कराड तालुक्यातील एक आदर्श व्यक्तिमत्व; मा. अजित थोरात (काका)
आमचे मित्र आमचे चेअरमन ; मा. अजित थोरात (काका)
मा. अजितजी काका थोरात यांचा वाढदिवस आज साध्या पद्धतीने संपन्न होत आहे. मा. अजित काका ज्योतीराम थोरात थोरात, मलकापूर कराड तालुक्यातील एक आदर्श व्यक्तिमत्व. बीएपर्यंत शिक्षण घेऊन त्यांनी सामाजिक कार्याला सुरुवात केली. शालेय जीवनामध्ये व महाविद्यालयीन जीवनामध्ये त्यांनी मोठा मित्रपरिवार निर्माण केला. सामाजिक कार्यासोबत शेतीची आवड जोपासली. शेतीमध्ये त्यांनी चांगली बैल जोडी पाळण्याचा छंद जोपासला. आजही त्यांच्याकडे उत्तम बैल जोडी आहे. मळाई ग्रुप मध्ये काम करीत असताना मळाई ग्रुप मधील श्री मळाईदेवी शिक्षण संस्था, श्री मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्था, आदर्श जुनिअर कॉलेज व चव्हाण विद्यालय, मलकापूर, आनंदराव चव्हाण विद्यालय, पोतले, श्रीमती कन्या शाळा मलकापूर, न्यू इंग्लिश स्कूल कासार शिरंबे, स्टार इंग्लिश मीडियम स्कूल व जुनिअर कॉलेज मलकापूर, आदर्श प्राथमिक विद्यालय मलकापूर, आदर्श प्राथमिक विद्यालय आ.नगर, जमना सहकारी ग्राहक संस्था मलकापूर, आदर्श क्रीडा संस्था कराड, कराड तालुका ॲमयुचर अथलेटिक असोसिएशन कराड, समाज प्रबोधन सार्वजनिक वाचनालय मलकापूर, विज्ञान प्रबोधनी मलकापूर, यशवंत कृषी विकास संस्था कराड, यशवंत फळे, फुले, भाजीपाला खरेदी - विक्री सहकारी संस्था मर्यादित कराड, मलकापूर जिमखाना असोसिएशन मलकापूर या सर्व संस्थांमध्ये ते सभासद असून संस्थांच्या कारभारामध्ये फार मोठे योगदान आहे. महाविद्यालयीन जीवनात त्यांनी खेळाची फार मोठी हौस जोपासली. त्यातूनच त्यांनी धावण्याच्या स्पर्धा खेळल्या व खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे काम कराड तालुका ॲमेझॉन ॲथलेटिक असोसिएशन मार्फत करतात. त्यांना नेमबाजीचा शौक असून ते गेली अनेक वर्ष राष्ट्रीय स्तरावर नेमबाजी करीत असतात. त्यासाठी त्यांना मा. शिवाजीराव थोरात व सारंग शिवाजीराव थोरात यांचे सहकार्य लाभले. सहकार क्षेत्रात त्यांचे फार मोठे योगदान असून जखिनवाडीत विविध विकास सेवा सोसायटी मध्ये अनेक वर्ष संचालक व चेअरमन म्हणून काम केले आहे. आज घडीला ते सोसायटीचे चेअरमन आहेत. सहकारी दूध संस्था, सहकारी ग्राहक संस्था यामध्ये ते संचालक म्हणून काम करतात. मलकापूर नगर परिषदेमधील नगरसेवक व विरोधी पक्ष नेता म्हणून गेल्या पंचवार्षिक योजनेत त्यांनी चांगले काम केले. सर्वच पक्षांमध्ये त्यांचे अनेक मित्र आहेत. माननीय स्वर्गीय विलासकाका पाटील यांचा युवा कार्यकर्ता म्हणून काम केले. माननीय उदयसिंह पाटील यांचा सहकारी मित्र म्हणून काम केले. माननीय आमदार डॉ. अतुल भोसले यांचे सोबत गेले अनेक वर्ष सामाजिक व राजकीय कार्य करीत आहेत. श्री मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये अनेक वर्षे संचालक व सध्या चेअरमन म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे कार्यकिर्दीत पतसंस्थेच्या ठेवी, स्वनिधी व नफ्यामध्ये मोठी वाढ झालेली आहे. कुटुंबामध्ये एक मुलगा एक मुलगी व एकत्र कुटुंब. एकत्र कुटुंबात कसे राहावे याचा आदर्श त्यांनी घेतलेला आहे. मळाई ग्रुप मधील सर्व संस्थांचे पदाधिकारी माननीय अशोकराव थोरात यांचे मार्गदर्शनाखाली मा. अजित काका थोरात यांची प्रगतीकडे वाटचाल आहे. मळाई ग्रुपचे वतीने त्यांना दीर्घायुष्यासाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा……….
लेखक- दादासाहेब केरु कदम (गरुड)


Comments
Post a Comment