Posts

Showing posts from May, 2025

कराड तालुक्यातील एक आदर्श व्यक्तिमत्व; मा. अजित थोरात (काका)

Image
  आमचे मित्र आमचे चेअरमन ; मा. अजित थोरात (काका) मा. अजितजी काका थोरात यांचा वाढदिवस आज साध्या पद्धतीने संपन्न होत आहे. मा. अजित काका ज्योतीराम थोरात थोरात, मलकापूर कराड तालुक्यातील एक आदर्श व्यक्तिमत्व. बीएपर्यंत शिक्षण घेऊन त्यांनी सामाजिक कार्याला सुरुवात केली. शालेय जीवनामध्ये व महाविद्यालयीन जीवनामध्ये त्यांनी मोठा मित्रपरिवार निर्माण केला. सामाजिक कार्यासोबत शेतीची आवड जोपासली. शेतीमध्ये त्यांनी चांगली बैल जोडी पाळण्याचा छंद जोपासला. आजही त्यांच्याकडे उत्तम बैल जोडी आहे. मळाई ग्रुप मध्ये काम करीत असताना मळाई ग्रुप मधील श्री मळाईदेवी शिक्षण संस्था, श्री मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्था, आदर्श जुनिअर कॉलेज व चव्हाण विद्यालय, मलकापूर, आनंदराव चव्हाण विद्यालय, पोतले, श्रीमती कन्या शाळा मलकापूर, न्यू इंग्लिश स्कूल कासार शिरंबे, स्टार इंग्लिश मीडियम स्कूल व जुनिअर कॉलेज मलकापूर, आदर्श प्राथमिक विद्यालय मलकापूर, आदर्श प्राथमिक विद्यालय आ.नगर, जमना सहकारी ग्राहक संस्था मलकापूर, आदर्श क्रीडा संस्था कराड, कराड तालुका ॲमयुचर अथलेटिक असोसिएशन कराड, समाज प्रबोधन सार्वजनिक वाचनालय मलकापूर, ...

काँग्रेस कधीही संपू शकत नाही, आज भाजपला सुद्धा त्यांचा पक्ष वाढवायला काँग्रेसचीच मदत घ्यावी लागते - पृथ्वीराज चव्हाण

Image
काँग्रेस कधीही संपू शकत नाही, आज भाजपला सुद्धा त्यांचा पक्ष वाढवायला काँग्रेसचीच मदत घ्यावी लागते - पृथ्वीराज चव्हाण कराड, दि. 31 - काँग्रेसचा विचार तळागाळापर्यंत पोहचला आहे, त्यामुळे काँग्रेस कधीही संपू शकत नाही. स्वातंत्र्य मिळवण्यापासून देश प्रगतीपथावर आणण्यापर्यंत काँग्रेसने सत्ताकाळात काम केले आहे. आणि आता देश स्थिर झाल्यानंतर फेक नरेटिव्ह व खोटे आरोप करून भाजप आयते सत्तेवर आली आहे. आज भाजपला सुद्धा त्यांचा पक्ष वाढवायला काँग्रेस कार्यकर्त्यांची व नेत्यांची गरज भासत आहे म्हणूनच भाजप मोठा पक्ष दिसत आहे अशी टीका महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.  कराड दक्षिण काँग्रेस आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात पृथ्वीराज चव्हाण बोलत होते. कराड दक्षिण काँग्रेस अध्यक्ष मनोहर शिंदे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अजितराव पाटील, काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाचे पश्चिम महाराष्ट्र चे अध्यक्ष झाकीर पठाण, जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते बंडानाना जगताप, अशोकराव पाटील, नानासो पाटील, नितीन थोरात, शिवाजीराव मोहिते, राजेंद्र चव्हाण, इंद्रजित चव्हाण, राहुल चव्हाण, मलका...

'सुरों का उत्सव’ संगीत रजनीला रसिक श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद

Image
मलकापूर : डॉ. सुरेश भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘सुरों का उत्सव’ संगीत रजनीत गाणी सादर करताना सुप्रसिद्ध गायक ऋषिकेश रानडे, सागर केंदूरकर, संपदा गोस्वामी, कोमल कृष्णा व अमेय दाते. 'सुरों का उत्सव’ संगीत रजनीला रसिक श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद कराड, दि. 31 : कृष्णा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा डॉ. सुरेश भोसले यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त मलकापूर येथे आयोजित ‘सुरों का उत्सव’ संगीत रजनीला उपस्थित रसिक श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद लाभला. या संगीत रजनीत सहभागी झालेल्या हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या युवा गायक – गायिकांनी आपल्या जादुई सुरांनी उपस्थित रसिक श्रोत्यांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. सुप्रसिद्ध पार्श्वगायक अमेय दाते, ऋषिकेश रानडे, सागर केंदूरकर आणि सुप्रसिद्ध पार्श्वगायिका कोमल कृष्णा व संपदा गोस्वामी यांनी पारंपरिक भावगीतांपासून ते आधुनिक संगीतातील गाण्यांपर्यंत केलेल्या प्रत्येक सादरीकरणाने वातावरण भारावून टाकले. डॉ. सुरेश भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त मलकापूर येथे कोमल कृष्णा प्रस्तुत ‘सुरों का उत्सव’ या संगीत रजनीचे आयोजन करण्यात आले होते. सिक्कीमचे माजी राज्य...

डॉ. सुरेशबाबांनी लोकांच्या जीवनात समृद्धी आणली;माजी खा. श्रीनिवास पाटील

Image
मलकापूर : कृष्णा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा डॉ. सुरेश भोसले यांचा नागरी सत्कार करताना सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील. बाजूस माजी मंत्री दिलीपराव देशमुख, आमदार डॉ. अतुलबाबा भोसले, आनंदराव पाटील, मदनराव मोहिते. डॉ. सुरेशबाबांनी लोकांच्या जीवनात समृद्धी आणली;माजी खा. श्रीनिवास पाटील  कराड , दि. 31 - कृष्णाकाठचे शांत, संयमी नेतृत्व आणि कृष्णा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा डॉ. सुरेश भोसले यांचा ७० वा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त मलकापूर येथे आयोजित भव्य सोहळ्यात सिक्कीमचे माजी राज्यपाल तथा माजी खासदार श्रीनिवास पाटील यांच्या शुभ हस्ते डॉ. भोसले यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. या अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी व्यासपीठावर राज्याचे माजी क्रीडा मंत्री दिलीपराव देशमुख, आमदार डॉ. अतुलबाबा भोसले, माजी आमदार आनंदराव पाटील, ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात श्री. पाटील यांच्या हस्ते डॉ. भोसले यांना शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी बोलताना श्रीनिवास पाटील म्हणाले, आपल्या पूर्वजांचा देदीप्...

डॉ. सुरेशबाबांच्या रुपाने साक्षात देव भेटला;माता-भगिनींनी केली कृतज्ञता व्यक्त

Image
कराड : कृष्णा विश्व विद्यापीठात आयोजित कर्करोग आधार गटाच्या बैठकीत बोलताना डॉ. सुरेश भोसले. डॉ. सुरेशबाबांच्या रुपाने साक्षात देव भेटला;माता-भगिनींनी केली कृतज्ञता व्यक्त कराड, ता. ३० : ‘मला जेव्हा कॅन्सर झाल्याचं समजलं तेव्हा मी प्रचंड घाबरले. आता आणखी किती दिवसांचं आयुष्य जगायला मिळणार या भितीनं कॅन्सरच्या उपचारांसाठी मी कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखवायला आले. पण इथं आल्यावर मात्र मला डॉ. सुरेशबाबांच्या रुपाने साक्षात देव भेटला. एवढा मोठा व्याप सांभाळणाऱ्या सुरेशबाबांनी माझ्यासारख्या सामान्य रुग्णावर केवळ उपचार केले नाहीत. तर या सगळ्या भितीच्या काळात मला वडिलांच्या मायेने धीर दिला.. आधार दिला.. आणि या संकटातून मला सहीसलामत बाहेर काढलं. आज त्यांच्यामुळे मी कॅन्सरमुक्त झाले असून, पूर्णपणे निरोगी व आत्मविश्वासाने आनंदी आयुष्य जगत आहे’, अशा भावोत्कृट शब्दांमध्ये अनेक माता-भगिनींनी डॉ. सुरेश भोसले यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.  कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती आणि प्रख्यात कर्करोग उपचार तज्ज्ञ डॉ. सुरेश भोसले यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त कर्करोग आधार गटाच्या विशेष बैठकीचे आय...

