कराड नगरपरिषदे कडून शहरातील प्राणी प्रेमींसाठी आवाहन...
कराड नगरपरिषदे कडून शहरातील प्राणी प्रेमींसाठी आवाहन...
कराड दि.26-(प्रतिनिधी) कराड नगरपालिकेच्या वतीने सध्या शहरातील मोकाट व भटक्या कुत्र्यांची संख्या कमी करण्यासाठी वेळोवेळी निर्भीजीकरण व लसीकरण मोहीम सुरू आहे. मात्र तरीही शहरातील मोकाट कुत्र्यांची संख्या पाहता शहरातील प्राणी प्रेमी यांनी जर अशा या कुत्र्यांसाठी श्वानगृह तयार करुन किंवा दत्तक योजना राबवण्याबाबत व उपायोजना करण्याबाबत नगरपरिषदेकडून प्राणी प्रेमी साठी आव्हान करण्यात आले आहे. यासाठी मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी एक प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे.
शहरातील प्राणी प्रेमी साठी जारी केलेल्या या प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे की, कराड शहरात तसेच परिसरात आढळणारे भटके पशु व अन्य प्राणी यांचे संरक्षणासाठी चांगले काम करीत आहात. तसेच कराड नगर परिषदेमार्फत शहरातील कुत्र्यांची संख्या कमी होण्यासाठी वेळोवेळी निर्बीजीकरण व लसीकरण मोहीम हाती घेण्यात येत असते. सध्या असलेल्या शहरातील मोकाट कुत्र्यांची संख्या पाहता प्राणी प्रेमी मार्फत अशा कुत्र्यांसाठी श्वानगृह तयार करणे/दत्तक योजना प्रभावीपणे राबविणे अशा उपायोजना आपणा मार्फत राबविणे अपेक्षित आहे.
तरी आपणा मार्फत शहरातील मोकाट कुत्र्यांकरिता श्वानगृह तयार करून अशी कुत्री दत्तक घेऊन त्यांची देखभाल आपणा मार्फत झाल्यास या कुत्र्यांकडून शहरातील नागरिकांना होणारा त्रास ही कमी होण्यास मदत होणार आहे. तरी याबाबतची कारवाई आपणाकडून व्हावी अशी विनंती करण्यात आली असून या कामे अधिक माहिती करता नगर परिषदेच्या आरोग्य विभागाकडे संपर्क करण्यात यावा असेही आव्हान मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात केले आहे.
Comments
Post a Comment