भारतीय सैन्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मात करत मिळवला सियाचीनवर ताबा - लेफ्ट.जनरल संजय कुलकर्णी
कराड:लेफ्ट.जनरल संजय कुलकर्णी यांचा सन्मान करताना जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिरीष गोडबोले, रवळनाथ शेंडे... भारतीय सैन्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मात करत मिळवला सियाचीनवर ताबा - लेफ्ट.जनरल संजय कुलकर्णी कराड, दि. 31 - जनकल्याण प्रतिष्ठान व श्री रेफ्रिजेरेशन कराड यांच्या संयुक्त विद्यमाने सियाचीनची विजयगाथा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात भारतीय सैन्यदलाचे निवृत्त लेफ्टनंट जनरल, माजी महासंचालक व सियाचीनचे नायक अशी ओळख असणारे श्री.संजय कुलकर्णी प्रमुख म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व भारतमाता पूजनाने करण्यात आली. श्री.संजय कुलकर्णी यांचा श्री.शिरीष गोडबोले व श्री.रवळनाथ शेंडे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. तसेच या कार्यक्रमाच्या आयोजनातील सहकार्याबद्दल श्री. रवळनाथ शेंडे यांचा ही सत्कार करण्यात आला. हिमालयातील सियाचीन ग्लेशिअरवर ताबा मिळवण्यासाठी सैन्याच्या तुकडीचे प्रतिनिधित्व श्री.संजय कुलकर्णी यांनी केले होते तसेच सियाचीन ग्लेशिअर वर सर्वात प्रथम उतरणारे भारतीय सैनिक म्हणून 'सियाचीनचे नायक' म्हणून त्यांना गौरव...