कराडमध्ये शिवतीर्थ स्मारक सुशोभीकरणाचे रविवारी भूमिपूजन

Image
कराडमध्ये शिवतीर्थ स्मारक सुशोभीकरणाचे रविवारी भूमिपूजन पालकमंत्री शंभूराज देसाई यांची उपस्थिती कराड, दि . 30 तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून व यशवंत विकासा आघाडीचे अध्यक्ष, शिवसेना नेते राजेंद्रसिंह यादव यांच्या पाठपुराव्याने मंजूर झालेल्या कराडमधील दत्त चौक शिवतीर्थ येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक सुशोभीकरण व अन्य स्मारकांच्या सुशोभीकरणाचे भूमिपूजन रविवारी १ जूनला पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते होणार आहे. रविवारी एक जून रोजी सकाळी ११ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमास आमदार डॉ. अतुल भोसले, शिवसेनेचे संपर्कप्रमुख शरद कणसे, शिवसेना नेते राजेंद्रसिंह यादव यांच्यासह शहरातील माजी नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी व नागरिकांची उपस्थिती असणार आहे.  दत्त चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी जिल्हा नियोजनमधून पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या कामाचे भूमिपूजन यावेळी होणार आहे. याबरोबरच बुधवार पेठेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा सुशोभीकरण, महात्मा फुले पुतळा सुशोभीकरण, अण्णाभाऊ साठे स्मारकाचे भूमिपूजनही होणार आ...

भाजपतर्फे मलकापुरात गुरुवारी भव्य महिला मेळावा

Image
  भाजपतर्फे मलकापुरात गुरुवारी भव्य महिला मेळावा प्रदेश कार्याध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती; प्रमुख कार्यकर्त्यांचा होणार पक्ष प्रवेश कराड, दि. 27 : पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त मलकापूर (ता. कराड) येथे भारतीय जनता पार्टीच्यावतीने गुरुवार दिनांक २९ मे रोजी सकाळी ११ वाजता भव्य महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यास भाजपाचे प्रदेश कार्याध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण व भाजपाचे सातारा जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.  मलकापूर-बैल बाजार रोडवरील गणपती मंदिर जवळच्या भव्य पटांगणावर होणारा हा मेळावा वचनपूर्ती कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रातील सर्वात मोठा कामगार व महिला लाभार्थी मेळावा ठरणार आहे. या महिला मेळाव्यात बांधकाम कामगारांचा सन्मान व साहित्य वाटप, तसेच कराड दक्षिणमधील प्रमुख कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश घेण्यात येणार आहे.  मेळाव्यासाठी राष्ट्रीय खनिज विकास महामंडळाचे संचालक भरत पाटील, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, कृष्णा सरिता बझारच्या संस्थापिका सौ. उत्तरा भोसले, ...

डॉ. सुरेश भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त ३० व ३१ मे रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन

Image
डॉ. सुरेश भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त ३० व ३१ मे रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन नामवंत गायक-गायिकांच्या उपस्थितीत भव्य संगीतरजनी; शेतकरी मेळाव्याचेही आयोजन कराड, दि. 26 : कृष्णाकाठचे शांत, संयमी नेतृत्व आणि कृष्णा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा, कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती तथा य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांचा ७० वा वाढदिवस ३० मे रोजी साजरा होत आहे. यानिमित्त दि. ३० व ३१ मे रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  आरोग्य, शिक्षण, सहकार, अर्थकारण, साखर उद्योग, पर्यावरण अशा विविधांगी क्षेत्रामध्ये अतुल्य योगदान देणारे आणि कृष्णाकाठी समृद्धीच्या दिशा विस्तारणारे नेतृत्व म्हणून डॉ. सुरेश भोसले यांना ओळखले जाते. प्रख्यात कर्करोग उपचार तज्ज्ञ, एक निष्णात सर्जन, ज्ञानाच्या क्षेत्रात संशोधनाला चालना देणारे शिक्षणतज्ज्ञ, सहकाराला नवसंजीवनी देणारे सहकारतपस्वी, साखर उद्योगाला विधायक दिशा देणारे नेतृत्व आणि पर्यावरणाच्या क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणारे पर्यावरणप्रेमी म्हणून डॉ. सुरेश भोसले यांनी त्या-त्या क्षेत्रात अमूल्य योगदान दिले आहे.  त्...

कृष्णा बँकेला उत्कृष्ट नागरी सहकारी बँक पुरस्कार जाहीर...

Image
  कृष्णा बँकेला उत्कृष्ट नागरी सहकारी बँक पुरस्कार जाहीर महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशनकडून घोषणा; लवकरच होणार वितरण  कराड, दि. 23 - राज्यातील सहकारी बँकांची शिखर संस्था असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशनच्यावतीने, दरवर्षी राज्यातील विविध सहकारी बँकांच्या कार्यक्षमतेचा आढावा घेत खास पुरस्कार दिले जातात. सन २०२३-२४ सालचा ‘पद्मभूषण कै. वसंतराव पाटील उत्कृष्ट नागरी सहकारी बँक’ पुरस्कार रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील कृष्णा सहकारी बँकेला जाहीर करण्यात आला आहे. सहकार क्षेत्रात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सहकारी बँकांच्या कार्याला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशनच्यावतीने दरवर्षी सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बँकांना पुरस्काराने गौरविण्यात येते. असोसिएशनने नुकत्याच घेतलेल्या उत्कृष्ट नागरी सहकारी बँकेच्या स्पर्धेत, पुणे विभागातून रु. ५०० कोटी ते रु. १००० कोटीपर्यंच्या ठेवी असलेल्या बँकांमधून, सन २०२३-२४ सालच्या पुरस्कारासाठी सर्वोत्कृष्ट कामगिरी नोंदविणारी बँक म्हणून कृष्णा सहकारी बँकेची निवड केली आहे. कृष्णा बँकेला प्रति...

ऑल पार्टी डेलिगेशन संसदीय असले पाहिजे : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

Image
  ऑल पार्टी डेलिगेशन संसदीय असले पाहिजे : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण BCCI सरकारपेक्षा मोठी नाही, पाकिस्तान आतंकवादाला मदत करतोय तर अशा देशासोबत मॅच खेळण्याचा निर्णय चुकीचाच आहे - पृथ्वीराज चव्हाण मुंबई, दि. 19 : काँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज सोमवारी मुंबई येथील काँग्रेस च्या प्रदेश कार्यालयात केंद्र सरकारच्या धोरणांवर आणि अलीकडील निर्णयांवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी वन नेशन-वन इलेक्शनपासून ईव्हीएम, ऑल पार्टी डेलीगेशन, आशिया कप, पाकिस्तानशी संबंधित जलविवाद अशा सर्व मुद्द्यांवर स्पष्ट प्रतिक्रिया दिली.  पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि, देशाने युद्धकाळातही पारदर्शिकता राखली आहे. 1965 मध्ये नेहरू, 1971 मध्ये इंदिरा गांधी आणि कारगिल युद्धाच्या वेळी अटल बिहारी वाजपेयी संसदेस नियमित माहिती देत असत. आज पंतप्रधान ना जनतेसमोर येतात, ना प्रेस कॉन्फरन्स घेतात, ना संसदेचे अधिवेशन बोलवतात. भारत सरकारचे पीओके संदर्भात स्पष्ट धोरण असले पाहिजे, पण ते दिसत नाही. यापुढे बोलताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि, ‘वन नेशन-वन ...

छत्रपती संभाजी महाराज स्मारक कामातील अडथळा दूर

Image
सातारा : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत बोलताना आ.डॉ. अतुलबाबा भोसले. छत्रपती संभाजी महाराज स्मारक कामातील अडथळा दूर  जिल्हा नियोजन बैठकीत आमदार डॉक्टर अतुल भोसले यांनी मांडला प्रश्न कराड, दि. 19 : येथील श्री शंभुतीर्थ परिसरात छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक साकारले जात आहे. पण याठिकाणी असलेल्या विद्युत तारांच्या स्ट्रस्टरमुळे या स्मारकाच्या कामाला अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे या विद्युत तारांच्या स्ट्रक्चरचे तातडीने स्थलांतर करावे, अशी आग्रही मागणी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी सातारा येथे झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केली. यावेळी बैठकीचे अध्यक्ष पालकमंत्री ना. शंभुराज देसाई यांनी या मागणीची तातडीने दखल घेत, एम.एस.ई.बी.ला या विद्युत तारांच्या स्ट्रक्चरचे तातडीने स्थलांतर करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे श्री शंभुतीर्थ परिसरात साकारल्या जात असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक कामातील अडथळा दूर होण्यास मदत होणार आहे. सातारा येथे जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंह...

कराड एस.टी. आगाराला मिळणार नवीन बसेस

Image
मुंबई : कराड आगाराला नवीन बसेस मिळाव्यात, या मागणीचे निवेदन परिवहन मंत्री ना. प्रताप सरनाईक यांना देताना आ. डॉ. अतुलबाबा भोसले कराड एस.टी. आगाराला मिळणार नवीन बसेस आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या मागणीला परिवहन मंत्र्यांचा हिरवा कंदील... कराड, ता. १७ : कराड तालुक्यातील प्रवाशांना दर्जेदार व वेळेवर एस.टी. सेवा मिळावी, यासाठी कराड आगाराला नवीन बसेस मिळाव्यात, अशी मागणी कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी राज्याचे परिवहन मंत्री ना. प्रताप सरनाईक यांच्याकडे केली होती. आ. अतुलबाबा भोसले यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत, ना. सरनाईक यांनी सध्या पहिल्या टप्प्यात शक्य तितक्या उपलब्ध बसेस तातडीने कराड आगाराला देण्याचे निर्देश राज्याच्या परिवहन आयुक्तांना दिले आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचे व्यावसायिक व शैक्षणिक केंद्र असलेल्या कराड तालुक्यातील लोकांचा दैनंदिन प्रवास वाढतच आहे. कराड हे केवळ सातारा जिल्ह्याचेच नव्हे तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील कृषी, शिक्षण, आरोग्य, साखर उद्योग अशा विविध क्षेत्रांत अग्रगण्य आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांची संख्याही मोठी आ...

