कराड पाटण रोडवर बिबट्याची शिकार;चार वर्षाच्या मादी बिबट्याचा मृत्यु....
कराड पाटण रोडवर बिबट्याची शिकार;चार वर्षाच्या मादी बिबट्याचा मृत्यु....
कराड दि.23-(प्रतिनिधी)कराड- पाटण रोडवरील आबदारवाडी येथे शिकारीसाठी लावलेल्या फासकीत अडकून चार वर्षाच्या मादी बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत पाटण वनपरिक्षेत्रात याची नोंद करण्यात आली आहे. सदर मृत बिबट्याचे शवविच्छेधन करण्यात आले असून कमरेला बसलेल्या फासामुळे बिबट्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
याबाबत वनपरिक्षेत्र पाटण यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार कराड पाटण रोडवरील आबदारवाडी येथे पाटण वनपरिक्षेत्र हद्दीत मल्हार पेठ परिमंडळात आबदारवाडी गावच्या हद्दीत रघूनाथ शिंदे यांच्या शेतात काल सकाळी मृत अवस्थेतेत बिबट्या आढळून आल्याची माहिती संबंधित शेतकऱ्याने मल्हारपेठ पोलीस स्टेशनला दिली. त्यानंतर सपोनि भापकर यांनी ही माहिती पाटण वनपरिक्षेत्रास दिली त्यानंतर संबंधित विभागाच्या अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली
घटनास्थळी पाहणी केली असता बिबट्याच्या कमरेला फास दिसून आला. त्यामुळे सदर फासकीत अडकून बिबट्याचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. अज्ञात शिकाऱ्याने ही शिकारीची फासकी लावली होती व यामध्ये अंदाजे चार वर्ष वयाची मादी बिबट्या अडकल्याने तिचा मृत्यू झाला. सदर बिबट्याचे शिवविच्छेदन पाटण पशुधन अधिकारी पाटणे यांनी केले असून मृत बिबट्याचे अवयव सुस्थितीत असल्याची माहिती पाटण वनक्षेत्रपाल एल व्ही पोतदार यांनी दिली.
Comments
Post a Comment