जण आज कोरोनामुक्त झाले. तर 5 कोरोना बाधिताचा मृत्यू झाला आहे.  राज्यात 11  हजार 472 रुग्ण सक्रिय आहेत. देशात गेल्या 24 तासांत 7 हजार 591 नवीन...

सातारा जिल्ह्यामध्ये डॉल्बी सिस्टीम वापरण्यास प्रतिबंध...

Image
सातारा जिल्ह्यात डॉल्बी सिस्टीम वापरण्यास प्रतिबंध... सातारा दि. 29 : सातारा जिल्ह्यात यावर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यास प्रशासनाने परवानगी दिली असली तरी डॉल्बीला मात्र मनाई करण्यात आली आहे.गेली काही दिवस डॉल्बीला परवानगी मिळणार का? या आशेवर गणेश मंडळाचे कार्यकर्ते होते, मात्र आज जिल्हाधिकारी यांनी डॉल्बी वापरण्यास मनाई करण्यात येत असल्याचे आदेश जारी केले आहेत. सातारा जिल्ह्यामध्ये दि. 31 ऑगस्ट 2022 रोजीच्या सकाळी 7 वा.पासून ते दि. 10 सप्टेंबर 2022 रोजीच्या 10 वाजेपर्यंत या कालावधीसाठी डॉल्बी मालक/धारक/गणेश मंडळाचे पदाधिकारी यांना त्याच्या कब्जातील डॉल्बी सिस्टिीम वापरात/उपयोगात आणू नये तसेच डॉल्बी मशिन व त्यासंबंधीची यंत्रसामुग्री स्वत:चे कब्जात सिलबंद स्थितीत ठेवावी यासाठी जिल्हादंडाधिकारी रुचेश जयवंशी यांनी क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 (1) प्रमाणे त्यांचे कब्जातील डॉल्बी सिस्टीम वापरण्यास प्रतिबंध आदेश जारी केले.

कराडचे तलाठी सागर पाटील अडकले लाचलुचपत पथकाच्या जाळ्यात....

Image
कराडचे तलाठी सागर पाटील अडकले लाचलुचपत पथकाच्या जाळ्यात....  कराड दि.-30-(प्रतिनिधी) कराडात ऑनलाईन सातबारा उताऱ्यावर नाव दुरुस्ती करण्यासाठी कराडचे तलाठी सागर पाटील यांनी 40 हजार रुपयांचे लाच मागितल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई करण्यात आल्याने पुन्हा एकदा कराड तलाठी ऑफिस चर्चेत आले आहे. यापूर्वीही या तलाठी कार्यालयातील कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात आली होती. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार कराडचे तलाठी सागर पाटील यांनी तक्रारदार व त्यांचे नातेवाईक यांनी खरेदी केलेल्या सर्वे नंबर 348/3 या प्लॉटवर तक्रारदार व त्यांचे नातेवाईक यांच्या ऑनलाइन सातबारा उताऱ्यावर नाव दुरुस्ती करण्यासाठी तलाठी यांनी 40 हजार रुपयांची मागणी केली होती. संबंधित मागणीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी ही केली होत त्यानंतर संबंधित विभागाचे सातारा पोलीस निरीक्षक विक्रम पवार, पो.ना प्रशांत ताटे, विशाल खरात या पथकाने ही कारवाई केली आहे त्यानुसार कराड शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केंद्राच्या योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करा-केंद्रीय वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री सोम प्रकाश.

Image
  केंद्राच्या योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करा-केंद्रीय वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री सोम प्रकाश... केंद्र शासनाच्या विविध योजनांचा घेतला आढावा... सातारा दि. 29 : सर्व सामान्य माणूस केंद्र बिंदू माणून केंद्र शासनाच्या विविध योजनांची अधिकाऱ्यांनी जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करुन सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याचे काम करावे, असे निर्देश केंद्रीय वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री सोम प्रकाश यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात केंद्रीय वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री सोम प्रकाश यांनी केंद्रीय योजनाचा आढावा घेतला. यावेळी सोम प्रकाश बोलत होते. या बैठकीला खा. श्रीनिवास पाटील, आ. छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अतुल भोसले यांच्यासह विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते. प्रत्येक गरीब कुटुंबाला हक्काचे घर असणे महत्वाचे आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतून गरीब कुटुंबाना पक्के घर मिळत आहे. या योजनेची जास्तीत जास्त प्रकरणे मंजूर करावीत. तसेच जी प्रकरणे ना मंजूर झाले आहेत...