कराड उपजिल्हा रुग्णालयातील सेवा-सुविधा सुधारण्याच्या मागणीसाठी ग्राहक पंचायतचे शिष्टमंडळ सक्रिय

Image
कराड – रुग्णालय अधीक्षक यांना निवेदन देताना ग्राहक पंचायतचे पदाधिकारी. कराड उपजिल्हा रुग्णालयातील सेवा-सुविधा सुधारण्याच्या मागणीसाठी ग्राहक पंचायतचे शिष्टमंडळ सक्रिय कराड, दि. 17 - कराड शहरातील ग्राहक पंचायतच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या विशेष मोहिमेअंतर्गत उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील अधीक्षक डॉ. सुनिता लाळे यांची भेट घेऊन रुग्णालयातील सेवा-सुविधा, अपूर्णता आणि दैनंदिन कामकाजाबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी रुग्णालयातील विविध अडचणींची माहिती देऊन त्या पूर्ततेसाठी शासनाकडे पाठपुरावा करून त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली. त्याचबरोबर रुग्णाच्या सोबत असणाऱ्या नातेवाईकांना दवाखाना, प्रयोगशाळा, एक्स-रे, सी.टी. स्कॅन, एम.आर.आय. तपासण्या इत्यादींसाठी एकाच वेळी हॉस्पिटल सेवा, औषधे, रुग्णवाहिका, बिल भरणे तसेच विविध तपासण्यांसाठी रुग्णांना दुसरीकडे पाठवणे यासाठी पुरेसे मनुष्यबळ आवश्यक असल्याचे अधोरेखित करण्यात आले. यामुळे रुग्णाच्या सोबत असणाऱ्या व्यक्तीवर अतिरिक्त ताण येतो. या पार्श्वभूमीवर, अशा सेवेची आवड असलेल्या, सेवाभावी वृत्तीने अल्प मोबदल्...

भाजपाचे नूतन जिल्हाध्यक्ष आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांचे जिल्ह्यात शुक्रवारी होणार जंगी स्वागत

Image
सातारा : शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीप्रसंगी उपस्थित असलेले भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, सुनील काटकर, माजी आमदार आनंदराव पाटील व अन्य मान्यवर. भाजपाचे नूतन जिल्हाध्यक्ष आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांचे सातारा जिल्ह्यात शुक्रवारी होणार जंगी स्वागत पक्षाच्या जिल्हा कमिटीकडून स्वागताची जय्यत तयारी सातारा, दि. 15 : भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयाने सातारा जिल्हाध्यक्षपदी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांची घोषणा नुकतीच केली आहे. या निवडीनंतर ते शुक्रवारी (ता. १६) प्रथमच सातारा जिल्ह्यात येत असून, त्यांच्या जंगी स्वागताची तयारी भाजपा जिल्हा कमिटीने केली आहे. सातारा येथील शासकीय विश्रामगृहात संपन्न झालेल्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत या स्वागत सोहळ्याची रुपरेषा निश्चित करण्यात आली.  बैठकीला भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, सुनील काटकर, माजी आमदार आनंदराव पाटील, प्रदेश कार्यकारिणी सदस्य स्वाती पिसाळ, विठ्ठल बलशेटवार, चित्रलेखा माने-कदम, माजी जि.प. सदस्य सागर शिवदास, कराड दक्षिणचे माजी तालुकाध्यक्ष पैलवान धनंजय पाटील, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष सुरज शेवाळे, कविता कचरे, ...

