दक्ष कराडकरकडून रस्त्यासाठी योगदान देणार्या सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान...
कराडात रस्त्यासाठी योगदान देणार्या सामाजिक कार्यकर्त्यांचा दक्ष कराडकरकडून सन्मान...
कराड दि.25-(प्रतिनिधी) कराड शहरातील वाढीव भागात असणाऱ्या पवार-पाटील नगर ते सूर्यवंशी मळा बोर्ड पर्यंतचा रस्ता दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात खराब होत असतो.याबाबत सामाजिक कार्यकर्ते जावेदभाई नायकवडी यांनी आंदोलनाच्या माध्यमातून तर व युवा उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते प्रवीण पवार यांनी स्वखर्चातून घेतल्याने या दोघांचा आज दक्ष कराडकरच्या वतीने माजी नगरसेवक घनश्याम पेंढारकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
शहरातील वाढीव भागात असणारा पवार-पाटील नगर ते सूर्यवंशी मळा बोर्ड पर्यंतचा हा रस्ता दरवर्षी मोठ्या प्रमाणात खराब होतो. नगरपरिषद प्रशासन याकडे गांभिर्याने पाहत नसल्याने रस्त्याची अवस्था दयनिय होते.रस्त्यावर चिखल साचून राहत असल्याने त्या भागातील शालेय विद्यार्थ्यांसह नागरिक व महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. या बाबत त्या भागातील सामाजिक काम करत असणाऱ्या जावेदभाई नायकवडी यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारत वेळोवेळी या रस्त्यासाठी आंदोलने उपोषणे करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.तरी ही प्रशासनाने आजतागायत रस्त्याबाबत ठोस निर्णय घेतला नाही.
रस्त्याचे हे नेहमीचे रडगाने असल्याने अनेक अक्षरशा वैतागले होते.अशातच युवा उद्योजक प्रवीण पवार यांनी सामाजिक बांधिलकीतून या रस्त्यावर स्वखर्चातून लाखो रुपये खर्च करून सदरचा रस्त्यावर मूरूम टाकला.किमान यामुळे रस्त्यावर चालणे सूलभ झाले.त्यांनी सामाजिक बांधिलिकी जोपासत हा रस्ता करून घेतल्याबद्दल आज दक्ष कराडकरच्या वतीने त्यांचा माजी नगरसेवक घनश्याम पेंढारकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला व त्यांचे विशेष आभार मानण्यात आले. यावेळी दक्ष कराडकरचे प्रमुख प्रमोद पाटील, विजय मुटेकर, सागर बर्गे, इंद्रजीत भोपते, विनोद पवार, सौरभ पाटील, मुकुंद चरेगावकर, प्रीतम यादव, अवधूत पाटणे, रवींद्र मुंडेकर, संजय चन्ने, सोहेब सुतार व त्या भागातील नागरिक उपस्थित होते.
दक्ष कराडकर हा सोशल मीडिया समूह स्थापन झाल्यानंतर या समूहाच्या माध्यमातून शहरातील विविध प्रश्नांना वाचा फोडली आहे. या समूहावर शहरातील विविध नागरिक आपल्या समस्या मांडत असतात. समूहाच्या वतीने त्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवून त्यांचे निराकरण केले जाते. गेले अनेक वर्ष या समूहाच्या माध्यमातून शहरातील विविध सामाजिक प्रश्नावर आवाज उठवून संबंधितांना न्याय देण्याचे काम केले आहे. त्यामुळे या समूहाचे सर्वत्र कौतुक होत आहे.




Comments
Post a Comment