Posts

Showing posts from March, 2023

देशात गेल्या 24 तासांत 3 हजार 95 नवीन कोरोना बाधितांची वाढ....

Image
  सातारा जिल्ह्यात आज 4 कोरोना बाधितांची नोंद ... कराड दि.31 (प्रतिनिधी) सातारा जिल्ह्यात आज आलेल्या आवाहलात 4 कोरोना बाधित रुग्णाची नोंद झाली आहे. यासाठी जिल्ह्यात 22 चाचण्या घेण्यात आल्या. जिल्ह्यात सध्या 25 सक्रिय (अॅक्टिव्ह) रूग्ण असून 7 रूग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत बरे झाले आहेत. तसेच सध्या 7 रूग्णावर हाॅस्पिटलमध्ये उपचार सूरू आहेत. आज   नमूने-चाचणी-22 (एकूण-26 लाख 39 हजार 577) आज बाधित वाढ- 4 (एकूण-2 लाख 80 हजार 798) आज कोरोनामुक्त- 7 (एकूण-2 लाख 74 हजार 35) आज मृत्यू- 0 (एकूण-6 हजार 728) उपचारार्थ रूग्ण-25 रूग्णालयात उपचार -7 देशात गेल्या 24 तासांत 3 हजार 95 नवीन कोरोना बाधितांची वाढ झाली आहे. दिवसभरात 14 कोरोना बाधिताचा मृत्यू झाला आहे. देशात 15 हजार 208 अॅक्टीव्ह रूग्ण आहेत.शुक्रवारी अद्ययावत केलेल्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, भारतात जवळपास सहा महिन्यांतील सर्वाधिक 3 हजार 95 ताज्या कोरोनाव्हायरस प्रकरणांची एकाच दिवसात वाढ झाली आहे, तर सक्रिय प्रकरणांची संख्या 15  हजार 208  वर पोहोचली आहे. गेल्या वर्षी 2 ऑक्टोबर रोजी एकूण 3  हजार...

आज देशात सहा महिन्यांतील सर्वाधिक 3016 ताज्या कोरोना बाधितांची वाढ....

Image
  सातारा जिल्ह्यात आज 5 कोरोना बाधितांची नोंद ... कराड दि.30 (प्रतिनिधी) सातारा जिल्ह्यात आज आलेल्या आवाहलात 5 कोरोना बाधित रुग्णाची नोंद झाली आहे. यासाठी जिल्ह्यात 101 चाचण्या घेण्यात आल्या. जिल्ह्यात सध्या 27 सक्रिय (अॅक्टिव्ह) रूग्ण असून 0 रूग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत बरे झाले आहेत. तसेच सध्या 4 रूग्णावर हाॅस्पिटलमध्ये उपचार सूरू आहेत. आज   नमूने-चाचणी-101 (एकूण-26 लाख 39 हजार 555) आज बाधित वाढ- 5 (एकूण-2 लाख 80 हजार 794) आज कोरोनामुक्त- 0 (एकूण-2 लाख 74 हजार 28) आज मृत्यू- 0 (एकूण-6 हजार 728) उपचारार्थ रूग्ण-27 रूग्णालयात उपचार -4 देशात गेल्या 24 तासांत 3 हजार 16 नवीन कोरोना बाधितांची वाढ झाली आहे. दिवसभरात 14 कोरोना बाधिताचा मृत्यू झाला आहे. देशात 13 हजार 509 अॅक्टीव्ह रूग्ण आहेत.गुरुवारी अद्ययावत केलेल्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, भारतात जवळपास सहा महिन्यांतील सर्वाधिक 3 हजार 16 ताज्या कोरोनाव्हायरस प्रकरणांची एकाच दिवसात वाढ झाली आहे, तर सक्रिय प्रकरणांची संख्या 13  हजार  509 वर पोहोचली आहे. गेल्या वर्षी 2 ऑक्टोबर रोजी एकूण 3  हजार...

देशात गेल्या 24 तासांत 2151 नवीन कोरोना बाधितांची वाढ झाली....