ठेवीदारांनी अफवांवर विश्वास ठेवू नये -शेखर चरेगावकर

Image
  'यशवंत'च्या ठेवीदारांनी अफवांवर विश्वास ठेवू नये - शेखर चरेगावकर बँकेच्या कर्ज बुडव्यांनी आधी कर्ज भरावे मग आरोप करावेत... कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार; बँकेचा एक रुपया ही मी घेतला नाही -  चरेगावकर कराड, दि. 14 (प्रतिनिधी) - यशवंत बँकेच्या माध्यमातून कर्ज घेऊन ते बुडवणारे संजीव कुलकर्णी माझ्यावर खोटेनाटे आरोप करत वकिलाच्या माध्यमातून खोटी कर्ज प्रकरणे व बोगस संस्था दाखवून घोटाळा केल्याचे सांगणारे हे कुलकर्णी कोर्टात का जात नाहीत. अपील का करत नाहीत, कोणतेही पुरावे नसताना केवळ स्वार्थासाठी माझी प्रतिमा मलीन करण्याचे कारस्थान सुरु असून हे मी कदापी खपवून घेणार नाही व मी कुठल्याही चौकशीला सामोरे जाण्याची माझी तयारी असून मी घाबरणारा नाही. त्यामुळे यशवंत बॅंकेत कोणतेही गैरव्यवहार झालेले नाहीत. कर्जदार व ठेवीदारांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. असे आवाहन बँकेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी पत्रकार परिषदेत केले आहे. कुलकर्णी व त्यांना मदत करणाऱ्या काही जणांनी हायकोर्टात अपील दाखल केले मात्र त्या ठिकाणी त्यांना अपील मागे घ्यावे लागले. 101 चा दाखला प्राप्त केला तर अ...

माजी खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून 2 कोटीचा निधी

Image
  वसंतगड तळबीड- वराडे- हनुमानवाडी- शिवडे रस्त्याचे भूमिपूजन प्रसंगी सारंग पाटील, सरपंच अमित नलवडे, रघुनाथ नलवडे वसंतगड- तळबीड -शिवडे रस्त्याचे भूमिपूजन माजी खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून 2 कोटीचा निधी कराड, दि. 11 :- वसंतगड- तळबीड - शिवडे या रस्त्याची सुधारणा करण्यासाठीच्या 2 कोटी रुपयांच्या विकास कामाचे भूमिपूजन राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) गटाचे आयटी सेलचे सारंग पाटील यांच्या हस्ते पार पडले.  सातारा जिल्ह्याचे माजी खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून वसंतगड तळबीड- वराडे- हनुमानवाडी- शिवडे या रस्त्याला निधी मंजूर झाला आहे.  या रस्ता भूमिपूजनास बाजार समितीचे माजी सभापती रघुनाथ नलवडे, सरपंच अमित नलवडे, ग्रामपंचायत सदस्य सुहास कदम, योगेश गुरव, जालिंदर जामदार, कविता निंबाळकर, शारदा येडगे, सुरेखा पाचुकते, राजश्री महाडिक, वसंतगड सेवा सोसायटीचे सदस्य दत्तात्रय गुरव, रत्नमाला जामदार, शंकर निंबाळकर, लक्ष्मण महाडिक, संतोष पाटील, आबासो कोकरे, संभाजी कोकरे, मोहन नांगरे, तानाजी वाघमारे, आनंदा मोहिते, ग्रामसेवक विशाल मोहिते, उद्योजक रवी जामदार, विठ्ठल चव्हाण, मधुकर...

कराड नगरपालिका नगरवाचनालयात मोफत बाल वाचनालय सुरु

Image
  कराड नगरपालिका नगरवाचनालयात मोफत बाल वाचनालय सुरु कराड, दि. 9 - कराड नगरपालिका नगरवाचनालयात सन. २०२५ रोजीच्या उन्हाळी सुटटी निमित्त १३ मे २०२५ पासुन मोफत बालवाचनालय सुरु करण्यात आले आहे. या वाचनालयाचा लाभ ६ ते १४ वयोगटातील विद्यार्थ्यांना दिला जाणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातुन विदयार्थ्यांच्यात वाचनाची आवड निर्माण करणेची गरज आहे.  सध्या मोबाईल इंटरनेट व इतर करमणूकींच्या प्रसार माध्यमांच्या आक्रमणांमुळे विदयार्थ्यांची वाचनाची सवय कमी झालेली आहे. सहाजिकच मोबाईल इंटरनेट व इतर करमणूकींच्या प्रसार माध्यमांवर दाखविल्या जाणा-या कार्यक्रमांचा प्रभाव विदयार्थ्यांवर पडलेला आहे.  या मोफत बालवाचनालयामुळे मुलांना वाचनाची गोडी, आवड व चांगले संस्कार निर्माण होणार आहेत. याकरीता पालकांनी स्वतःच वाचनासारख्या चांगल्या सवयी अंगी बाणवून घेणे आवश्यक आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या वयाचा विचार करता त्या वयाच्या मुलांची आकलनशक्ती ही कोणतीही गोष्ट चटकन आत्मसात करुन घेण्याची असते. या वयातच त्यांना वाचनासारख्या चांगल्या गोष्टीची सवय लावली तर पुढे आयुष्यभर ही सवय जोपासली जाते. म्हणुन वाचनाची आवड न...

