कराड - शुक्रवार पेठेत पंपिंग स्टेशन क्रमांक दोनजवळ व्यायामशाळेचे भूमिपूजन
शुक्रवार पेठेत पंपिंग स्टेशन क्रमांक दोनजवळ व्यायामशाळेचे भूमिपूजन
कराड, दि. 6 - येथील शुक्रवार पेठेत पंपिंग स्टेशन क्रमांक दोन शेजारच्या जागेत व्यायामशाळा बांधण्याच्या कामाचे भूमिपूजन शिवसेना नेते व यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्या हस्ते झाले. या कामासाठी 68 लाख 8 हजार रुपये खर्च येणार आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे पाठपुरावा करून राजेंद्रसिंह यादव यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून हा निधी मिळवला होता. या प्रभागाचे माजी नगरसेवक विजय वाटेगावकर यांनी पंपिंग स्टेशन क्रमांक दोन शेजारच्या जागेत व्यायामशाळा बांधण्याची मागणी केली होती. ही व्यायामशाळा दोन मजली असणार आहे.
याप्रसंगी विजय वाटेगावकर, माजी सभापती स्मिता हूलवान, सुधीर एकांडे, राजेंद्र डुबल, नामदेव किरपेकर, सागर माने, राजू गोरे, आशुतोष डुबल, सुलोचना पवार, सादिक मुजावर, राहुल थोरात, सुभाष पवार संतोष देसाई नितीन सुर्वे, विनोद भोसले, हारुण मुजावर यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
रंगारवेस येथेही व्यायामशाळा प्रस्तावित
दरम्यान शुक्रवार पेठेतील रंगारवेस येथे मारूती मंदिर परिसरातही व्यायामशाळा प्रस्तावित केली आहे. यासाठी पाठपुरावा सुरू असल्याची माहितीही विजय वाटेगावकर यांनी दिली.

Comments
Post a Comment