दक्षिण मांड नदीवरील पुलामुळे काले गावचा परिसर सुधारेल : आ. पृथ्वीराज चव्हाण....

Image
काले : येथील दक्षिण मांड नदीवरील पुलाच्या उद्धघटनप्रसंगी आ. पृथ्वीराज चव्हाण, सोबत पै. नानासाहेब पाटील, मनोहर शिंदे, जयवंतराव जगताप व इतर मान्यवर.... दक्षिण मांड नदीवरील पुलामुळे काले गावचा परिसर सुधारेल : आ. पृथ्वीराज चव्हाण.... कराड दि.29 (प्रतिनिधी) : काले येथे दक्षिण मांड नदीवर कमी उंचीचा पुल असल्याने या विभागातील लोकांना अनेक अडचणी यायच्या. दळणवळण करताना लोकांना जीवघेणे प्रसंग यायचे. या अडचणीतून लोकांना बाहेर काढण्यासाठी उंच पुल व्हावा, याकरिता मी प्रयत्न केले. आज उंच पुलाच्या उभारणीमुळे या विभागाचे अर्थकारण बदलणार असून, या कामाचे मला मोठे समाधान आहे. असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. काले (ता. कराड) येथे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून दक्षिण मांड नदीवर उंच पुल, पोहच मार्ग व संरक्षक भिंत उभारणी तसेच बंदिस्त गटार अशा सुमारे पाच कोटी रुपयांच्या विकासकामांच्या उद्धघाटन समारंभात ते बोलत होते. कराड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, प्रा. धनाजी काटकर, जयवंतराव उर्फ बंडानाना जगताप, शिवराज मोरे, इंद्रजित चव्हाण, संयोजक पै. नानासाह...

दिलासा; गेल्या 24 तासांत देशात व राज्यातील कोरोनामुक्ती वाढली....

Image
  सातारा जिल्ह्यात 3 बाधिताची वाढ ... कराड दि. 28 (प्रतिनिधी) सातारा जिल्ह्यात आज आलेल्या आवाहलात जिल्ह्यात 3 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर आज दिवसभरात 4 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यातील सक्रिय रूग्णसंख्या आता 36 झाली असून सध्या 5 रूग्णांवर विविध हाॅस्पिटलमध्ये उपचार सूरू आहेत.2  रुग्ण  गंभीर   आहे. सातारा जिल्ह्यात आज जाहीर केलेल्या तालुकानिहाय रिपोर्टनुसार... जावली-0,  कराड-1,  खंडाळा- 0, खटाव- 0, कोरेगाव-0, माण-1, महाबळेश्वर-0, पाटण-1, फलटण-0, सातारा-0, वाई-0, इतर 0 असे 3 बाधितांची वाढ झाली आहे. नमूने-चाचणी- 160 (एकूण-26 लाख 15 हजार 800) आज बाधित वाढ- 3 (एकूण-2 लाख 80 हजार 360) आज कोरोनामुक्त- 7 (एकूण-2 लाख 73 हजार 582) आज मृत्यू- 0 (एकूण-6 हजार 715) उपचारार्थ रूग्ण-36 गंभीर रुग्ण--2 रूग्णालयात उपचार -5 राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत गेल्या 24 तासांत 1 हजार 639 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे.1 हजार 698 जण आज कोरोनामुक्त झाले. तर 5 कोरोना बाधिताचा मृत्यू झाला आहे.  राज्यात 11  हजार 679 रुग्ण सक्रिय आहेत. देशात गेल्या 24 तासांत 9 हजार...

कराडात मंत्री शंभूराज देसाई यांच्या कडून अधिकार्‍यांना झापाझापी....