Image
  सातारा जिल्ह्यात आज 7 कोरोना बाधितांची नोंद ... कराड दि.29 (प्रतिनिधी) सातारा जिल्ह्यात आज आलेल्या आवाहलात 7 कोरोना बाधित रुग्णाची नोंद झाली आहे. यासाठी जिल्ह्यात 84 चाचण्या घेण्यात आल्या. जिल्ह्यात सध्या 22 सक्रिय (अॅक्टिव्ह) रूग्ण असून 2 रूग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत बरे झाले आहेत. तसेच सध्या 5 रूग्णावर हाॅस्पिटलमध्ये उपचार सूरू आहेत. नमूने-चाचणी-84 (एकूण-26 लाख 39 हजार 454) आज बाधित वाढ- 7 (एकूण-2 लाख 80 हजार 789) आज कोरोनामुक्त- 2 (एकूण-2 लाख 74 हजार 28) आज मृत्यू- 0 (एकूण-6 हजार 728) उपचारार्थ रूग्ण-22 गंभीर रुग्ण--0 रूग्णालयात उपचार -5 देशात गेल्या 24 तासांत 2151 नवीन कोरोना बाधितांची वाढ झाली आहे. दिवसभरात 7 कोरोना बाधिताचा मृत्यू झाला आहे. देशात 11 हजार 903 अॅक्टीव्ह रूग्ण आहेत. पोस्ट कोविडला घाबरण्याची गरज नाही - डॉ. चिन्मय एरम... गत काही महिन्यांपासून वातावरणातील बदलांमुळे सर्दी, ताप, खोकला अशा प्रकारचे संसर्गजन्य आजार उद्भऊ लागले आहेत. याशिवाय कोरोनाचे रुग्णही आढळून येत असल्याने पून्हा एखदा नागरिकांमध्ये काहीशी भिती-धास्ती निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. मात्र, कोविडच्...

सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई कोरोना बाधित;गृहविलगीकरणात उपचार सूरू...

Image
सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई कोरोना बाधित;गृहविलगीकरणात उपचार सूरू... कराड दि.28-(प्रतिनिधी) गेल्या पंधरा दिवसापासून सातारा जिल्ह्यात कोरोना संसर्ग झालेले रुग्ण आढळून येत असून सद्यस्थितीला जिल्ह्यात 16 रुग्ण अॅक्टिव्ह स्वरूपात आहेत, आज आलेल्या अहवालात 9 रुग्ण कोरोना बाधित आढळल्याचे अहवालात नमूद केले आहे. हा संसर्ग आता वाढू लागला असून सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनाही कोरोनाचे लागण झाली असून ते सध्या डॉक्टरांच्या सल्यानूसार उपचार घेऊन गृहविलगीकरणात आहेत.पूढे वाचा... याबाबत सातारा जिल्हावासियांसाठी त्यांनी आवाहन केले आहै की,माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी गृह विलगीकरणात डॉक्टरांकडून उपचार घेत आहे. माझी प्रकृती ठीक असून काळजी करण्याचे कारण नाही. गेल्या तीन-चार दिवसांमध्ये माझ्या प्रत्यक्ष संपर्कात आलेल्यांनी त्यांना काही लक्षणे आढळल्यास त्वरित कोविड चाचणी करून घ्यावी, ही विनंती आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन यानिमित्ताने करतो. - पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेब

डॉ. अतुल भोसले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उसळला जनसागर...

Image
  डॉ. अतुल भोसले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उसळला जनसागर... रेठरे बुद्रुक येथे अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात; विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा... रेठरे बुद्रुक, दि.28- : भारतीय जनता पार्टीचे सातारा लोकसभा प्रभारी तथा कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुलबाबा भोसले यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी रेठरे बुद्रुक येथील निवासस्थानी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा जनसागर उसळला होता.  प्रारंभी डॉ. अतुलबाबा भोसले यांनी कृष्णा हॉस्पिटल येथील सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. त्यानंतर त्यांचे रेठरे बुद्रुक येथे आगमन होताच कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात व जोरदार उत्साहात स्वागत केले. याठिकाणी डॉ. अतुलबाबा भोसले यांनी त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. गौरवी भोसले यांच्यासह श्री महादेव मंदिरात अभिषेक केला. तसेच श्री जोतिर्लिंग मंदिरात व कै. पै. मारुती कापूरकर यांच्या समाधीचे दर्शन घेऊन ते रेठरे बुद्रुक येथील निवासस्थानी आले. याठिकाणी मातोश्री सौ. उत्तरा भोसले यांनी त्यांचे औक्षण केले. त...

कोल्हापूर नाक्यावर नवीन डांबरी रस्ता करण्यास प्रारंभ;सातारा बाजूकडील वाहतूक पून्हा मूळ मार्गावरुन जाणार...

Image
कोल्हापूर नाक्यावर नवीन डांबरी रस्ता करण्यास प्रारंभ;सातारा बाजूकडील वाहतूक पून्हा मूळ मार्गावरुन जाणार... कराड दि.28-(प्रतिनिधी) पुणे-बेंगलोर महामार्गावर सहापदरीकरण अंतर्गत कराडच्या कोल्हापूर नाक्यावरील उड्डाणपूल पाडल्यानंतर आता त्या ठिकाणी नवीन डांबरी रस्ता करण्यास आज प्रारंभ झाला आहे. हॉटेल पंकज ते पादचारी पूलापर्यंत हा रस्ता उद्यापर्यंत पूर्ण केला जाणार आहे. सातारा बाजूकडून कोल्हापूर बाजूकडे जाणारी वाहतूक या डांबरी रस्त्यावरून वळवण्यात येणार आहे (सध्या ही वाहतूक पंकज समोर वळवली आहे) त्याचबरोबर कराडातून सातारा बाजूकडे जाणाऱ्या वाहनांना सध्या ढेबेवाडी फाटा इथून वळून जावे लागत होते ते आता हा रस्ता झाल्यानंतर हॉटेल संगम समोरून जाता येणार आहे. या ठिकाणी महामार्गावर वळण मार्ग तयार करण्यात येणार आहे. मात्र या मार्गातून कोणतीही वाहने अथवा नागरिकांना शहरात येता येणार नाही. कराड तालुक्यातून व कोल्हापूर बाजू कडून कराड शहरात येणारी सर्व वाहतूक पाटण तिखटने येथूनच शहरात येईल. दरम्यान कोल्हापूर नाक्यावर सध्या अलीकडे लावण्यात आलेली सर्व बॅरिगेट्स नवीन डांबरी रस्ता झाल्यानंतर त्या बाजूस आत लावण्यात...

कराडजवळ दरोड्याच्या तयारीत असणारे दहा जण जेरबंद;14 देशी बंदूका जप्त...

Image
कराडजवळ दरोड्याच्या तयारीत असणारे दहा जण जेरबंद;14 देशी बंदूका जप्त... कराड दि.28-(प्रतिनिधी) देशी बनावटीच्या बंदुकासह अन्य दरोड्याचे साहित्य घेऊन कराड जवळ दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या दहा जणांना सातारा गुन्हे अन्वेषण शाखेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेऊन 14 बंदूका, 22 जीवंत काडतूसे असा सव्वा नऊ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती सातारा जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांनी कराड येथे पत्रकार परिषदेत दिली. या टोळीत कराड परिसरातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा समावेश आहे.सनी उर्फ गणेश शिंदे (रा. ओगलेवाडी कराड), अमित हणमंत कदम (रा. अंतवडी ता. कराड) , अखिलेश सुरज नलवडे (रा. गजानन हौसिंग सोसायटी कराड),धनंजय मारुती वाटकर (रा.सैदापूर कराड), वाहीद बाबासाो मुल्ला (रा. विंग ता. कराड), रिजवान रज्जाक नदाफ (रा. मलकापूर), चेतन शाम देवकुळे (रा. बुधवार पेठ महात्मा फुलेनगर कराड), बजरंग सुरेश माने (रा. बुधवार पेठ कराड), हर्ष अनिल चंदवाणी (रा. मलकापूर), तुषार पांडूरंग शिखरे (रा. हजारमाची कराड) या दहा संशयितांना अटक करण्यात आली आहे. याबाबत शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार कराड शहरात आज पहाटे को...

देशात कोरोना संसर्ग वाढू लागला;अॅक्टीव्ह रुग्णसंख्या 10 हजार पार.....

Image
  सातारा जिल्ह्यात आज 9 बाधितांची नोंद ... कराड दि.28 (प्रतिनिधी) कोरोना संसर्ग पुन्हा वाढताना दिसू लागला आहे. देशभरात बाधितांची संख्या ही वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. सातारा जिल्ह्यातही गेल्या पंधरा दिवसापासून रुग्ण संख्या वाढू लागली आहे. सध्या अनेकांना हा संसर्ग झाला असून ते चाचणी करून न घेता वावरत आहेत. त्यामुळे कोरोना संसर्ग फैलावण्याची दाट शक्यता आहे. कोरोनाच्या सलग दोन वर्षात नागरिकांनी पुढाकार घेऊन आपल्या चाचण्या केल्याने ही साथ आटोक्यात आली होती. मात्र आता पुन्हा या साथ रोगाने तोंड वर काढल्याने अनेक नागरिक केवळ गोळ्या औषधे घेण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र व रुग्णालयात जाऊ लागले आहेत. मात्र कोरोना टेस्ट करण्यास नकार देत आहेत असल्याचे चित्र सध्या दिसू लागले आहे. दरम्यान आपणास याबाबत शंका आल्यास किंवा त्रास जाणवू लागल्यास नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात तसेच वेणुताई उपजिल्हा रुग्णालयात आपली कोरोना चाचणी करून घ्यावी जेणेकरून कोरोना संसर्ग फैलावणार नाही असे आव्हान कराड नगरपालिकेच्या नागरी आरोग्य केंद्राच्या डॉ. शीतल कुलकर्णी यांनी केले आहे. अन...

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटीच्या अध्यक्षपदी राहुल भोसले,उपाध्यक्षपदी सुदेश थोरवडे यांची निवड...

Image
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटीच्या अध्यक्षपदी राहुल भोसले,उपाध्यक्षपदी सुदेश थोरवडे यांची निवड... कराड दि.28 (प्रतिनिधी) भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटीच्या अध्यक्षपदी राहुल भोसले तर उपाध्यक्षपदी सुदेश थोरवडे यांची निवड करण्यात आली आहे. सालाबाद प्रमाणे या ही वर्षी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यासाठी तमाम आंबेडकरी जनता व तरुण कार्यकर्ते यांची नुकतीच बाबासाहेब आंबेडकर हॉल येथे बैठक घेण्यात आली या बैठकीत उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. या बैठकीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटी नव्याने तयार करण्यात आली असून त्यामध्ये अध्यक्षपदी राहुल प्रकाश भोसले तर उपाध्यक्षपदी सुदेश सुरेश थोरवडे, सचिव पदी संतोष विनायक बोलके, उपसचिव पंकज दिलीप काटरे, खजिनदार ओंकार मिलिंद थोरवडे, उपखजिनदार अभिजीत प्रमोद थोरवडे, कार्याध्यक्ष सागर शंकर लादे, उपकार्याध्यक्ष संदीप बाळू थोरवडे, प्रसिद्धी प्रमुख रोहन गौतम लादे यांची एकमताने निवड करण्यात आली. या बैठकीत किशोर आठवले यांनी प्रास्तावित केले. निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे बैठक...

कोयना धरणग्रस्तांच्या प्रश्नाबाबत एक महिन्यात मुख्यमंत्री महोदयां सोबत बैठक लावणार-पालकमंत्री शंभूराज देसाई...

Image
कोयना धरणग्रस्तांच्या प्रश्नाबाबत एक महिन्यात मुख्यमंत्री महोदयां सोबत बैठक लावणार-पालकमंत्री शंभूराज देसाई... सातारा दि.27 कोयना धरणग्रस्तांच्या प्रश्नाबाबत मुख्यमंत्री महोदयांसोबत एक महिन्याच्या आत बैठक लावणार असल्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले. या प्रश्नाबाबत सुरू असलेले आंदोलन स्थगित करावे, असे आवाहनही पालकमंत्री यांनी केले. या विषयी कोयनानगर येथे आंदोलक व प्रशासकीय अधिकारी यांची  बैठक संपन्न झाली. त्यावेळी पालकमंत्री  देसाई बोलत होते.  या बैठकीस श्रमिक मुक्ती दलाचे भारत पाटणकर, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, पाटणचे प्रांताधिकारी सुनील गाडे, तहसीलदार रमेश जाधव, पुनर्वसनचे तहसीलदार विवेक जाधव, सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता संजय डोईफोडे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.  कोयना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न लवकरात लवकर व कायमस्वरूपी सोडवणे हा शासनाचा उद्देश असल्याचे सांगून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, हा प्रश्न सोडवण्यासाठी एक साचेबद्ध आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्या दृष्टीने प्रशासनाने काम सुरू केल...

'कृष्णा'ला सहकारातील वैभवशाली कारखाना बनविण्यासाठी प्रयत्नशील : डॉ. अतुल भोसले...

Image
  कृष्णा कारखान्याच्या गळीत हंगाम सांगता समारंभात ऊस तोडणी वाहतूकदार यांचा सत्कार करताना डॉ. अतुल भोसले, उपाध्यक्ष जगदीश जगताप व मान्यवर संचालक... 'कृष्णा'ला सहकारातील वैभवशाली कारखाना बनविण्यासाठी प्रयत्नशील : डॉ. अतुल भोसले... गळीत हंगामाची सांगता; 10 लाख 60 हजार मे. टन गाळप... शिवनगर दि.26- : येत्या गळीत हंगामात उसाच्या नोंदीपासून ते ऊस गाळप होईपर्यंत चांगले नियोजन करून शेतकऱ्यांना अधिक चांगला दर द्यायचा आमचा प्रयत्न आहे. कृष्णा कारखान्याला सहकारातील एक वैभवशाली कारखाना बनविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे प्रतिपादन कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले यांनी केले. य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२२-२३ च्या ६३ व्या गळीत हंगाम सांगता समारंभात ते बोलत होते. प्रारंभी संचालक बाबासो शिंदे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. सुमन शिंदे यांच्या हस्ते गळीत हंगाम समाप्तीनिमित्त श्री सत्यनारायण पूजा संपन्न झाली. यावेळी व्हा. चेअरमन जगदीश जगताप, संचालक जितेंद्र पाटील, संजय पाटील, जे डी मोरे, बाजीराव निकम, बाबासो शिंदे, सयाजी यादव, विलास भंडारे, शिवाजी पाटील, वसंतराव शिंद...

डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन...

Image
  डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन... रेठरे बुद्रुक येथे मंगळवारी अभिष्टचिंतन सोहळा; शुभेच्छा स्वरूपात शालेपयोगी साहित्य देण्याचे आवाहन.... कराड दि.26 : भारतीय जनता पार्टीचे सातारा लोकसभा प्रभारी तथा कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुलबाबा भोसले यांचा वाढदिवस मंगळवार दि. २८ मार्च रोजी साजरा होत आहे. यानिमित्त २७ मार्च ते ९ एप्रिलपर्यंत भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, मंगळवारी (ता. २८) डॉ. अतुलबाबा भोसले हे सकाळी ८ पासून रेठरे बुद्रुक इंजिन पाणंद येथील निवासस्थानी शुभेच्छा स्वीकारण्यासाठी उपस्थित राहणार असून; नागरिकांनी हार, तुरे, बुके न आणता शालेपयोगी साहित्य शुभेच्छा स्वरूपात आणावे, असे आवाहन वाढदिवस संयोजन समितीच्यावतीने करण्यात आले आहे. डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त कराड दक्षिण मतदारसंघात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सोमवार दि. २७ मार्च रोजी शेरे येथे सायंकाळी ७ वाजता प्रा. श्रीधर साळुंखे यांचे व्याख्यान, २८ मार्च रोजी सकाळी ९ वाजता रिमांड होम येथे भोजन वाटप, सकाळी ९.३० वाजता कराड उपजिल्हा रुग्णा...

आ. बाळासाहेब पाटील यांच्या प्रयत्नाने टेंभू गावासाठी 'क' वर्ग पर्यटनस्थळ मधून 60 लाखांचा निधी मंजूर...

Image
  आ. बाळासाहेब पाटील यांच्या प्रयत्नाने टेंभू गावासाठी 'क' वर्ग पर्यटनस्थळ मधून 60 लाखांचा निधी मंजूर... कराड दि.25- माजी मंत्री व कराड उत्तरचे विद्यमान आ. बाळासाहेब पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने क वर्ग पर्यटनस्थळ  (डि.पी.सी.) मधून टेंभू गावासाठी ६० लाख रूपये निधी मंजूर झाला आहे. हे गांव कृष्णानदी तीरावर वसलेले असून थोर समाज सुधारक गोपाळ गणेश आगरकर यांचे जन्मगांव आहे. त्याचप्रमाणे या गावाशेजारी कृष्णानदीवर टेंभू उपसा जलसिंचनचा मोठा प्रकल्प कार्यान्वीत आहे. या प्रकल्पामुळे सांगली जिल्ह्यामधील खानापूर, आटपाडीसह सोलापूर जिल्ह्यातील सांगोला या तालुक्यातील गावांना शेती सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारा असल्याने या गावचे महत्व अनन्य साधारण आहे. टेंभू गावास आ.बाळासाहेब पाटील यांनी विशेष प्रयत्न करून 'क' वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा प्राप्त करून घेतला आहे. त्यामुळे या गावामध्ये सबंध महाराष्ट्रासह परराज्यातून पर्यटक येत असतात. त्यांना नागरी सुविधा मिळणेबाबत ग्रामपंचायत टेंभू व ग्रामस्थ यांची सातत्याने आ. पाटील यांच्याकडे मागणी होती. त्यास अनुसरून या गावातील अंतर्गत रस्ते क...

सह्याद्रित 48 वर्षीय डॉक्टरवर एकाच वेळी तीन शस्त्रक्रिया...

Image
सह्याद्रित 48 वर्षीय डॉक्टरवर एकाच वेळी तीन शस्त्रक्रिया... एकाच वेळेस एर्ओटिक वॉल्व्ह रिप्लेसमेंट, बायपास शस्त्रक्रिया, जिवंत दात्याकडून यकृत प्रत्यारोपण... सह्याद्रि हॉस्पिटल मधील मल्टीडिसीप्लिनरी टीमचे यश...  कराड दि.25 : सह्याद्रि हॉस्पिटल डेक्कन, पुणे येथील मल्टीडिसीप्लिनरी टीमने तीन शस्त्रक्रिया एकाच दिवशी यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत. यामध्ये एकदाच भूल देऊन एर्ओटिक वॉल्व्ह रिप्लेसमेंट (एव्हीआर), बायपास शस्त्रक्रिया (सीएबीजी), त्यानंतर जिवंत दात्याद्वारे यकृत प्रत्यारोपण करण्यात आले. दीर्घकालीन यकृताचा आजार, यकृताचा कर्करोग आणि हृदयाच्या रक्तवाहिन्यांचा विकारांसह अनेक गुंतागुंती असलेल्या 48 वर्षीय पुरूष रूग्णावर या प्रक्रिया करण्यात आल्या. अशा प्रकारे या तिन्ही प्रक्रिया एकाच वेळी करण्यात आल्याची नोंद कोणत्याही अहवालात उपलब्ध नाही. अशी माहिती शस्रक्रिया करणार्‍या डाॅक्टरांनी पत्रकार परिषदेत दिली. सह्याद्रि हॉस्पिटलच्या अवयव प्रत्यारोपण व हेपॅटोबिलिअरी शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख डॉ.बिपिन विभूते, हृदयरोग तज्ञ डॉ.सुहास हरदास, भूलतज्ञ मनीष पाठक,  कराड येथील गॅस्ट्रोएंटेरॉ...

राहूल गांधी यांच्यावरील कारवाई;कराडात यूवक काॅंग्रेसची मूक निदर्शने....

Image
राहूल गांधी यांच्यावरील कारवाई;कराडात यूवक काॅंग्रेसची मूक निदर्शने.... कराड दि.25-भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते खा. राहुल गांधी यांना सुरत कोर्टाने सुनावलेली शिक्षा व लोकसभेतून त्यांचे रद्द केलेले सदस्यत्व या चुकीच्या कारवाई विरोधात आज कराडत युवक काँग्रेसच्या वतीने कोल्हापूर नाका येथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर मुख निदर्शने करण्यात आली. यावेळी युवक काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून हातात बॅनर, झेंडे घेऊन गांधीजींच्या पुतळ्यासमोर बसून मूक निदर्शने केली. आज संपूर्ण देशभरात राहुल गांधी यांच्यावर झालेल्या या कारवाईच्या निषेधार्थ आंदोलन केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कराडात हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनात युवक काँग्रेस कराड दक्षिणच अध्यक्ष दिग्विजय पाटील, दिग्विजय सूर्यवंशी, देवदास माळी, देवदास माने, अमित जाधव, राहुल पवार, अभिजीत पाटील, विक्रम पाटील, मुकुंद पाटील, अमोल नलवडे, शोहेब मुल्ला, धनराज शिंदे, विवेक चव्हाण, मयूर पाटील, जमाले, वैभव थोरात,भगवान सूतार,शब्बीर मूजावर,चेतन पाटील, विठ्ठल हूलवान, राम मोहिते, संग्राम काळभोर, डा...

एकाच दिवशी 75 हजार लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी शासकीय योजनांच्या जत्रेचे आयोजन-जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी...

Image
  एकाच दिवशी 75 हजार लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी शासकीय योजनांच्या जत्रेचे आयोजन-जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी... सातारा, दि. 24 : शासनाच्या विविध विभागांमार्फत राबवण्यात  येणाऱ्या योजनांचा एकाच दिवशी किमान 75 हजार लाभार्थ्याना लाभ देण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांच्या संकल्पनेतून शासकीय योजनांच्या जत्रेचा कार्यक्रम सातारा जिल्ह्यात संपन्न होणार असल्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात शासकीय योजनांची जत्रा या विषयी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याबैठकीमध्ये जिल्हाधिकारी जयवंशी यांनी या जत्रे विषयी माहिती देताना याच्या आयोजनाबाबत सर्व संबंधित विभागांनी करावयाच्या कार्यवाहीबाबत सूचना दिल्या.यावेळी पोलीस अधिक्षक समीर शेख, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते. सर्व विभागांनी शासकीय योजनांची जत्रा हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी मिशन मोडवर काम करावे अशा सूचना करून जिल्हाधिकारी जयवंशी म्हणाले, शासकीय योजना सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. यामध्ये कृषि, मह...

कराड-मलकापूरच्या स्वच्छ पाण्यासाठी आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत उठविला आवाज...

Image
कराड व मलकापूरच्या स्वच्छ पाण्यासाठी आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत उठविला आवाज... कराड दि.23-टेंभू योजनेच्या बंधार्‍यामुळे बॅक वॉटरची फुग कराड शहर ते वारुंजी पर्यंत असते. हे पाणी वेळच्यावेळी उपसले जात नसल्याने त्या ठिकाणी खड्डा पडतो व पाणी तिथेच अडकून राहते. तसेच कराड व मलकापूर शहराचे सांडपाणी याच ठिकाणी सोडले जाते. वारुंजी जवळील भागात मलकापूर व कराड नगरपालिका नदीतील पाणी उपसा करीत असते. पण दोन्ही शहराचे सोडलेल्या सांडपाण्यामुळे  व टेंभूचे पाणी वेळच्यावेळी उपसले जात नसल्याने शहराला स्वच्छ पाणी मिळत नाही व काही वेळेला रोगराई सुद्धा पसरते, पुराच्या वेळी पाणी अत्यंत खराब येत असल्याचे दिसते यामुळे वारुंजी येथे बंधार्‍याचे काम सुरू आहे ते जलद गतीने पूर्ण केले जावे जेणेकरून कोयना नदीचे स्वच्छ पाणी नगरपालिकेकडून उचलले जाईल व ते पाणी दोन्ही शहरांना मिळेल. तसेच टेंभू योजनेच्या फुगीचे पाणी वारुंजी बंधार्‍याच्या पुढे अडविले जाईल. असा कराड शहरासाठी महत्वाचा प्रश्न आज विधानसभेतील चर्चेत माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला. तसेच टेंभू योजनेमध्ये अनेक शेतकर्‍यांच्या जमिन...

जयवंत शुगर्सच्या 12 व्या गळीत हंगामाची उत्साहात सांगता...

Image
जयवंत शुगर्सच्या 12 व्या गळीत हंगामाची उत्साहात सांगता... 123 दिवसांत 6,33,207 मेट्रीक टन ऊसगाळप; 7,04,700 क्विंटल साखरेचे उत्पादन... कराड, दि.22- धावरवाडी (ता. कराड) येथील जयवंत शुगर्स लिमिटेडच्या १२ व्या गळीत हंगामाची उत्साहात सांगता झाली. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात श्री. विनायक भोसले यांच्या हस्ते ऊसतोडणी वाहतूकदारांचा सत्कार करण्यात आला. धावरवाडी येथील जयवंत शुगर्सने संस्थापक डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाच्या एकूण १२३ दिवसांच्या गळीत हंगामात ६ लाख ३३ हजार २०७ मेट्रीक टन ऊस गाळप केले असून, ७ लाख ४ हजार ७०० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. तर सरासरी साखर उतारा १२.४९ टक्के इतका राहिलेला आहे. हंगाम सांगता सोहळ्याच्या निमित्ताने कारखाना कार्यस्थळावर आयोजित कार्यक्रमात सर्वाधिक ऊसवाहतूक करणार्‍या तोडणी वाहतूकदारांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये कृष्णा काशीद, नवनाथ आरसुळ, भाऊसाहेब काशीद, बजरंग धोत्रे, अशोक पवार, किशोर मुळक, संतोष ढाकणे, सुंदर पोळ, हनुमान भिगले, बाबू शेंबडे या तोडणी वाहतूकदारांचा सत्कार करण्यात आला.  प्रारंभी कारखान्यातील मिल फिटर ...

