मुथुट फिनकॉर्प लिमिटेडच्या कराड शाखेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा...
मुथुट फिनकॉर्प लिमिटेडच्या कराड शाखेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा...
कराड दि.25 (प्रतिनिधी) गोल्ड लोन तसेच लघू उद्योगासह अार्थिक साह्या, सेवा-सूविधा उपलब्ध करणार्या मुथुट फिनकॉर्प लिमिटेडच्या कराड शाखेचा 11 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. वर्धापन दिनानिमित्त खास महिलांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास संस्थेच्या ग्राहकांसह महिलांची विशेष उपस्थिती होती.या सर्वांच्या उपस्थित केक कापून हा वर्धापनदिन सोहळा साजरा करण्यात आला.
मुथुट फिनकाॅर्पच्या कराड शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात उपस्थित असणार्या सर्वांना मुथुट फिनकाॅर्पच्या उपलब्ध असलेल्या विविध सेवा-सूविधांबाबत शाखेच्या पदाधिकारी तसेच कर्मचार्यांनी मार्गदर्शन करुन माहिती दिली. मुथुटच्यावतीने दिली जाणारी सेवा तसेच वर्षभर राबवण्यात येत असलेल्या सामाजिक उपक्रमाबद्दलची माहिती ही यावेळी देण्यात आली.याला अनेक महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
मुथुट फिनकॉर्प लिमिटेडच्या कराड शाखा प्रमुख जास्मिन काझी, शाखेतील कर्मचारी आशिकेश मोरे, कल्याणी माने, संदीप नलवडे यावेळी उपस्थित होते.वर्धापन दिन सोहळ्यास उपस्थित असलेल्या सर्वांनी कराड शाखेच्या सेवा सूविधांबाबत समाधान व्यक्त करीत कराड शाखेच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या.या सोहळ्यात उपस्थिंतांचे स्वागत शाखाप्रमुख जास्मिन काझी यांनी केले तर कल्याणी माने यांनी आभार मानले.
Comments
Post a Comment