Image
साहेब मी नवीन आहे;मग घरी जा;मंत्री शंभूराज देसाई... कराड दि.28 (प्रतिनिधी) आपल्या नेहमीच्या फटकळ स्वभावाचा आज पुन्हा एकदा मंत्री शंभूराजे देसाई यांनी झलक दाखवली. वर्षभरानंतर कराडच्या विश्रामगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत मंत्री देसाई यांनी त्यांच्या राज्य उत्पादन शूल्क विभागातील एका अधिकाऱ्याला चांगलच झापलं. निमित्त होतं विश्रामगृहातील विद्युत पुरवठा खंडित होण्याचा मात्र याचा राग मंत्री देसाई यांनी त्यांच्याच खात्यातील अधिकाऱ्यावर काढत त्या अधिकाऱ्याला घरी जाण्याचा सल्लाच त्यांनी दिला. मुख्यमंत्री सध्या महाबळेश्वर येथे आहेत. त्यांना भेटण्यासाठी मंत्री देसाई यांची लगबग सुरू होती. अशातच कराडच्या विश्रामगृहात पूर्वनियोजित पत्रकार परिषद ठरली होती. त्यामुळे 10 ला ठरलेली पत्रकार परिषद 11 नंतर सुरु झाली. मंत्री देसाई यांचे विश्रामघरात आगमन होताच विद्युत पुरवठा खंडित झाला. सुरुवातीला त्यांनी पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना खडसावत त्यांच्या विभागाच्या अधिकाऱ्यांवर जाळ काढला. विश्रामगृहातील विद्युत पुरवठा खंडित झाल्यानंतर मंत्री देसाई यांनी अधिकाऱ्यांना झापण्यास सुरुवात केली. यावेळी उत्पादन शुल्क ...

राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत गेल्या 24 तासांत 1 हजार 723 नव्या रुग्णांची वाढ

Image
सातारा जिल्ह्यात 8 बाधिताची वाढ ... कराड दि. 27 (प्रतिनिधी) सातारा जिल्ह्यात आज आलेल्या आवाहलात जिल्ह्यात 8 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर आज दिवसभरात 7 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यातील सक्रिय रूग्णसंख्या आता 40 झाली असून सध्या 5 रूग्णांवर विविध हाॅस्पिटलमध्ये उपचार सूरू आहेत.एक  रुग्ण  गंभीर   आहे. सातारा जिल्ह्यात आज जाहीर केलेल्या तालुकानिहाय रिपोर्टनुसार... जावली-0,  कराड-3,  खंडाळा- 0, खटाव- 1, कोरेगाव-1, माण-0, महाबळेश्वर-0, पाटण-0, फलटण-0, सातारा-3, वाई-0, इतर 0 असे 8 बाधितांची वाढ झाली आहे. नमूने-चाचणी- 285 (एकूण-26 लाख 15 हजार 640) आज बाधित वाढ- 8 (एकूण-2 लाख 80 हजार 357) आज कोरोनामुक्त- 7 (एकूण-2 लाख 73 हजार 582) आज मृत्यू- 0 (एकूण-6 हजार 715) उपचारार्थ रूग्ण-40 गंभीर रुग्ण--1 रूग्णालयात उपचार -5 राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत गेल्या 24 तासांत 1 हजार 723 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे.1 हजार 845 जण आज कोरोनामुक्त झाले. तर 6 कोरोना बाधिताचा मृत्यू झाला आहे.  राज्यात 11  हजार 743 रुग्ण सक्रिय आहेत. देशात गेल्या 24 तासांत 9 हजार 520 न...

नगरपालिकेकडून गणेश विसर्जनासाठी कृष्णा घाटावर यूध्दपातळीवर तयारी सुरू...

Image
  गणेश विसर्जनासाठी कृष्णा घाटावर यूध्दपातळीवर तयारी सुरू... कराड दि.27 (प्रतिनिधी) येथील प्रीतिसंगमावर गणेश विसर्जनासाठी कराड नगरपालिकेकडून जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. कृष्णा घाटासमोरील पात्रात प्रचंड प्रमाणात वाढलेली झाडी व गवत काढण्यात येत असून या ठिकाणी मुरूम टाकून रस्ता करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. आज या कामाची पाहणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी आर पाटील, मुख्याधिकारी रमाकांत डाके माजी नगरसेवक विजय वाटेगावकर, जयंत बेडेकर,अख्तर आंबेकरी यांनी केली. प्रतिवर्षी गणेश विसर्जनासाठी प्रीतीसंगमावर कृष्णा कोयना नदीपात्रात गणेश विसर्जन करताना विविध अडचणी येत असतात. कोरोनामुळे सलग दोन वर्ष महापुराचा ही सामना करावा लागला. यंदा महापूराची शक्यता सध्यातरी दिसत नसली तरी संभाव्य पूर व नदीपात्रातील पाणी वाढण्याची शक्यता गृहीत धरून नगरपालिकेने नदीपात्रात विसर्जनासाठीची व्यवस्था करण्यासाठी विविध उपाय योजना सुरू केल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने नदीपात्रात गणेश मूर्ती घेऊन येणाऱ्या वाहनांच्या पार्किंगचा मोठा प्रश्न निर्माण होत असल्याने त्यासाठीची जागा व सार्वजनिक गणेशोत्...

