भारतीय सैन्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मात करत मिळवला सियाचीनवर ताबा - लेफ्ट.जनरल संजय कुलकर्णी
भारतीय सैन्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मात करत मिळवला सियाचीनवर ताबा - लेफ्ट.जनरल संजय कुलकर्णी
कराड, दि. 31 - जनकल्याण प्रतिष्ठान व श्री रेफ्रिजेरेशन कराड यांच्या संयुक्त विद्यमाने सियाचीनची विजयगाथा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात भारतीय सैन्यदलाचे निवृत्त लेफ्टनंट जनरल, माजी महासंचालक व सियाचीनचे नायक अशी ओळख असणारे श्री.संजय कुलकर्णी प्रमुख म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व भारतमाता पूजनाने करण्यात आली. श्री.संजय कुलकर्णी यांचा श्री.शिरीष गोडबोले व श्री.रवळनाथ शेंडे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. तसेच या कार्यक्रमाच्या आयोजनातील सहकार्याबद्दल श्री. रवळनाथ शेंडे यांचा ही सत्कार करण्यात आला.
हिमालयातील सियाचीन ग्लेशिअरवर ताबा मिळवण्यासाठी सैन्याच्या तुकडीचे प्रतिनिधित्व श्री.संजय कुलकर्णी यांनी केले होते तसेच सियाचीन ग्लेशिअर वर सर्वात प्रथम उतरणारे भारतीय सैनिक म्हणून 'सियाचीनचे नायक' म्हणून त्यांना गौरवपूर्वक उल्लेख केला जातो. भारतीय सैन्य दलातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना शौर्य पदक, सेना पदक व विशिष्ट सेवा पदक पुरस्कार प्राप्त आहेत.
श्री रेफ्रिकरेशन्स चे अध्यक्ष श्री.रवळनाथ शेंडे यांनी प्रास्ताविक मध्ये " प्रत्येक भारतीयाला देशाबद्दल व भारत भूमीचे रक्षण करणाऱ्या सैनिकांचा त्यांच्या शौर्य व पराक्रम यांचा अभिमान आहे. अशा अनुभव कथन विशेष कार्यक्रम आयोजनामुळे भारतीय सैन्याचे शौर्य विद्यार्थ्यांपर्यंत व नागरिकांपर्यंत पोहोचविणे शक्य होते आहे."
जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिरीष गोडबोले यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाचे महत्त्व सांगितले. जनकल्याण प्रतिष्ठान व श्री रेफ्रीजरेशन्स असे कार्यक्रम सातत्याने करत आहे व करत राहील यातून विद्यार्थ्यांना व लोकांना नक्कीच प्रेरणा मिळेल. असेही मनोगतात म्हणले.
सियाचीनची विजयगाथा
१३ एप्रिल १९८४ साली भारताने सियाचीन या हिमालयातील उंच ठिकाणावर ताबा मिळवला. हा ताबा मिळवतानाचा प्रतिकूल परिस्थितीवर मात करत भारतीय सैन्यांनी धैर्य, संयम, पराक्रम आणि युक्तीच्या बळावर सियाचीनवरील मिळवलेला विजय याबतीत इतिहास या कार्यक्रमात उलगडला.
यामध्ये शिस्तबद्ध नियोजन, सहकाऱ्यांचा एकमेकांवरील विश्वास, संयम, बर्फाळ प्रदेश, हेलिकॉप्टर मर्यादा व त्याचा योग्य वापर, क्षणाक्षणाला सतत बदलत असणारे वातावरण, सहकारी सैनिकाचा मृत्यू, ऋण तापणानात चाललेली मोहीम, आणि धैर्याने मिळवलेला ताबा तब्बल ४१ वर्षापूर्वी घडलेल्या घटनेचा प्रत्यक्ष सहभागी आणि साक्षीदार सैनिक सियाचीनची विजयगाथा सांगत आहे. सैनिकांचे सैन्याचे शौर्य ऐकत असताना उपस्थित सर्व कराडकर नागरिक व सरस्वती विद्यालयाचे विद्यार्थी देशभक्तीने भारावून गेले होते.
कार्यक्रमासाठी श्री रेफ्रिजरेशन्स व जनकल्याण प्रतिष्ठानचे संचालक, कराड शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तर सरस्वती विद्यालय विद्यार्थ्यांसाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
कार्यक्रमात सौ.रुपाली तोडकर यांनी अतिथी परीचय करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रथमेश इनामदार यांनी तर आभार सोनाली जोशी यांनी मानले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी संपूर्ण वंदे मातरम् म्हणले.




Comments
Post a Comment