सातारा जिल्ह्यात गणेश उत्सवातील काही दिवस वाद्य वाजवण्यास सूट...
सातारा जिल्ह्यात उत्सवातील काही दिवस वाद्य वाजवण्यास सूट....
सातारा दि. 30 : सातारा जिल्ह्यात यावर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यास प्रशासनाने परवानगी दिली असून ध्वनीक्षेपक वापरण्यास ठराविक दिवशी सूट देण्यात आली आहे.तसेच आवाजावर मर्यादा घालण्यात आल्या असून नियमांचे उल्लंघन करणार्यांवर पोलिसांची कारवाई होणार आहे. काही दिवस डॉल्बीला परवानगी मिळणार का? या आशेवर गणेश मंडळाचे कार्यकर्ते होते, मात्र न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेनूसार ध्वनी प्रदूषण नियम 2000 मध्ये आवाजाची असणारी मर्यादा घालून डाॅल्बीसह अन्य वाद्य वाजवण्यास तसेच आवाजाचे ऊल्लंंघनास प्रतिबंध करण्यात आले आहे.
सातारा जिल्ह्यामध्ये दि. 31 ऑगस्ट 2022 रोजीच्या सकाळी 7 वा.पासून ते दि. 10 सप्टेंबर 2022 रोजीच्या 10 वाजेपर्यंत या कालावधीसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नियमानुसार ध्वनी प्रदूषण नियमानुसार व आवाजाच्या घालून दिलेल्या तीव्रतेबाबतच्या नुसार ध्वनीक्षेपक, ध्वनीवर्धक, डॉल्बी आवाजाचे उल्लंघन करणाऱ्या चालक-मालक, धारक तसेच संबंधित गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्यावर नियमानुसार पोलीस कारवाई होणार असल्याचे आदेशात म्हटले आहे
सातारा जिल्हाधिकारी यांनी नव्याने सुधारित आदेश जारी केला असून त्यानुसार गणेश उत्सव कालावधीत 1 सप्टेंबर, 4 सप्टेंबर 5 सप्टेंबर, 8 सप्टेंबर, 9 सप्टेंबर या दिवशी सकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक, ध्वनीवर्धक वापरण्यास सूट देण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे. मात्र ध्वनी प्रदूषण नियम 2000 च्या नियम 3 (1), आणि 4(1) मध्ये आवाजाच्या गुणवत्तेची मर्यादा घालून दिलेले आहे. त्यानुसार औद्योगिक क्षेत्रात दिवसा 75 डेसिबल तर रात्री 70 डेसिबल, वाणिज्य क्षेत्रात दिवसा 65 डेसीबल तर रात्री 55 डेसिबल, निवासी क्षेत्रात दिवसा 55 डेसिबल तर रात्री 45 डेसिबल व शांतता क्षेत्रात दिवसा 50 डेसिबल व रात्री 40 डेसिबल आवाजाची मर्यादा असणार आहे.

Comments
Post a Comment