कराडसह परिसरात तीन वर्षांत ७६ गॅस सिलेंडर जप्त; बारा जणांच्या वर गुन्हा दाखल.
कराडसह परिसरात तीन वर्षांत ७६ गॅस सिलेंडर जप्त; बारा जणांच्या वर गुन्हा दाखल.
कराड उपविभागात अवैध गॅस साठ्यांवर प्रभावी नियंत्रण - प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे
कराड, दि. 12 : - कराड व परिसरात अवैध पद्धतीने गॅस सिलेंडरचा साठा करून खाजगी वाहनांमध्ये गॅस भरण्याच्या प्रकारांवर पुरवठा विभागाने गेल्या तीन वर्षांत कारवाया करत एकूण ७६ गॅस सिलेंडर जप्त करून बारा जणांच्या वर गुन्हा दाखल केला असल्याची माहिती प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
2023 मध्ये आगाशिवनगर मलकापूर परिसरात चौघांच्यावर गुन्हा दाखल करत 27 सिलेंडर तर 2024 साली मलकापूर आगाशिवनगर, मंगळवार पेठ कराड येथे तिघांच्यावर गुन्हा दाखल करत 17 सिलेंडर व 2025 ऑगस्ट पर्यंत आगाशिवनगर, सैदापूर, बनवडी फाटा या ठिकाणी पाच जणांच्या वर गुन्हा दाखल करत 32 सिलेंडर जप्त केले आहेत.
कराड व मलकापूर परिसरात अवैध पद्धतीने गॅस सिलेंडरचा साठा करून खाजगी वाहनांमध्ये गॅस भरण्यात येत असल्याची माहिती पुरवठा विभागाला मिळाली होती. त्यानुसार सन २०२३ मध्ये १६ सप्टेंबर रोजी पूजा मार्केट पाठीमागे, आगरशिवनगर येथे २५ आणि ६ डिसेंबर रोजी ढेबेवाडी फाटा, मलकापूर येथे २ असे एकूण २७ सिलेंडर छापे टाकून जप्त करण्यात आले. या कारवाईत बाबासाहब इसाक मुल्ला, सादिक मुबारक मुजावर, इर्शाद रियाज नकाफ आणि आसिफ नबीलाल मोमीन यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते.
सन २०२४ मध्ये २६ ऑक्टोंबर रोजी विश्रामनगर, मलकापूर ९ सिलेंडर, २३ डिसेंबरला बागलवस्ती, आगरशिवनगर २ सिलेंडर , तसेच २७ डिसेंबरला पालकरवाडा, मंगळवार पेठ, कराड येथे ६ सिलेंडर छापा टाकत एकूण १७ सिलेंडर जप्त करण्यात आले होते. या कारवाईत अजय प्रफुल्ल काळसेकर, विशाल शिवाजी पवार, इकलास इसाक शेख यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते.
सन २०२५ मध्ये ३१ जानेवारीला सरीता बझारसमोर, आगरशिवनगर येथे २ सिलेंडर, ८ एप्रिल रोजी सैदापूर, कराड येथे २ सिलेंडर, तसेच शिवाजी स्टेडियमच्या पाठिमागे ३ सिलेंडर व ८ ऑगस्ट रोजी बनवडी फाटा, कराड येथे २५ सिलेंडर असे एकूण तब्बल ३२ सिलेंडर छाप्यांदरम्यान जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईत विजय चंदकांत लाड, मोहसीन इस्माईल मुजावर, बाबासाहब इसाक मुल्ला, महेश चव्हाण, संजय चौगुले यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या सर्व कारवायांमध्ये जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ कलम ३ व ७, तसेच भारतीय दंड संहिता १८६० आणि २०२३ मधील संबंधित कलमान्वये गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
या काळात पुरवठा विभागाने घेतलेल्या छाप्यांमधून अवैध गॅस साठ्यांवर प्रभावी नियंत्रण आणल्याचे प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी सांगितले.

Comments
Post a Comment