एमकेसीएलकडून नव्या युगासाठी तयारी – एआय-सक्षम MS-CIT कोर्सचे उद्घाटन

Image
  एमकेसीएलकडून नव्या युगासाठी तयारी – एआय-सक्षम MS-CIT कोर्सचे उद्घाटन कराड, दि. 7 - महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (MKCL) ने आपल्या लोकप्रिय MS-CIT कोर्सचे नव्याने रूपांतर करून AI-Powered MS-CIT कोर्स सादर केला आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) वेगाने विकसित होत असलेल्या जगात सर्वसामान्य नागरिकही सक्षम होतील, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा कोर्स तयार करण्यात आला आहे. गेल्या २० वर्षांत 1.65 कोटींहून अधिक विद्यार्थ्यांनी MS-CIT कोर्सद्वारे डिजिटल साक्षरतेची वाटचाल केली आहे. आता, AI आणि डिजिटल युगातील नव्या कौशल्यांची गरज लक्षात घेऊन, MKCL ने कोर्समध्ये 100 हून अधिक AI टूल्स व 400 पेक्षा अधिक उपयुक्त कौशल्यांचा समावेश केला आहे. या कोर्समध्ये ChatGPT, Google Gemini, Microsoft Copilot यांसारख्या आधुनिक AI साधनांचा वापर शिकवला जातो. याशिवाय, सायबर सुरक्षा, डेटा विश्लेषण, क्लाउड तंत्रज्ञान व डिजिटल व्यवहारांची माहितीही विद्यार्थ्यांना मिळणार आहे. हा कोर्स शालेय विद्यार्थी, पालक, शिक्षक, गृहिणी, व्यावसायिक व स्टार्टअप्स सुरू करू पाहणाऱ्यांसाठी खुला आहे. राज्यातील 4500 पेक्षा अधिक अधिकृत केंद्रां...

प्रेम संबंधाच्या संशयावरून युवकाचे अपहरण करून खून; 7 जण अटक

Image
  प्रेम संबंधाच्या संशयावरून युवकाचे अपहरण करून खून; 7 जण अटक  कराड, दि. 6 - प्रेम संबंधाचा संशय असल्याच्या कारणावरून कासेगाव येथील सात जणांनी एकाचे अपहरण करून त्यास बेदम मारहाण करून खून केल्याची घटना काल उघडकीस आली आहे. याप्रकरणी कराड इस्लामपूर पोलिसांनी तपास करून सात जणांना अटक केली आहे. सुदाम मोहन पवार वय 27 वर्षे, अमर सुरेख खोत वय 27 वर्षे, उमेश रविंद्र पाटील वय 28 वर्षे, ऋषिकेश धनाजी तोडकर वय 26 वर्षे, राकेश रामदास पाटील वय 26 वर्षे, विराज युवराज तोडकर वय 26 वर्षे, विशाल हणमंत शिद वय 23 वर्षे सर्व रा. कासेगाव ता. वाळवा जि. सांगली अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत कराड तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दि. 5 रोजी दुपारी 2 ते सायकांळी 5.15 वा.चे. दरम्यान रहिमतुल्ला सलिम आतार (वय-27) वर्षे, व्यवसाय-मोबाईल दुरुस्ती रा. पोस्ट ऑफिस समोर कासेगाव ता. वाळवा जि. सांगली यास चुलत बहीणीचे सोबतच्या असले प्रेमसंबंधाचे संशयाचे कारणावरुन आरोपी राकेश पाटील व त्याच्या साथीदारांनी रहिमतुल्ला यास जिवे मारण्याचे उददेशाने अपह...

कराडच्या यशवंत बँकेची सीबीआयतर्फे चौकशी करण्याचे केंद्रीय गृहमंत्र्यांचे आश्वासन

Image
कराडच्या यशवंत बँकेची सीबीआयतर्फे चौकशी करण्याचे केंद्रीय गृहमंत्र्यांचे आश्वासन  यशवंत बँकेचे तत्कालीन अध्यक्ष शेखर चरेगावकरांकडून कोट्यावधीचा घोटाळा यशवंत को-ऑपरेटिव्ह बँकेविरोधात ठेवीदार, कर्जदारांचा न्यायालय, पोलीस व अन्य पातळ्यांवर लढा सुरू  कराड, दि. 5 (प्रतिनिधी) - कराड येथील यशवंत को-ऑपरेटिव्ह बँकेच्या माध्यमातून तत्कालीन चेअरमन व संचालक मंडळांनी बँकेत दीडशे कोटी रुपये हुन अधिक रुपयांचा घोटाळा केल्याचे उघड होत असून यासंबंधी ठेवीदार, कर्जदार व तक्रारदारांनी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांची भेट घेऊन या घोटाळ्याची सीबीआय मार्फत चौकशी करावी अशी मागणी केली केली असल्याची माहिती ठेवीदार कर्जदार यांच्या वतीने लढा देणाऱ्या एड. निलेश जाधव व पिडीतानी पत्रकार परिषदेत दिली आहे. केंद्रीय मंत्री शहा यांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचे आश्वासन दिली आहे. यशवंत बँकेच्या विरोधात ठेवीदार, कर्जदार न्यायालयासहित पोलीस व अन्य पातळ्यांवर लढा देत आहेत. त्याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत अॅड. जाधव व तक्रारदारांनी दिली. याप्रसंगी फसवणूक झालेले ठेवीदार, कर्जदार उपस्थित होते....

अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी आरोपीस सश्रम कारावास

Image
अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी आरोपीस सश्रम कारावास   अवघ्या ७२ तासांत आरोपपत्र दाखल; चाळीस दिवसात प्रथमच फास्ट ट्रॅक कोर्ट कडून आरोपीस शिक्षा  कराड न्यायालयाच्या इतिहासात कमी वेळेत चाललेला पहिलाच खटला... कराड, दि. 3 - अल्पवयीन मुलगी शाळेतून घरी जाताना तिचा पाठलाग करून विनयभंग करणाऱ्या आरोपीस एक महिना सात दिवसांचा सश्रम कारावास आणि एक हजारांच्या दंडाची शिक्षा झाली आहे. येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती के. एस. होरे यांनी शुक्रवारी ही शिक्षा ठोठावली. दिपक विलास जाधव (रा. खराडे) असे संबंधित आरोपीचे नाव आहे.  दरम्यान अवघ्या 72 तासात आरोप पत्र दाखल करून तपास अधिकारी डीवायएसपी अमोल ठाकूर यांनी न्यायालयास फास्टट्रॅक कोर्टच्या माध्यमातून सदर केसचा निकाल लावण्यासाठी प्रयत्न केल्याने कराड न्यायालयाच्या इतिहासात प्रथमच कमी वेळेत (30 दिवसात) चाललेला पहिलाच खटला म्हणून नोंद झाली आहे. याबाबतची माहिती अशी की, कराड तालुक्यातील खराडे गावात 25 मार्च रोजी ही घटना घडली होती. पोलिसांनी त्या गुन्ह्याचा तपास करत अवघ्या ७२ तासांत त्याचे आरोपपत्र दाखल केले होते. त्या खटल्याचे काम ...

कराड नगर परिषद स्वच्छतेत अग्रेसर राहावी; जयवंत पाटील....,

Image
कराड -  आ. डॉ. अतुल भोसले यांना पत्र देताना माजी नगराध्यक्ष जयवंत पाटील... कराड नगरपालिकेचा स्वच्छतेतील लौकिक कायम ठेवा... माजी नगराध्यक्ष जयवंतराव पाटील यांचे आमदार डॉ. अतुल भोसले व मुख्याधिकार्यांना पत्र कराड, दि. 3 - घनकचरा व्यवस्थापनातील रोल मॉडेल असणार्या व स्वच्छ सर्वेक्षणमध्ये देशपातळीवर प्रथम क्रमांक मिळवणार्या कराड नगरपालिकेची स्वच्छतेतील कामगिरी गेल्या तीन वर्षांत घसरली आहे. कराड शहरवासीयांनी आतापर्यंत नगरपालिकेच्या स्वच्छता विषयक उपक्रमांना सहकार्य केले आहे. शहर स्वच्छतेत आघाडीवर राहावे, अशी शहरवासीयांची भावना आहे. त्यामुळे कराड पालिका स्वच्छतेत अग्रेसर राहावी, यादृष्टीने व्यापक बैठक घेऊन सुचना द्याव्यात, अशा मागणीचे पत्र लोकसेवा शहर विकास आघाडीचे अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष जयवंतराव पाटील यांनी आ. डॉ अतुल भोसले आणि मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांना दिले आहे. या पत्रात म्हटले आहे की, कराड शहर हे प्राचीन काळापासून व्यापारी शहर म्हणून ओळखले जाते. शहराला मोठा वारसा आहे. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब व दिवंगत माजी नगराध्यक्ष स्वर्गीय पी. डी. पाट...