सातारा जिल्ह्यात शस्त्र व जमावबंदी आदेश, बाजार समिती निवडणूकीच्या अनुषंगाने कलम 36 लागू...

 


कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी 6 मे पर्यंत शस्त्र व जमावबंदी...

सातारा , दि. 28 : सातारा जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार अगर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 (सुधारणा अध्यादेश) महाराष्ट्र पोलीस अधिनियम 2014 चे कलम चे कलम 37 (1) (3) अन्वये दि. 21 एप्रिल 2023 रोजीच्या मध्यरात्री 0.00 पासून ते दि. 6 मे 2023 रोजी रात्री 24.00 वाजेपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जिल्हादंडाधिकारी रुचेश जयवंशी यांनी जारी केला आहे.

या आदेशानुसार नागरिकांना शस्त्र, सोटे, तलवारी, भाले, बंदुका, सुऱ्या, काठ्या- लाठ्या किंवा शरीरास इजा करण्याकरिता वापरता येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे, कोणतेही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे, दगड किंवा अस्त्र, सोडावयाची अस्त्रे, फेकावयाची हत्यारे किंवा साधणे बरोबर घेणे, जमा किंवा तयार करणे, व्यक्तीची अगर प्रेते किंवा त्याच्या प्रतिमांचे प्रदर्शन करणे, सार्वजनिक रितीने घोषणा करणे, गाणी म्हणणे किंवा वाद्य वाजविणे, सभ्यता अगर नितीविरुद्ध याविरुध्दअसतील अशी किंवाराज्याची असतील अशी किंवा राज्याची शांतता धोक्यात येईल अशी भाषणे, हावभाव करणे, सोंग आणणे अशी चित्रे - चिन्हे, फलक अगर इतर कोणताही जिन्नस किंवा वस्तू तयार करणे किंवा त्यांचा लोकांत प्रसार करणे अशा मनाईचे उल्लंघन करुन जर कोणत्याही इसम अशी कोणतीही वस्तु बरोबर घेवून जाईल किंवा कोणताही जिन्नस दाहक पदार्थ किंवा अस्त्र जवळ बाळगतील तर तो कोणत्याही पोलीस अधिकाऱ्यांकडून निशस्त्र केले जाण्यास किंवा दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ क्षेपणास्त्र त्यांच्याकडून जप्त केले जाण्यास पात्र असेल आणि अशा तऱ्हेने जप्त केलेल्या वस्तू दाहक पदार्थ, स्फोटक पदार्थ, क्षेपणास्त्र हे सरकार जमा होईल. पोटकलम (3) अन्वये असलेल्या अधिकारान्वये सार्वजनिक सुव्यवस्था रोखण्यासाठी जमावास मिरवणूकीस वरील कालावधीत व कार्यक्षेत्रात या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

शासनाची सेवा करणारे किंवा नोकरी करण्याच्या कामी ज्यांच्या वरीष्ठांनी निर्दीष्ट केल्यावरुन अगर त्यांना कर्तव्याच्या स्वरपामुळे अशी खंड 1 मध्ये उल्लेखलेल्या पैकी वस्तु धारण करणे किंवा देणे आवश्‌यक आहे. ज्यांना शारिरीक दुर्बलतेच्या कारणावरुन जिल्हादंडाधिकरी अगर त्यांना प्राधिकृत केलेले अधिकाऱ्यांना लाठी किंवा काठी वापरण्यास परवानगी दिली असेल अशी व्यक्ती. सदरचा आदेश यात्रा, धार्मिक कार्य, लग्न विधी कार्य, अंत्यविधी कार्यास लागू होणार नाही.

ज्या लोकांना शांततेच्या मार्गाने एकत्र जमून कोणताही कार्यक्रम साजरा करावयाचा असेल त्याचवेळी पोलीस अधीक्षक, संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी, तसेच संबंधित पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरिक्षक यांची आगावू परवानगी घेतली असेल तर त्यांना सदरचा आदेश लागू होणार नाही, असे आदेशात नमूद आहे.

कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीच्या अनुषंगाने कलम 36 लागू...

सातारा जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ निवडणूक सन 2022-23 सन 2027-28 प्रक्रियेबाबत प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहिर झालेला असून या कार्यक्रमानुसार मेढा/जावळी कृषी उत्पन्न बाजार समितीची दि. 29 एप्रिल 2023 रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे.

सातारा, कराड, पाटण, कोरेगाव, वडूज, फलटण, लोणंद व वाई या कृषी उत्पन्न बाजार दि. 30 एप्रिल 2023 रोजी मतदान प्रक्रिया व दि. 1 मे 2023 रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे.

या निडणूक प्रक्रिया कालावधी दरम्यान आयोजीत केले जाणारे विविध कार्यक्रम, मिरवणूक या संबंधाने वाहनांच्या वाहतुकीचे नियमन करणे. तसेच मिरवणुकींच्या मार्गासंबंधाने व मिरवणुकीतील व्यक्तींचे वर्तन कसे असावे आणि ध्वनी प्रदूषणाच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने घातलेल्या निर्बंधाचे पालन व्हावे व लाऊडस्पीकरचा वापर योग्य प्रकारे व्हावा यासाठी समीर शेख पोलीस अधिक्षक सातारा यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 नुसार, कायदा व सुव्यवस्थेच्या बंदोबस्त कामी नेमलेल्या सर्व उप विभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, सहा. पोलीस निरीक्षक, पोलीस उप निरीक्षक यांच्यासह बंदोबस्तावरील अन्य सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना जावळी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक संबंधाने मतदान दिवशी व मतमाजणी दिवशी तसेच उर्वरित सातारा, कराड, पाटण, कोरेगाव, वडूज, फलटण, लोणंद व वाई या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दि. 30 एप्रिल 2023 रोजीची मतदान प्रक्रिया व दि. 1 मे 2023 रोजीची मतमोजणी प्रक्रिया कालावधीकरिता त्या-त्या पोलीस ठाणे हद्दितील जनतेचे स्वास्थ्य, सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहावी म्हणून व मा.सर्वोच्च न्यायालयाने घालुन दिलेल्या निर्बंधाचे यथोचित पालन व्हावे यादृष्टीने आवश्यक असणारे सर्व निर्देश देण्याचे अधिकार प्रदान केले आहेत.

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक