कराड बाजार समिती निकाल; उंडाळकर चव्हाण गटाची सत्ता कायम...
कराड बाजार समिती निकाल; उंडाळकर चव्हाण गटाची सत्ता कायम... कराड दि.1 (प्रतिनिधी) येथील शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत स्वर्गीय विलासराव पाटील उंडाळकर रयत पॅनलने 18 पैकी 12 जागा जिंकत बाजार समितीवरील सत्ता कायम ठेवली तर राष्ट्रवादीचे आ. बाळासाहेब पाटील व भाजपाचे डॉ. अतुल भोसले यांच्या शेतकरी विकास पॅनलला सहा जागावर विजय मिळवता आला. शेती उत्पन्न बाजार समिती कराडच्या निवडणुकीत मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पहिला निकाल बाहेर आला असून व्यापारी अडते मतदारसंघातून रयत पॅनलच्या दोन जागा मोठ्या फरकाने विजयी झाल्या आहेत. व्यापारी अडते मतदार संघातून शेतकरी पॅनलचे संतोष कृष्णत पाटील (80), राजेश रणजीत शहा (98) रयत पॅनलचे जयंतीलाल चतुरदास पटेल (259) , जगन्नाथ बळी लावंड (255) मते मिळाली आहेत येथील बाजार समितीच्या आवारात असणाऱ्या मिलिटरी कॅन्टीन नजीक सध्या मतमोजणी सुरू असून बाजार समिती समोर तसेच कराड कार्वे रोडवर दोन्ही पॅनेलच्या समर्थकाने निकाल ऐकण्यासाठी गर्दी केली आहे. शेतकरी विकास पॅनेलच्या सोसायटी मतदारसंघातून सर्वसाधारण गटातून जगदीश दिनकरराव जगताप (900) - -विजयी उमेदवार मा...