कराड बाजार समिती निवडणूक; कपबशी व छत्रीत होणार लढत...
कराड बाजार समिती निवडणूक; कपबशी व छत्रीत होणार लढत..
कराड दि.21 (प्रतिनिधी) कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी दोन्ही पॅनलच्या वतीने उमेदवारांची यादी काल जाहिर करण्यात आली आहे. दूरंगी लढत स्पष्ट झाल्यानंतर आज चिन्ह वाटप करण्यात आले.यामध्ये शेतकरी विकास पॅनेलला छत्री तर स्व. विलासराव पाटील (काका) रयत पॅनेलला कपबशी हे चिन्ह मिळाले आहे.
या निवडणूकीत हमाल मापाडी गटातील रयत पॅनेलची एक जागा बिनविरोध झाली आहे. आता 17 जांगासाठी 34 उमेदवार रिंगणात असून बाजार समितीच्या निवडणुकीत एकूण 18 संचालक संख्या आहे. त्यामध्ये सोसायटी विभागातून 11, ग्रामपंचायत विभागातून 4, अडते व्यापारी विभागातून 2 तर हमाल मापाडी विभागातून 1 अशी एकूण 18 संचालक संख्या आहे. बाजार समितीत एकूण 4 हजार 209 सभासद बजावणार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.30 एप्रिलला मतदान होणार आहे.
Comments
Post a Comment