सोशल मिडियातील मेसेजमुळे रक्तदात्यांची रूग्णालयात धाव....
केवळ सोशल मिडियातील मेसेजमुळे रक्तदात्यांची रूग्णालयात धाव....
कराड दि.31 (प्रतिनिधी) समाजाचे आपण काहीतरी देणं लागतो, याच भावनेने एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याला मदत व्हावी या उद्देशाने कालपासून मोठी करण्यात आली व त्याला सोशल मिडियामुळे चांगलं यश ही आलं.ज्या विद्यार्थ्याला तो शिकत असलेल्या महाविद्यालयात अर्धांग वायूचा झटका आला त्या विद्यार्थ्याला रूग्णालयात मदत करणे हे आपल्या सारख्या सुज्ञ व जागरूक समाज उपयोगी व्यक्तीचं कर्तव्य आहे, आणि ते आपण पार पाडलंच पाहिजे. समाजात अशा दररोज शेकडो घटना घडतात कधी त्या आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत. परंतु ज्या पोहोचतात त्या मध्ये आपले योगदान देणं हे आपलं कर्तव्य आहे याच भावनेतून गणेश उत्सवाच्या धामधूमीत एकास मोठी मदत झाली.रक्तदाते आमच्यासाठी देवदूत म्हणून मदतीस आल्याबद्दल आष्टेकर व पोळ कूटूंबियांनी रक्तदात्यांचे आभार मानले आहेत.
अभिषेक विजय पोळ (वय 17), याच्या सर्वांगाला 20 दिवसापूर्वी कराडच्या यशवंतराव चव्हाण कॉलेजमध्ये अचानक लकवा मारला गेला होता. त्यावेळी तेथिल शिक्षकांनी त्याला कृष्णा हॉस्पिटल मध्ये ICU 3 मध्ये उपचारासाठी दाखल केले होते. व त्याच्यावर ऊपचार सूरू करण्यात आले. मात्र रक्तातील प्लाझ्मा बदलणे अत्यंत गरजेचे असल्याने त्यासाठी 12 रक्त बाटल्यांची गरज होती, त्यामुळे त्याच्या कूटूंबियांनी रक्तदात्या बंधूंना साद घालून आम्हास सहकार्य करावे ही नम्र व कळकळीची विनती व्हाॅटसप ग्रूपवर मेसेजद्वारे केली.
कराड टूडे न्यूजच्या माध्यामातून हा मेसेज सर्वत्र पसरवला गेला.त्या केवळ एका मेसेज मुळे त्या विद्यार्थ्याला काल आठ जणांनी आपलं रक्तदान करून मोलाची कामगिरी बजावली. अजूनही त्याला मदतीला गरज आहे. कराड शहरात सामाजिक बांधिलकी जोपासताना अनेक जण विविध उपक्रम राबवतात. त्यासाठी अनेक जणांनी आपल्या स्वयंपुर्तीने विविध प्रकारे अनेक जणांना कशी मदत करता येईल यासाठी नेहमीच प्रयत्न सुरू ठेवलेले असतात. यामधीलच एक घटक म्हणजे सोशल मीडिया.अन याच सोशल मीडियामुळे क्षणात एखाद्याचा प्राण वाचवण्यात मोठी मदत मिळते. याची अनेक उदाहरणे सांगता येतील.
संबंधित विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांनी रक्त हवं आहे म्हणून मेसेज केला. मेसेज वाचल्यानंतर फार गंभीर बाब असल्याचे लक्षात आल्यानंतर तो मेसेज शक्य होईल तेवढ्या लोकांच्या पर्यंत अनेक जणांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. हा मेसेज कराडच्या दक्ष कराडकर या ग्रुपवर पोहोचल्यानंतर ग्रुपचे सर्वेसर्वा प्रमोद बापू पाटील यांनी त्यांच्या मित्रमंडळींच्या मध्ये याबाबत चर्चा केल्यानंतर अनेक जण रक्तदान करण्यास तयार झाले व त्यांनी केले ही. अक्षय सूर्वे व त्यांच्या मित्रमंडळी यांनी ही पूढाकार घेतला. अजूनही रक्तदात्यांची गरज असून त्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांची याचना व धावपळ सुरूच आहे. संबंधित विद्यार्थी कृष्णा रुग्णालयात उपचार घेत आहे.महादेव आष्टेकर 9922232552 व विजय पोळ 8766422165 यांचेकडे सपंर्क करुन रक्तदानाबाबत सहकार्य करावे.
Comments
Post a Comment