केंद्रीय मंत्री सोम प्रकाश यांच्या स्वागतासाठी कराड दक्षिण भाजपा सज्ज...

Image
केंद्रीय मंत्री सोम प्रकाश यांच्या स्वागतासाठी कराड दक्षिण भाजपा सज्ज... महिला व नवमतदार संवाद मेळाव्यासह बाईक रॅलीचे आयोजन.... कराड, दि.27 : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने देशातील १४४ मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले असून, यामध्ये सातारा लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात संघटनात्मक बांधणीसाठी केंद्रीय वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री सोम प्रकाश हे रविवार (ता. २८) पासून सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांच्या प्रमुख उपस्थितीत कराड दक्षिण मतदारसंघात सोमवारी (ता. २९) व मंगळवारी (ता. ३०) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती, भाजपाचे कराड दक्षिण तालुकाध्यक्ष धनंजय पाटील यांनी दिली आहे.  भाजपाचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले, प्रदेश सचिव विक्रम पावसकर व जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने सातारा लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असलेल्या केंद्रीय वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री सोम प्रकाश यांच्या स्वागतासाठी कराड दक्षिण भाजप...

देशात गेल्या 24 तासांत 10 हजार 256 नवीन कोरोना बाधितांची वाढ झाली....

Image
  सातारा जिल्ह्यात 4 बाधिताची वाढ ... कराड दि. 26 (प्रतिनिधी) सातारा जिल्ह्यात आज आलेल्या आवाहलात जिल्ह्यात 4 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर आज दिवसभरात 12 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यातील सक्रिय रूग्णसंख्या आता 37 झाली असून सध्या 4 रूग्णांवर विविध हाॅस्पिटलमध्ये उपचार सूरू आहेत. सातारा जिल्ह्यात आज जाहीर केलेल्या तालुकानिहाय रिपोर्टनुसार... जावली-0,  कराड-0,  खंडाळा- 0, खटाव- 1, कोरेगाव-0, माण-1, महाबळेश्वर-0, पाटण-1, फलटण-1, सातारा-0, वाई-0, इतर 0 असे 4 बाधितांची वाढ झाली आहे. नमूने-चाचणी- 285 (एकूण-26 लाख 15 हजार 355) आज बाधित वाढ- 4 (एकूण-2 लाख 80 हजार 349) आज कोरोनामुक्त- 12 (एकूण-2 लाख 73 हजार 575) आज मृत्यू- 0 (एकूण-6 हजार 715) उपचारार्थ रूग्ण-37 गंभीर रुग्ण--0 रूग्णालयात उपचार -4 राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत गेल्या 24 तासांत 1 हजार 846 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे.2 हजार 240 जण आज कोरोनामुक्त झाले. तर 4 कोरोना बाधिताचा मृत्यू झाला आहे.  राज्यात 11  हजार 871 रुग्ण सक्रिय आहेत. देशात गेल्या 24 तासांत 10 हजार 256 नवीन कोरोना बाधितांची वाढ झाल...

कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाची उघडीप;धरणातील पाण्याचे उद्या पूजन....

Image
  जिल्ह्यात पावसाची उघडीप;कोयना धरणातील पाण्याचे उद्या पूजन.... कराड दि. 26 (प्रतिनिधी) कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाने आज पूर्ण उघडीप दिली आहे.जिल्ह्यात ही पावसाने उघडीप दिली आहे.कोयना धरणातून विसर्ग पूर्ण बंद करण्यात आला आहे. आज दिवसभरात कोयना नवजा परिसरात पावसाने पूर्ण उघडीप दिली आहे. धरणातील पाण्याचे उद्या सकाळी मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते पूजन होणार आहे. सध्या कोयना धरणात 6 हजार 172 क्यूसेक पाण्याची आवक होत आहे.धरणात दिवसभरात 00.54 टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. सध्या कोयना धरणात 99.53 टीएमसी पाणीसाठा असून धरण 94.42% टक्के भरले आहे. आज सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत जिल्ह्यातील सर्वच प्रकल्प क्षेत्रात पावसाने उघडीप दिली होती. सकाळी आठ ते सांयकाळी पाच वाजेपर्यंत कोयना, नवजा  व महाबळेश्वरला 0 मिलिमीटर पाऊस नोंदला गेला आहे. जिल्ह्यात सध्या कोयना धरणातून 0 तर धोम धरणातून 0, कण्हेर धरणातून 450, उरमोडी धरणातून 500, धोम बलकवडी धरणातून 334, तारळी मधून 208 तर वीर धरणातून 5 हजार 237 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

दक्ष कराडकरकडून रस्त्यासाठी योगदान देणार्‍या सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान...

