कराड तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयात स्व.यशवंतराव चव्हाण यांची प्रतिमा लावा;मनसेची मागणी...
कराड तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयात 1 मे पूर्वी स्व.यशवंतराव चव्हाण यांची प्रतिमा लावा;मनसेची मागणी...
कराड दि.28-(प्रतिनिधी) अधूनिक महाराष्ट्राचे शिल्पकार व महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांची प्रतिमा कराड तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये लावण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने प्रशासनाकडे करण्यात आली आहे. तशा अशायाचे निवेदन आज उपविभागीय अधिकारी कार्यालयातील नायब तहसिलदार विजय माने यांना देण्यात आल्याची माहिती मनसे कराड शहर अध्यक्ष सागर बर्गे यांनी दिली.
प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, १ मे १९६० साली महाराष्ट्र निर्मितीचा 'मंगल कलश' आणणारे राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण साहेब हे सर्वार्थाने आदर्श नेते होते. भारताचे उपपंतप्रधान व संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमठवला आहे. कराड ही स्व. यशवंतराव चव्हाण साहेब यांची कर्मभूमी दरवर्षी राज शिष्टाचाराप्रमाणे २५ नोव्हेंबर या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री कराड येथे प्रितीसंगमावरील चव्हाण साहेबांच्या समाधीस्थळी अभिवादन करण्यासाठी येत असतात. यावरूनच स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांचे महाराष्ट्राच्या जडणघडणीतील योगदान अधोरेखीत होते. असे असताना ही कराड तालुक्यातील काही शासकीय कार्यालयामध्ये स्व. यशवंतराव चव्हाण साहेब यांची प्रतिमा (फोटो) आढळून येत नाही. याचे वैषैम्य तमाम कराडवासिय व स्व. यशवंतराव चव्हाण साहेब प्रेमी जनतेला आहे.
तरी, या निवेदनाद्वारे आपणाकडे मागणी अशी करण्यात येत आहे की, आपण व्यक्तिशः यामध्ये लक्ष घालून कराड तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयामध्ये १ मे २०२३ पूर्वी स्व. यशवंतराव चव्हाण साहेब यांची प्रतिमा तातडीने लावणेबाबतचे आदेश द्यावेत. या निवेदनावर जिल्हाध्यक्ष विकास पवार, उपजिल्हाध्यक्ष महेश जगताप, तालुका अध्यक्ष दादासो शिंगण, शहराध्यक्ष सागर बर्गे, विनायक भोसले, नितीन महाडिक यांच्या सह्या आहेत.
Comments
Post a Comment