अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी आरोपीस सश्रम कारावास
अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी आरोपीस सश्रम कारावास
अवघ्या ७२ तासांत आरोपपत्र दाखल; चाळीस दिवसात प्रथमच फास्ट ट्रॅक कोर्ट कडून आरोपीस शिक्षा
कराड न्यायालयाच्या इतिहासात कमी वेळेत चाललेला पहिलाच खटला...
कराड, दि. 3 - अल्पवयीन मुलगी शाळेतून घरी जाताना तिचा पाठलाग करून विनयभंग करणाऱ्या आरोपीस एक महिना सात दिवसांचा सश्रम कारावास आणि एक हजारांच्या दंडाची शिक्षा झाली आहे. येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती के. एस. होरे यांनी शुक्रवारी ही शिक्षा ठोठावली. दिपक विलास जाधव (रा. खराडे) असे संबंधित आरोपीचे नाव आहे.
दरम्यान अवघ्या 72 तासात आरोप पत्र दाखल करून तपास अधिकारी डीवायएसपी अमोल ठाकूर यांनी न्यायालयास फास्टट्रॅक कोर्टच्या माध्यमातून सदर केसचा निकाल लावण्यासाठी प्रयत्न केल्याने कराड न्यायालयाच्या इतिहासात प्रथमच कमी वेळेत (30 दिवसात) चाललेला पहिलाच खटला म्हणून नोंद झाली आहे.
याबाबतची माहिती अशी की, कराड तालुक्यातील खराडे गावात 25 मार्च रोजी ही घटना घडली होती. पोलिसांनी त्या गुन्ह्याचा तपास करत अवघ्या ७२ तासांत त्याचे आरोपपत्र दाखल केले होते. त्या खटल्याचे काम अत्यंत गतीने झाले. त्यामुळे अवघ्या एक महिना दहा दिवसांत त्याचा निकाल लागला. कराड न्यायालयाच्या इतिहासात सर्वात कमी वेळेत चाललेला खटला अशीही या खटल्याची नोंद झाली आहे.
आरोपी दिपक याने संबंधित अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला होता. तिला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले होते. त्याबाबत पोलिसांनी त्यांच्यावर पोक्सो कायद्यातंर्गत गुन्हा दाखल केला होता. अवघ्या ७२ तासांत त्या खटल्याचा तपास करून त्याचे दोषारोपपत्र न्यालयात दाखल केले होते. संबंधित संशयिताने तिचा विनयभंग केला होता. त्याविरोधात पोक्सोसहीत जातीवाचक शिवीगाळ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला होता.
कराडच्या अतिरिक्त जिल्हा सत्र न्या. श्रीमती होरे यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी सुरू झाली. अवघ्या एक महिना आठ दिवसांत ती पूर्ण झाली. त्यात सहायक जिल्हा सरकारी वकील मिलिंद कुलकर्णी यांनी सरकार पक्षातर्फे काम पाहिले. पाच साक्षीदार तपासले व खटल्यातील शिक्षेवर जोरदार युक्तीवाद केला. सदर घटनेचे पोलिस उपाधीक्षक अमोल ठाकूर यांनी या गुन्ह्याचा तपास केला होता. त्यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, पंच, व तपासी अंमलदार यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. त्यानंतर न्या. होरे यांनी वरील शिक्षा ठोठावली.
मसूर येथे दाखल असणाऱ्या पॉक्सो ॲट्रॉसिटी गुन्ह्यामध्ये माननीय पोलीस अधीक्षक समीर शेख व अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांचे मार्गदर्शनाखाली आम्ही तपास अधिकारी म्हणून कार्य करत असताना 72 तासांमध्ये दोषारोपपत्र दाखल केले
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून तत्काळ न्यायाधीश श्रीमती होरे मॅडम यांना विनंती करून सदर केस फास्टट्रॅक चालविण्या करता विनंती केली. माननीय कोर्टाने त्यानुसार गेल्या 30 दिवसांमध्ये सदर केस जलद सुनावणी नुसार घेतली. त्यानुसार सदर न्यायालयाने 40 दिवसांमध्ये केसचा निकाल दिला आहे. माननीय न्यायालयाने सदर खटल्यामध्ये आरोपी यास दोषी धरून त्यास सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये आम्ही उपविभागीय पोलीस अधिकारी कराड अमोल ठाकूर, मसूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक आदिनाथ खरात, डीवायएसपी ऑफिसचे ए एस आय संतोष सपाटे, संताजी जाधव व प्रशांत चव्हाण यांनी सहकार्य केले. तसेच सरकारी वकील म्हणून मिलिंद कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले.
आपले मार्गदर्शनाखाली मसूर येथे दाखल पोक्सो ॲट्रॉसिटी गुन्ह्यामध्ये आम्ही तपास अधिकारी म्हणून 72 तासांमध्ये दोषारोप पत्र दाखल केले.
सदर गुन्ह्यांमध्ये माननीय कोर्टाला समक्ष भेटून फास्टट्रॅक कटला चालवण्यास विनंती केली व त्यानुसार चाळीस दिवसांमध्ये दोषसिद्धी होऊन आरोपीला सश्रम कारावास झाला आहे.
डीवायएसपी अमोल ठाकूर

Comments
Post a Comment