शहरातील अतिक्रमणाविरोधात हॉकर संघटनेचे पालकमंत्र्यांना निवेदन


शहरातील अतिक्रमणाविरोधात हॉकर संघटनेचे पालकमंत्र्यांना निवेदन

कराड, दि. 21 - कराड शहरात कालपासून कराड नगर परिषदेच्या वतीने अतिक्रमण मोहीम सुरू करण्यात आली आहे. ती चुकीच्या पद्धतीने असून शहरातील हाकर्स धारकांना योग्य न्याय द्यावा अन्यथा हॉकर्स धारकांना जीव देण्याशिवाय पर्याय नसल्याचा इशारा कराड शहर चार चाकी हातगाडा व हॉकर संघटनेच्या वतीने पालकमंत्री शंभूराज देसाई यांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे.

पालकमंत्री यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कराड शहरात अतिक्रमन वाढलेय हे मान्य आहे. या मागील कारण ही तपासले पाहिजे प्रत्येक वेळी वाहतुकीस अडचण म्हणून हातगाड्यावर कारवाई. नक्की आडचण कोणामुळे हे प्रशासन बघत नाही. हॉकर्स धारकांचा प्रश्न अजून मिटला नाही. सुप्रीम कोर्टाचा आदेश असूनही हॉकर्स झोनची निर्मिती झालेली नाही. 

वारंवार कोणाच्यातरी तक्रारिची दखल घेऊन गोरगरीब विक्रेत्यावर कारवाई होत आहे. कोर्टाच्या आदेशाचे कोणतीही आमलाबजावणी पालिकेकडून झालेली नाही. तरी आपणास ही विनती आहे की आमचे हक्काचे हॉकर्स झोन निर्मिती झाल्याशिवाय आमच्यावर कारवाई होऊ नये. अन्यथा आम्हा सर्व हॉकर्स धारकांना जीव देण्याशिवाय पर्याय नाही व यासाठी आम्ही कोणालाही जबाबदार धरणार नाही. कारण आमचे ऐकणारे कोणीच नाही त्यामुळे आम्ही कुटुंबासमवेत काहीही करून घेण्याच्या तयारीत आहोत 

या निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष जावेद नायकवडी, सचिव हरिभाऊ बल्लाळ, कार्याध्यक्ष प्रमोद तोडकर, खजिनदार तसेच सलीम पटेल आनंदराव लादे यांच्या सह्या आहेत.

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक