कराड नगरपालिका नगरवाचनालयात मोफत बाल वाचनालय सुरु

 


कराड नगरपालिका नगरवाचनालयात मोफत बाल वाचनालय सुरु

कराड, दि. 9 - कराड नगरपालिका नगरवाचनालयात सन. २०२५ रोजीच्या उन्हाळी सुटटी निमित्त १३ मे २०२५ पासुन मोफत बालवाचनालय सुरु करण्यात आले आहे. या वाचनालयाचा लाभ ६ ते १४ वयोगटातील विद्यार्थ्यांना दिला जाणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातुन विदयार्थ्यांच्यात वाचनाची आवड निर्माण करणेची गरज आहे. 

सध्या मोबाईल इंटरनेट व इतर करमणूकींच्या प्रसार माध्यमांच्या आक्रमणांमुळे विदयार्थ्यांची वाचनाची सवय कमी झालेली आहे. सहाजिकच मोबाईल इंटरनेट व इतर करमणूकींच्या प्रसार माध्यमांवर दाखविल्या जाणा-या कार्यक्रमांचा प्रभाव विदयार्थ्यांवर पडलेला आहे. 

या मोफत बालवाचनालयामुळे मुलांना वाचनाची गोडी, आवड व चांगले संस्कार निर्माण होणार आहेत. याकरीता पालकांनी स्वतःच वाचनासारख्या चांगल्या सवयी अंगी बाणवून घेणे आवश्यक आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या वयाचा विचार करता त्या वयाच्या मुलांची आकलनशक्ती ही कोणतीही गोष्ट चटकन आत्मसात करुन घेण्याची असते. या वयातच त्यांना वाचनासारख्या चांगल्या गोष्टीची सवय लावली तर पुढे आयुष्यभर ही सवय जोपासली जाते. म्हणुन वाचनाची आवड निर्माण करण्याचे महत्वाचे कार्य ग्रंथालयामार्फत केले जाते. 

ग्रंथालय हे ज्ञानाचा ठेवा संग्रहित करुन ठेवण्याचे एकमेव साधन असल्याने ज्या ज्या साहित्यापासुन ज्ञान मिळते, असे सर्व साहित्य नगरवाचनालय उपलब्ध करुन देत आलेले आहे. मुलांना वाचनाची जास्तीत जास्त आवड निर्माण व्हावी या हेतुने नगरवाचनालयाने अल्प फी घेऊन पुस्तके घरी नेऊन वाचनेची सोय उपलब्ध केली आहे. 

या वाचनालयात मुलांना शेरलॉक होम्स, हॅरी पॉटर, रॉबिन्सन कुसो, पंचतंत्र, चांदोबा, गलिव्हरच्या सफरी, कुमार कथा, मुलांचे मासिक, इ. मनोरंजक पुस्तके तसेच तत्वज्ञ, संत वाडमय, धार्मिक, सामाजिक इ. क्षेत्रातील थोर महापुरुषांची चरित्रे, इ. पुस्तके उपलब्ध केली आहेत. 

या मोफत बालवाचनालयाची मुदत दि.१३ मे २०२५ ते दि. १५ जुन २०२५ अखेर असून वेळ सकाळी ९ ते १.३० व सायं. ४.०० ते ८.०० अशी आहे. या बालवाचनालयाचा लाभ सर्व बालवाचकांनी घ्यावा, असे आवाहन मुख्याधिकारी तथा प्रशासक प्रशांत व्हटकर व प्रभारी ग्रंथपाल महेंद्र लोखंडे यांनी केले आहे.

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक