भाजपचे आरोप मतचोरीचा घोटाळा झाकण्यासाठीच - इंद्रजीत चव्हाण


भाजपचे आरोप मतचोरीचा घोटाळा झाकण्यासाठीच - इंद्रजीत चव्हाण

मी व माझ्या कुटुंबाने एकाच ठिकाणी मतदान केले आहे, भाजपने केलेल्या आरोपांचे खंडन 

कराड, दि. 22 : माझ्यावर व माझ्या कुटुंबावर दुबार मत नोंदणीचे केलेल्या आरोपांचे खंडन करतो कारण पृथ्वीराज चव्हाणांचे नाव घेऊन मतांची झालेली चोरी झाकण्यासाठीच भाजपच्या कराड दक्षिण मधील पदाधिकार्यांनी आरोप केले आहेत. भाजपचे आरोप हे मतचोरीचा घोटाळा झाकण्यासाठीच केले आहेत अशी टीका इंद्रजीत चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केली. 

यावेळी गजानन आवळकर, अजितराव पाटील, भानुदास माळी, झाकीर पठाण, दिग्विजय सूर्यवंशी, प्रशांत देशमुख, बंडानाना जगताप, नितीन थोरात, नानासो पाटील, शिवाजीराव मोहिते, प्रदीप जाधव, आदींची यावेळी उपस्थिती होती. 

भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या स्वीय सहाय्यकाचे मतदार यादीत दोन ठिकाणी मतदान नोंदणी असल्याचे पत्रकार परिषद घेऊन सांगितले होते. त्यानंतर आज पुन्हा भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी चव्हाण यांच्या कुटुंबीयांची नावे दोन मतदारसंघात दुबार तिबार असल्याचा दावा केला होता त्यावर आज काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी पत्रकार परिषद घेत विद्यमान आमदारांच्या स्वीय सहाय्यकांची दोन मतदारसंघात मतदान नोंदणी असल्याचा आरोप करत इतर आरोपांचे खंडन केले.

यापुढे बोलताना इंद्रजित चव्हाण म्हणले कि, दुबार मतदान नोंद आणि बोगस मतदान यामध्ये फरक आहे. माझे व माझ्या कुटुंबातील इतर सर्व सदस्यांचे असलेल्या दुबार मत नोंदणीबाबत आम्ही ज्या त्या वेळी निवडणूक आयोगाकडे मतदार यादीतील नाव कमी करून एकाच ठिकाणी नाव असण्याबाबत अर्ज केले होते परंतु असे असताना आमच्या कुटुंबातील सदस्यांचे नाव मतदार यादीत असणे हि निवडणूक आयोगाचीच चूक आहे असे आमचे स्पष्ट आरोप आहेत. 

मुळात मतदार यादीमध्येच घोळ आहे व ती सदोष झाली पाहिजे यासाठीच तर आमची मागणी आहे. परंतु निवडणूक आयोगावर आरोप केले तर त्यांच्या मदतीसाठी भाजपचे पदाधिकारी धावून येतात यावरूनच निवडणुकीत नक्की काय प्रकार झाला हे दिसून येते. माझे सद्याचे असलेले वय व मतदार यादीतील असलेले वय यामध्ये तफावत आहे. जर नाव नोंदणी नजीकची आहे तर ती सिद्ध करावी आणि जर दुबार मतनोंदणी प्रमाणे दुबार मतदान केले आहे तर ते पुराव्यासहित सिद्ध करावे अशी आमची मागणी आहे. 

यावेळी गजानन आवळकर म्हणले कि, माझे मार्गदर्शक माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण यांचा गेली ४० वर्षे मी स्वीय सहायक म्हणून काम करीत आहे. माझ्यावर झालेले आरोप निरर्थक आहेत कारण, माझे मूळ गाव वाठार असून मी राहायला कराड मध्ये आहे. दोन्ही ठिकाणी मतदानाची नोंदी बाबत निवडणूक आयोगाने दिलेल्या नोटिसीला उत्तर देण्यासाठी १४ ऑक्टोबर २०२४ रोजी इनकॅमेरा सुनावणी झाली होती. व त्याचवेळी निवडणूक आयोगाच्य कार्यालयात वाठार मध्येच मतदान नोंद ठेवण्याबाबत अर्ज केला होता पण अजूनही आमची नावे दोन्ही मतदार यादीत आहेत. कागदोपत्री सर्व पुरावे असताना सुद्धा माझे नाव जर दोन ठिकाणी असेल तर यामध्ये पूर्णपणे निवडणूक आयोगाची चुकी आहे. यामुळे माझ्यावर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या आरोपांचे मी खंडन करतो.

आमदार अतुल भोसलेंच्या स्वीय सहाय्यकांची नावे दोन मतदारसंघात नोंदणी

आमदार अतुल भोसले यांचे स्वीय सहाय्यक अमोल पाटील मूळ राहणार अंकलखोप व फत्तेसिंह सरनोबत मूळ राहणार इस्लामपूर यांच्या नावांची नोंद त्यांच्या मूळ गावात व कराड दक्षिण मतदारसंघात असल्याचा दावा पुराव्यासह अभिजीत सूर्यवंशी यांनी केला. तसेच कृष्णेच्या फीजिओथेरपी महाविद्यालयातील ५२ विद्यार्थ्यांची मतदान नोंदणी शिवनगर बुथवर केल्याचे सांगितले त्याचबरोबर त्यांच्या संस्थेतील काही निवृत्त कामगारांची नावेही रेठरे बुद्रूकच्या मतदार यादीत असल्याचा आरोप करत ही खरी मतांची चोरी असून भाजप याचे उत्तर देऊ शकत नाही, म्हणून काँग्रेसवर बोट दाखवले जात असल्याचा गणाघात सूर्यवंशी यांनी शेवटी केला


Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक