प्रेम संबंधाच्या संशयावरून युवकाचे अपहरण करून खून; 7 जण अटक
प्रेम संबंधाच्या संशयावरून युवकाचे अपहरण करून खून; 7 जण अटक
कराड, दि. 6 - प्रेम संबंधाचा संशय असल्याच्या कारणावरून कासेगाव येथील सात जणांनी एकाचे अपहरण करून त्यास बेदम मारहाण करून खून केल्याची घटना काल उघडकीस आली आहे. याप्रकरणी कराड इस्लामपूर पोलिसांनी तपास करून सात जणांना अटक केली आहे.
सुदाम मोहन पवार वय 27 वर्षे, अमर सुरेख खोत वय 27 वर्षे, उमेश रविंद्र पाटील वय 28 वर्षे, ऋषिकेश धनाजी तोडकर वय 26 वर्षे, राकेश रामदास पाटील वय 26 वर्षे, विराज युवराज तोडकर वय 26 वर्षे, विशाल हणमंत शिद वय 23 वर्षे सर्व रा. कासेगाव ता. वाळवा जि. सांगली अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत कराड तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दि. 5 रोजी दुपारी 2 ते सायकांळी 5.15 वा.चे. दरम्यान रहिमतुल्ला सलिम आतार (वय-27) वर्षे, व्यवसाय-मोबाईल दुरुस्ती रा. पोस्ट ऑफिस समोर कासेगाव ता. वाळवा जि. सांगली यास चुलत बहीणीचे सोबतच्या असले प्रेमसंबंधाचे संशयाचे कारणावरुन आरोपी राकेश पाटील व त्याच्या साथीदारांनी रहिमतुल्ला यास जिवे मारण्याचे उददेशाने अपहरण करुन त्यास लोखंडी रॉड, लाकडी दांडके, पीव्हीसी पाईपने मारहाण केली. या मारहाणीत तो गंभीर जखमी होवून उपचारास दाखल होवून उपचारा दरम्यान मयत झाला. मयताचे भावाचे तक्रारीवरून कराड तालुका पोलीस ठाणे भाग 5 गु.र.नं. 290/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103 (1), 140(1), 119,3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आला आहे.
सदर घटनेचे गार्भीय ओळखून उपविभागीया पोलीस अधिकारी अमोल ठाकुर साहेब, पोनि जगताप, सपोनि बिराजदार, पोउनि श्री पाटील असे प्रथम कृष्णा हॉस्पिटल कराड येथे जावून आरोपी व त्यांचेनातेवाईक यांचेकडे विचारपुस करून आरोपी निष्पन्न करून मा. अपर पोलीस अधीक्षक सो सातारा यांच्या मागदर्शनाखाली आरोपी शोधाकरीता मा. उविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर, पोनि महेंद्र जगताप, सपोनि सखाराम बिराजदार, पोउपनि साक्षात्कार पाटील यांचे अधिपत्यात कराड तालुका व कासेगाव पोलीस ठाणेकडील अंमलदार यांची विविध पथके तयार करून नमुद आरोपी यांचा वाठार, रेठरे, कासेगाव येथे विविध ठिकाणी शोध घेवून छापा कारवाई करून नमुद गुन्हयातील एकुण 07 आरोपी यांना ताब्यात घेण्यात यश आलेले आहे. यातील मयत व आरोपी असे दोन्हीही कासेगाव ता. वाळवा जि.सांगली येथील रहिवासी असल्याने तपासकामी उपविभागीय पोलीस अधिकारी इस्लामपूर श्री. मंगेश चव्हाण व त्यांची टीम यांची देखील मोलाची मदत झाली. नमुद गुन्हयाचा पुढील तपास सपोनि सखाराम बिराजदार हे करत आहेत.
सदरची कारवाई अपर पोलीस अधीक्षक सातारा यांच्या मागदर्शनाखाली मा. उविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर, उपविभागीय पोलीस अधिकारी इस्लामपूर श्री. मंगेश चव्हाण, कराड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, सपोनि सखाराम बिराजदार, पोउपनि साक्षात्कार पाटील, कासेगाव पोलीस ठाण्याचे पोउपनि कृष्णत कांबळे तसेच कराड तालुका व कासेगाव जि. सांगली पोलीस ठाणेकडील स्टाफ यांनी केली आहे.

Comments
Post a Comment