कराडातील ते अनाधिकृत स्पिडब्रेकर तात्काळ काढा;राष्ट्रीय महामार्ग उपविभागाकडून कराडच्या डीवायएसपीना आदेश..
कराडातील ते अनाधिकृत स्पिडब्रेकर तात्काळ काढा;राष्ट्रीय महामार्ग उपविभागाकडून कराडच्या डीवायएसपीना आदेश..
कराड दि.24 (प्रतिनिधी) गेली महिनाभर चर्चेत असलेले कराड कार्वे येथील वादग्रस्त, अनाधिकृत स्पीड ब्रेकर तात्काळ हटवण्याचे आदेश राष्ट्रीय महामार्ग उपविभागाच्या उपविभागीय अभियंता यांनी कराडच्या उपविभागीय पोलीस अधिकारी रणजीत पाटील यांना दिले आहेत. याबाबत सामाजिक कार्यकर्ते संजय चव्हाण यांनी आपले कराड ग्रुपच्या वतीने स्थानिक लोकप्रतिनिधीसह प्रशासकीय विभागाकडे हे अनधिकृत स्पीड ब्रेकर हटवण्याची वेळोवेळी मागणी केली होती. शिवाय त्या भागातील सूज्ञ नागरिकांनी फलक लावून लक्ष वेधले होते.
दरम्यान संबंधित विभागाने जरी कराड उपविभागीय पोलीस अधिकारी यांना संबंधित स्पीडब्रेकर हटवण्याचे आदेश दिले असले तरी आज मात्र ज्या ठिकाणी स्पीड बेकर बसवण्यात आले आहेत त्या दोन स्पीड बेकरच्या मधील अंतरात डांबराची खडी भरली आहे. दोन ठिकाणी चार स्प्रेडब्रेकर या ठिकाणी बसवण्यात आले आहेत. या दोन स्पीड ब्रेकरच्या मधील अंतरात डांबराची खडी टाकण्यात आली आहे त्यामुळे हे स्पीड बेकर काढण्यात येतील का नाही याबाबत शाशंकता निर्माण झाली आहे.
आज राष्ट्रीय महामार्ग उपविभागाच्या उपविभागीय अभियंता यांनी सदर स्पीड बेकर हटवण्यात यावेत असे आदेश कराडचे उपविभागीय पोलिस अधिकारी रणजीत पाटील यांना दिले. या मध्ये म्हटले आहे की पोलीस पेट्रोल पंप व पोलीस वसाहतीसमोर महामार्गावर विनापरवाना गतिरोधक आपण बसवले आहेत. या गतिरोधकाबाबत स्थानिक नागरिकांसह विविध नागरिकांच्या राष्ट्रीय महामार्ग उपविभागाकडे तक्रारी दाखल झाले आहेत. सदर गतिरोधकामुळे अपघातही झाल्याची तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
अशा स्वरूपाचे गतिरोधक महामार्गावर बसवण्यात येत नाहीत. त्यामुळे आपणाकडून या ठिकाणी बसवण्यात आलेले गतिरोधक तात्काळ काढण्याचे आदेश आहेत. असेही या आदेशात म्हटले आहे सदर आदेश उपविभागीय अभियंता पी.डी.शेडेकर यांनी आज दिले आहेत.
कराड- कार्वे रोडवरील पोलीस वसाहतीसमोर लावण्यात आलेले अनाधिकृत स्पीड बेकर हटवण्याबाबत गेली काही दिवस सोशल मीडियातून चर्चा सुरू होती. स्पीडब्रेकर हटवण्याबाबत स्थानिक प्रशासनाकडे याबाबत विचारणा करण्यात आली होती. तरीही याबाबत कोणताही निर्णय न झाल्याने आपले कराड ग्रुपच्या वतीने माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण व खा. श्रीनिवास पाटील, राष्ट्रीय महामार्ग आॅफिस, नगरपरिषद,बांधकाम विभाग यांना सदर स्पीडब्रेकर हटवण्याबाबत निवेदन देण्यात आले होते.
Comments
Post a Comment