Image
  कराडात रस्त्यासाठी योगदान देणार्‍या सामाजिक कार्यकर्त्यांचा दक्ष कराडकरकडून सन्मान... कराड दि.25-(प्रतिनिधी) कराड शहरातील वाढीव भागात असणाऱ्या पवार-पाटील नगर ते सूर्यवंशी मळा बोर्ड पर्यंतचा रस्ता दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात खराब होत असतो.याबाबत सामाजिक कार्यकर्ते जावेदभाई नायकवडी यांनी आंदोलनाच्या माध्यमातून तर व युवा उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते प्रवीण पवार यांनी स्वखर्चातून घेतल्याने या दोघांचा आज दक्ष कराडकरच्या वतीने माजी नगरसेवक घनश्याम पेंढारकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. शहरातील वाढीव भागात असणारा पवार-पाटील नगर ते सूर्यवंशी मळा बोर्ड पर्यंतचा हा रस्ता दरवर्षी मोठ्या प्रमाणात खराब होतो. नगरपरिषद प्रशासन याकडे गांभिर्याने पाहत नसल्याने रस्त्याची अवस्था दयनिय होते.रस्त्यावर चिखल साचून राहत असल्याने त्या भागातील शालेय विद्यार्थ्यांसह नागरिक व महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. या बाबत त्या भागातील सामाजिक काम करत असणाऱ्या जावेदभाई नायकवडी यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारत वेळोवेळी या रस्त्यासाठी आंदोलने उपोषणे करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.तरी ही...

कोविडमुळे पालक गमावलेल्या 180 बालकांच्या शैक्षणिक साहित्यासाठी बँक खात्यावर 12 लाख 73 हजार रुपये होणार जमा

Image
कोविडमुळे पालक गमावलेल्या 180 बालकांच्या शैक्षणिक साहित्यासाठी बँक खात्यावर 12 लाख 73 हजार रुपये होणार जमा;जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांचा निर्णय... सातारा दि. 25 :  कोविडमुळे एक व दोन्ही पालक गमावेल्या बालकांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी मागणी केल्यानुसार शैक्षणिक लाभ, साहित्य, वसतिगृह शुल्क यासाठी 180 बालकांच्या बँक खात्यावर बाल न्याय निधी अंतर्गत प्राप्त झालेला निधी रक्कम 12 लाख 73 हजार 616 रुपये तात्काळ  जमा करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात  जिल्हास्तरीय कृतीदल समितीची बैठक जिल्हाधिकारी श्री. जयवंशी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी त्यांनी हा निर्णय घेतला. या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, समाज कल्याणचे सहायक आयुक्त नितीन उबाळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, महिला व बाल विकास अधिकारी विजय तावरे, जिल्हा परिषदेच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी रोहिणी ढवळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. रस्त्यांवर फिरणारे बालके आढळल्यास त्यांना त्यांच्या कुट...

कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर मंदावला; कोयना धरणातून विसर्ग बंद....

Image
  जिल्ह्यात पावसाची उघडीप;कोयना धरणातील पाणी साठा शंभरीकडे.... कराड दि. 25 (प्रतिनिधी) कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर मंदावला आहे. जिल्ह्यात ही पावसाने उघडीप दिली आहे. काल कोयना धरणाचे दरवाजे बंद केल्यानंतर आज पायथा विद्यूत गृहातून होणारा विसर्ग ही बंद करण्यात आला आहे. आज दिवसभरात कोयना नवजा परिसरात केवळ 20 मि.मि. पावसाची नोंद झाली आहे.धरणाचा पाणीसाठा शंभरीपर्यंत पोहचला आहे. सध्या कोयना धरणात 7 हजार 572 क्यूसेक पाण्याची आवक होत आहे.धरणात दिवसभरात 00.53 टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. सध्या कोयना धरणात 98.99 टीएमसी पाणीसाठा असून धरण 94.06% टक्के भरले आहे. आज सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत जिल्ह्यातील सर्वच प्रकल्प क्षेत्रात पावसाचा मंदावला होता. कोयना नवजा परिसरात 20 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सकाळी आठ वाजेपर्यंत कोयना येथे 11 मि.मी तर नवजा येथे 9 मि.मी पावसाची नोंद झाली आहे तर महाबळेश्वरला 8 मिलिमीटर पाऊस नोंदला गेला आहे. जिल्ह्यात सध्या कोयना धरणातून 0 तर धोम धरणातून 0, कण्हेर धरणातून 550, उरमोडी धरणातून 500, धोम बलकवडी धरणातून 334, तारळी मधून 510 तर वीर धरणातून 23 हजार 7...

