कराड उपजिल्हा रुग्णालयातील सेवा-सुविधा सुधारण्याच्या मागणीसाठी ग्राहक पंचायतचे शिष्टमंडळ सक्रिय
कराड उपजिल्हा रुग्णालयातील सेवा-सुविधा सुधारण्याच्या मागणीसाठी ग्राहक पंचायतचे शिष्टमंडळ सक्रिय
कराड, दि. 17 - कराड शहरातील ग्राहक पंचायतच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या विशेष मोहिमेअंतर्गत उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील अधीक्षक डॉ. सुनिता लाळे यांची भेट घेऊन रुग्णालयातील सेवा-सुविधा, अपूर्णता आणि दैनंदिन कामकाजाबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी रुग्णालयातील विविध अडचणींची माहिती देऊन त्या पूर्ततेसाठी शासनाकडे पाठपुरावा करून त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली.
त्याचबरोबर रुग्णाच्या सोबत असणाऱ्या नातेवाईकांना दवाखाना, प्रयोगशाळा, एक्स-रे, सी.टी. स्कॅन, एम.आर.आय. तपासण्या इत्यादींसाठी एकाच वेळी हॉस्पिटल सेवा, औषधे, रुग्णवाहिका, बिल भरणे तसेच विविध तपासण्यांसाठी रुग्णांना दुसरीकडे पाठवणे यासाठी पुरेसे मनुष्यबळ आवश्यक असल्याचे अधोरेखित करण्यात आले. यामुळे रुग्णाच्या सोबत असणाऱ्या व्यक्तीवर अतिरिक्त ताण येतो.
या पार्श्वभूमीवर, अशा सेवेची आवड असलेल्या, सेवाभावी वृत्तीने अल्प मोबदल्यात काम करू इच्छिणाऱ्या नागरिकांनी किवा सेवाभावी संस्था, मंडळे यांनी ग्राहक पंचायतचे अध्यक्ष नितीन शहा (मो. ८१४९३७८४२०) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले.
या बैठकीस ग्राहक पंचायत कराड शहरचे अध्यक्ष नितीन शहा, कैलास थोरवडे, हिरालाल खंडेलवाल, डॉ. धनंजय खैर, संतोष पालकर, दत्ताजी खुडे-देशमुख इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

Comments
Post a Comment