एमकेसीएलकडून नव्या युगासाठी तयारी – एआय-सक्षम MS-CIT कोर्सचे उद्घाटन
एमकेसीएलकडून नव्या युगासाठी तयारी – एआय-सक्षम MS-CIT कोर्सचे उद्घाटन
कराड, दि. 7 - महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (MKCL) ने आपल्या लोकप्रिय MS-CIT कोर्सचे नव्याने रूपांतर करून AI-Powered MS-CIT कोर्स सादर केला आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) वेगाने विकसित होत असलेल्या जगात सर्वसामान्य नागरिकही सक्षम होतील, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा कोर्स तयार करण्यात आला आहे.
गेल्या २० वर्षांत 1.65 कोटींहून अधिक विद्यार्थ्यांनी MS-CIT कोर्सद्वारे डिजिटल साक्षरतेची वाटचाल केली आहे. आता, AI आणि डिजिटल युगातील नव्या कौशल्यांची गरज लक्षात घेऊन, MKCL ने कोर्समध्ये 100 हून अधिक AI टूल्स व 400 पेक्षा अधिक उपयुक्त कौशल्यांचा समावेश केला आहे.
या कोर्समध्ये ChatGPT, Google Gemini, Microsoft Copilot यांसारख्या आधुनिक AI साधनांचा वापर शिकवला जातो. याशिवाय, सायबर सुरक्षा, डेटा विश्लेषण, क्लाउड तंत्रज्ञान व डिजिटल व्यवहारांची माहितीही विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
हा कोर्स शालेय विद्यार्थी, पालक, शिक्षक, गृहिणी, व्यावसायिक व स्टार्टअप्स सुरू करू पाहणाऱ्यांसाठी खुला आहे. राज्यातील 4500 पेक्षा अधिक अधिकृत केंद्रांवर प्रवेश सुरू झाले असून, नागरिकांनी आपल्या जवळच्या MS-CIT केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन दक्षिण विभागीय समन्वयक अनिल गावंडे यांच्याकडून करण्यात आले आहे.
🧠 डिजिटल युगात एक स्मार्ट पाऊल – AI Powered MS-CIT कोर्स आता उपलब्ध!
📍 MKCL ने सादर केला आहे नविन MS-CIT – आता AI टूल्ससह अधिक स्मार्ट आणि अप-टू-डेट!
🛠️ 100+ AI टूल्स, 400+ स्किल्स, आणि आधुनिक कौशल्यांचं प्रशिक्षण आता तुमच्या जवळच्या MS-CIT सेंटरवर!
🎓 शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, 👩💼 गृहिणी, 👨🏫 शिक्षक, 🚀 स्टार्टअप करणारे, आणि 💼 नोकरी शोधणारे – सर्वांसाठी उपयुक्त!
💡 शिकवा: ChatGPT, Google Gemini, Microsoft Copilot
🔒 सायबर सुरक्षा | 📊 डेटा विश्लेषण | 💻 Microsoft Office | 📱 UPI-DigiLocker
📌 प्रवेश सुरू – तुमच्या जवळच्या 4500+ केंद्रांपैकी एका केंद्राशी आजच संपर्क करा!
🌐 अधिक माहितीसाठी भेट द्या: www.mkcl.org
MKCL आणि सनबीम संस्थेतर्फे पत्रकारांसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर कार्यशाळा
महाराष्ट्र ज्ञान महामंडळ आणि सनबीम संस्थेच्यावतीने पत्रकारांसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (कृत्रिम बुद्धिमत्ता) पत्रकारीतेत वापर या विषयावर आधारित मोफत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. सध्याच्या तंत्रज्ञान युगात एआयचे महत्त्व आणि त्याचा दैनंदिन जीवनातील विविध क्षेत्रांमध्ये होणारा वापर लक्षात घेता, ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे विनायक कदम, त्यांचे सहकारी दीपक कुंभार यांनी चाट जीपीटी आणि इतर एआय जनरेटर्सच्या मदतीने कार्यालयीन कामकाज आणि दैनंदिन कामे कमी वेळेत आणि कमी खर्चात कशा प्रकारे सोपी करता येतील, याबद्दल सखोल माहिती दिली. महामंडळाचे दक्षिण विभागीय समन्वयक अनिल गावंडे यांनी महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या एमएससीआयटी या संगणक अभ्यासक्रमात १०० पेक्षा अधिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल्स शिकवले जातात. हा अभ्यासक्रम शालेय विद्यार्थी, पालक, शिक्षक, गृहिणी, व्यावसायिक आणि नवीन व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी अत्यंत उपयुक्त आहे हे सांगीतले. या कार्यशाळेच्या माध्यमातून पत्रकारांना एआय तंत्रज्ञानाची माहिती मिळाली आणि त्याचा उपयोग त्यांच्या कामात कसा करता येईल, याच माहिती मिळाली. अधिक माहिती आणि या अभ्यासक्रमात सहभागी होण्यासाठी जवळच्या एमएससीआयटी केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्यावतीने श्री. गावंडे यांनी केले.


Comments
Post a Comment