बोगस मतदाना विरोधात संबंधितांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी ; प्रांताधिकारी

 

बोगस मतदाना विरोधात संबंधितांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी ; प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे

कराड, दि. 12 - कराड तालुक्यातील कपिल गोळेश्वर या ठिकाणी मतदार नोंदणी, बोगस मतदान या सदर्भात झालेल्या आरोपांवर कराड उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी अतुल मेहत्रे यांनी यासंबंधी ज्यांनी आरोप केले आहेत त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करावी त्यानंतर त्याबाबत संबंधित विभाग तपास करेल असे सांगत त्या 9 मतदारांची नावे वगळण्याची कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी तहसीलदार कल्पना ढवळे, पुरवठा अधिकारी साहिला नायकवडी, सहा. महसूल अधिकारी युवराज पाटील, निवडणूक नायब तहसीलदार हेमंत बेसके, सहाय्यक महसूल अधिकारी गोपाल वसू, शिवराज माळी उपस्थित होते. 

दरम्यान यावेळी प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी गतकाही विधानसभा तसेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूक कार्यक्रमा दरम्यान ऑनलाइन पद्धतीने नव मतदारांसह, विविध नमुन्यातील फार्मच्या माध्यमातून वाढीव मतदार, नावे वगळणे, पुनर्न नोंदणी यासह प्रत्येक वेळी झालेली वाढ, वगळलेली नावे याबाबतची सविस्तर आकडेवारीसह माहिती दिली. 

कराड दक्षिण मतदारसंघातील कापिल येथे मतदान केलेल्या नऊ मतदारांच्या नावांबाबत आलेल्या तक्रारींची चौकशी करून ते प्रत्यक्ष त्या ठिकाणी राहत नसल्याचा पंचनामा करण्यात आला असल्याचे सांगून मतदारांची नावे मतदार याद्यांतून वगळण्याची कार्यवाही लवकरच केली जाणार असल्याचे ही म्हेत्रे यांनी सांगितले.

कापिल व गोळेश्वर येथे बोगस मतदान झाल्याचा आरोप करत माजी ग्रामपंचायत सदस्य गणेश पवार यांनी माध्यमांसमोर त्या अनुषंगाने सोमवारी पुरावे सादर केले होते. गावात रहिवास नसलेल्या 9 मतदारांनी मतदान केले असून, एका महिला मतदाराने कोल्हापूरच्या पत्त्यावरील आधारकार्डच्या आधारे कापिल येथे मतदान केले आहे. तसेच काही मतदारांची नावे कापिल व गोळेश्वर या दोन्ही गावांच्या मतदार याद्यांमध्ये आढळून आली आहेत. शिवाय गोळेश्वरमध्ये तब्बल 75 बोगस मतदार असल्याचाही दावाही पवार यांनी पत्रकार परिषदेत केला होता. 

प्रांताधिकारी म्हेत्रे म्हणाले, मतदार नोंदणीची प्रक्रिया संपूर्णपणे ऑनलाईन आहे. संबंधित व्यक्तींनी नोंदणी करताना कोणती कागदपत्रे दिली, याची माहिती तक्रारींच्या अनुषंगाने घेतली जाईल, तसेच ज्यांनी बोगस मतदानाबाबत आरोप केले आहेत, त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करावी. 

दरम्यान, कापील व गोळेश्वर या दोन्ही गावच्या मतदार याद्यांमध्ये एकाच व्यक्तीचे नाव कसे आले? पत्ता नसताना किंवा दुसऱ्याच्या नावाचे वीजबिल देऊन मतदार नोंदणी कशी झाली? कोल्हापूरच्या पत्त्यावरून कापीलमध्ये मतदान कसे झाले? याबाबत ज्यांना हरकत आहे त्यांनी संबंधिता विरोधात पोलीस प्रशासनात तक्रार दाखल करावी असे सांगत प्रांताधिकारी म्हेत्रे यांनी नव मतदारसह नाव पत्ता बदलणे ही प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने केली जाते त्यासाठी लागणारी कागदपत्रे सोबत दिलेली असतात त्यासाठी ठराविक कालावधी ही दिला जातो शिवाय याबाबत राजकीय पक्षांसह सर्वांसाठी हरकत दाखल करण्यासाठी ही काही कालावधी दिला जातो त्यामध्ये हरकती अथवा पोलीस ठाण्यात तक्रारी झाल्या तर पुढील कारवाई केली जाते असे सांगितले.

मतदार नोंदणी बाबत प्राप्त झालेल्या तब्बल चार हजार हरकती मधून केवळ दहा हरकतींचा निपटारा झाला असल्याचे सांगून उर्वरित हरकतींवर कार्यवाही करण्यासाठी स्वतंत्र प्राधिकरण असल्याचेही प्रांताधिकारी म्हेत्रे यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान गणेश पवार यांनी केलेल्या आरोपामधील कापिल व गोळेश्वरमधील बोगस मतदारां बाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होऊन त्या अनुषंगाने पुढे काय कारवाई  होते हे पाहणे औत्सक्याचे ठरणार आहे.

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक