नगरपालिकेकडून गणेश विसर्जनासाठी कृष्णा घाटावर यूध्दपातळीवर तयारी सुरू...

 


गणेश विसर्जनासाठी कृष्णा घाटावर यूध्दपातळीवर तयारी सुरू...

कराड दि.27 (प्रतिनिधी) येथील प्रीतिसंगमावर गणेश विसर्जनासाठी कराड नगरपालिकेकडून जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. कृष्णा घाटासमोरील पात्रात प्रचंड प्रमाणात वाढलेली झाडी व गवत काढण्यात येत असून या ठिकाणी मुरूम टाकून रस्ता करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. आज या कामाची पाहणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी आर पाटील, मुख्याधिकारी रमाकांत डाके माजी नगरसेवक विजय वाटेगावकर, जयंत बेडेकर,अख्तर आंबेकरी यांनी केली.

प्रतिवर्षी गणेश विसर्जनासाठी प्रीतीसंगमावर कृष्णा कोयना नदीपात्रात गणेश विसर्जन करताना विविध अडचणी येत असतात. कोरोनामुळे सलग दोन वर्ष महापुराचा ही सामना करावा लागला. यंदा महापूराची शक्यता सध्यातरी दिसत नसली तरी संभाव्य पूर व नदीपात्रातील पाणी वाढण्याची शक्यता गृहीत धरून नगरपालिकेने नदीपात्रात विसर्जनासाठीची व्यवस्था करण्यासाठी विविध उपाय योजना सुरू केल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने नदीपात्रात गणेश मूर्ती घेऊन येणाऱ्या वाहनांच्या पार्किंगचा मोठा प्रश्न निर्माण होत असल्याने त्यासाठीची जागा व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची वाहने नदीपात्रात आल्यानंतर ती वाहने नदीपात्रातूनच बाहेर काढता यावीत यासाठी नदीपात्रात असणारी झाडी गवत काढून त्या ठिकाणी मुरूम टाकून रस्ता करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यामुळे नदीपात्रात येणारी वाहने आलेल्या मार्गाने परत न जाता पात्रात केलेल्या मार्गाने परत जाण्याची सोय केल्याने वाहतुकीचा प्रश्न मिटणार आहे.

कृष्णा घाटापासून ते डाव्या बाजूला स्मशानभूमीपर्यंत नदीपात्रात रस्ता करण्याचे काम सध्या सुरू असून या भागात नदीपत्रात असणारे झाडी, गवत काढण्यात येणार आहे. यामुळे त्यामुळे वाहतुक सुलभ होण्याबरोबरच हा परिसर स्वच्छ होणार आहे. सध्या नदीपात्रातील पाणी पातळी पूर्ण कमी झाली असून ती तशीच राहिल्यास विसर्जनाला कोणताही अडथळा निर्माण होणार नाही.



Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक