माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांना काँग्रेस पक्षाने कर्नाटक निवडणुकीसाठी स्टार प्रचारक म्हणून दिली जबाबदारी...

 


माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांना काँग्रेस पक्षाने कर्नाटक निवडणुकीसाठी स्टार प्रचारक म्हणून दिली जबाबदारी...

कराड दि.25-कर्नाटक विधानसभेची निवडणूक नुकतीच जाहीर झाली आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी 10 मे रोजी मतदान पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कर्नाटकमध्ये राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. 

कर्नाटक विधानसभा निवडणूक बहुमताने जिंकायची या इराद्याने काँग्रेसने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेसने देशातील तब्बल 40 बड्या नेत्यांची फौज तयार केली आहे.यामध्ये महाराष्ट्रातील दोन मोठ्या नेत्यांचा समावेश आहे. यामध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अशोकराव चव्हाण यांचा समावेश करण्यात आला आहे. 

कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस जोरदार मोर्चेबांधणी करत असून काँग्रेससाठी अवघड वाटणाऱ्या मतदारसंघात एकएका नेत्याची नियुक्ती केली आहे. मात्र, कुठल्याही परिस्थितीत काँग्रेसला कर्नाटकचा गड जिंकायचा आहे. कारण, आगामी लोकसभा निवडणुकांसाठी हा निकाल महत्त्वाचा ठरणार आहे. म्हणूनच काँग्रेसने ४० स्टार प्रचारक कर्नाटकच्या मैदानात उतरवले आहेत.

दरम्यान, कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी 13 एप्रिलपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरवात झाली आहे. 20 एप्रिलला उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. तर 10 मे रोजी मतदान आणि 13 मे रोजी मतमोजणी होणार आहे.

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक