कराडात मंत्री शंभूराज देसाई यांच्या कडून अधिकार्यांना झापाझापी....
साहेब मी नवीन आहे;मग घरी जा;मंत्री शंभूराज देसाई...
कराड दि.28 (प्रतिनिधी) आपल्या नेहमीच्या फटकळ स्वभावाचा आज पुन्हा एकदा मंत्री शंभूराजे देसाई यांनी झलक दाखवली. वर्षभरानंतर कराडच्या विश्रामगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत मंत्री देसाई यांनी त्यांच्या राज्य उत्पादन शूल्क विभागातील एका अधिकाऱ्याला चांगलच झापलं. निमित्त होतं विश्रामगृहातील विद्युत पुरवठा खंडित होण्याचा मात्र याचा राग मंत्री देसाई यांनी त्यांच्याच खात्यातील अधिकाऱ्यावर काढत त्या अधिकाऱ्याला घरी जाण्याचा सल्लाच त्यांनी दिला.
मुख्यमंत्री सध्या महाबळेश्वर येथे आहेत. त्यांना भेटण्यासाठी मंत्री देसाई यांची लगबग सुरू होती. अशातच कराडच्या विश्रामगृहात पूर्वनियोजित पत्रकार परिषद ठरली होती. त्यामुळे 10 ला ठरलेली पत्रकार परिषद 11 नंतर सुरु झाली. मंत्री देसाई यांचे विश्रामघरात आगमन होताच विद्युत पुरवठा खंडित झाला. सुरुवातीला त्यांनी पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना खडसावत त्यांच्या विभागाच्या अधिकाऱ्यांवर जाळ काढला.
विश्रामगृहातील विद्युत पुरवठा खंडित झाल्यानंतर मंत्री देसाई यांनी अधिकाऱ्यांना झापण्यास सुरुवात केली. यावेळी उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी उपस्थित नव्हते. त्यांना तात्काळ बोलवा अशी सूचना दिल्यानंतर संबंधित अधिकारी त्या ठिकाणी आला. त्यानंतर देसाई यांनी तुला प्रोटोकॉल कळतो का? तू कधी प्रोटोकाॅलचं काम केलंय का? असा सवाल केला. तर संबंधित अधिकारी म्हणाला साहेब मी नवीन आहे. मग मंत्री देसाई यांनी त्याला 'मग घरी जा' अशा शब्दात सूनावले. तेवढ्यात विद्युत पुरवठा सुरळीत झाल्यानंतर मंत्री देसाई यांनी त्या अधिकाऱ्यास 'तू वाचलास' असं सुनावत स्वताच्या पीए ला सूनावत तू बघ जरा,सांग त्या अधिकार्यांना आणि तू माझ्या वेगाबरोबर पळत जा असा सल्ला दिला.
दरम्यान आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत मंत्री देसाई यांनी पावसाळी अधिवेशनात त्यांच्या मतदारसंघासाठी मिळालेल्या निधी विषयी, विविध विकास कामा विषयी सविस्तर माहिती दिली मात्र त्यांच्याच राज्य उत्पादन विभागाच्या माहितीबद्दल त्यांनी सविस्तर माहिती घेऊन सांगतो असे सांगितले.
Comments
Post a Comment