मुथुट फिनकॉर्प लिमिटेडच्या कराड शाखेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा...

Image
  मुथुट फिनकॉर्प लिमिटेडच्या कराड शाखेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा... कराड दि.25 (प्रतिनिधी) गोल्ड लोन तसेच लघू उद्योगासह अार्थिक साह्या, सेवा-सूविधा उपलब्ध करणार्‍या मुथुट फिनकॉर्प लिमिटेडच्या कराड शाखेचा 11 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. वर्धापन दिनानिमित्त खास महिलांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास संस्थेच्या ग्राहकांसह महिलांची विशेष उपस्थिती होती.या सर्वांच्या उपस्थित केक कापून हा वर्धापनदिन सोहळा साजरा करण्यात आला. मुथुट फिनकाॅर्पच्या कराड शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात उपस्थित असणार्‍या सर्वांना मुथुट फिनकाॅर्पच्या उपलब्ध असलेल्या विविध सेवा-सूविधांबाबत शाखेच्या पदाधिकारी तसेच कर्मचार्‍यांनी मार्गदर्शन करुन माहिती दिली. मुथुटच्यावतीने दिली जाणारी सेवा तसेच वर्षभर राबवण्यात येत असलेल्या सामाजिक उपक्रमाबद्दलची माहिती ही यावेळी देण्यात आली.याला अनेक महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मुथुट फिनकॉर्प लिमिटेडच्या कराड शाखा प्रमुख जास्मिन काझी, शाखेतील कर्मचारी आशिकेश मोरे, कल्याणी माने, संदीप नलवडे यावे...

वन्‍यप्राण्‍यांच्‍या हल्‍ल्‍यात मृत पावलेल्‍या व्‍यक्‍तीच्‍या कुटूंबियांना 20 लाख मिळणार- वनमंत्री सुधीर मुनगंटीवार...

Image
  वन्‍यप्राण्‍यांच्‍या हल्‍ल्‍यात मृत पावलेल्‍या व्‍यक्‍तीच्‍या कुटूंबियांना आता २० लाख मिळणार- वनमंत्री सुधीर मुनगंटीवार... मुंबई, दि. 24 : वन्‍यप्राण्‍यांच्‍या हल्‍ल्‍यात मृत पावलेल्‍या व्‍यक्‍तीच्‍या कुटूंबियांना देण्‍यात येणा-या १५ लाख अर्थसहाय्याच्‍या रक्‍कमेत वाढ करत ही रक्‍कम २० लाख इतकी करण्‍याचा निर्णय वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधान परिषदेत जाहीर केला. राज्‍याच्‍या वनविभागाच्‍या माध्‍यमातून उत्‍तम पद्धतीने वनसंवर्धनाचे कार्य सुरू असल्‍याने वन्‍यप्राण्‍यांच्‍या संख्‍येत मोठया प्रमाणावर वाढ झाली आहे. मानव–वन्‍यजीव संघर्ष कमी करण्‍याच्‍या दृष्‍टीने वनालगतच्‍या गावांमध्‍ये राहणाऱ्या नागरिकांचे वनविभागामार्फत प्रबोधन करण्‍यात येत असून डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेमार्फत स्‍थानिक जनतेचे वनावरील अवलंबीत्‍व कमी करण्‍याचा प्रयत्‍न करण्‍यात येत आहे. वन्‍यप्राण्‍यांच्‍या हल्‍ल्‍यामध्‍ये सन सन 2019-20 या वर्षी 47, 2020-21 ला 80 आणि 2021-22 ला 86 इतकी मनुष्यहानी झाली आहे. मनुष्‍यहानी झालेल्‍या व्‍यक्‍तींच्‍या अवलंबित कुटूंबियांना वाघ, बिबट्या, रानडुक्‍कर, गवा, ...