राजकीय टोलवा-टोलवीमध्ये कराड-चिपळूण रेल्वे मार्ग बारगळू नये;आ. पृथ्वीराज चव्हाण...

Image
  राजकीय टोलवा-टोलवीमध्ये कराड-चिपळूण रेल्वे मार्ग बारगळू नये;आ. पृथ्वीराज चव्हाण... माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांची विधानसभेत लक्षवेधी सूचनेद्वारे मागणी;प्रकल्प मार्गी लावण्यासाठी विशेष बैठकीचे मंत्र्यांचे आश्वासन... कराड दि.21: कोकण व पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या कराड-चिपळूण रेल्वे मार्ग राजकीय टोलवा-टोलवीमध्ये बारगळू नये तसेच या प्रकल्पाचे भूमिपूजन तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केले होते, शासकीय प्रक्रिया पूर्ण झाली असतानाच भूमिपूजन होत असते तरीसुद्धा हा प्रकल्प कसा काय बारगळला? यामुळे कराड-चिपळूण रेल्वे प्रकल्पासाठी आर्थिक तरतूद केली जावी व हा प्रकल्प तात्काळ मार्गी लागावा अशी मागणी आज विधानसभेत माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे केली. अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र व कोकण या दोन विभागांना जोडणारा रेल्वे मार्ग कराड ते चिपळूण या प्रकल्पाची संकल्पना अनेक वर्षे चर्चेमध्ये आहे. तत्कालीन आघाडी सरकारने प्रकल्पाच्या खर्चामध्ये रेल्वे व राज्य सरकार ५० -५० टक्के वाटा घेणार अशी भ...

माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांचा वाढदिवस प्रेरणा दिन म्हणून कार्यकर्त्यांकडून साजरा...

Image
  माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांचा वाढदिवस प्रेरणा दिन म्हणून कार्यकर्त्यांकडून साजरा... सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कला अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या आ. पृथ्वीराज चव्हाण यांना शुभेच्छा... कराड  दि.19- माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आ. बाबांना वाढदिनी प्रत्यक्ष भेटून व दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. मल्लिकार्जुन खर्गे, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भुपिंदरसिंह हुड्डा, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विरोधी पक्षनेते अजित पवार, खा. सुप्रिया सुळे, खा. प्रफुल्ल पटेल, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, राज्याचे काँग्रेस गटनेते बाळासाहेब थोरात, विधानपरिषद गटनेते सतेज पाटील, माजी मंत्री यशोमती ठाकूर, नितीन राऊत, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले, वर्षा गायकवाड, माजी मंत्री राजेश टोपे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, खा. श्रीनिवास पाटील, आ. बाळासाहेब...

महामार्गावरील वाहतूक वळवली;मलकापूर हद्दीतील छोटा भराव पूल पाडणार...

Image
  महामार्गावरील वाहतूक वळवली;मलकापूर हद्दीतील छोटा भराव पूल पाडणार... कराड दि.18-(प्रतिनिधी) पुणे बेंगलोर महामार्गावरील मलकापूर नजीकचा आणखी एक छोटा पाचशे मीटरचा भरावाचा पूल उद्यापासून पाडण्यास सुरुवात करण्यात येणार असल्याने कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक मलकापूर पुलावरून डाव्या सर्व्हिस रस्त्यावरून गंधर्व हॉटेल समोरून वळवण्यात आली आहे. ही संपूर्ण वाहतूक महामार्गावर मलकापूर हद्दीत साई ट्रेडर्स समोरून पुन्हा हायवेवर येऊन पुढे कोल्हापूर बाजूला वाहने जातील तर कोल्हापूरहून येणारी व  सातारा बाजूकडे जाणारी वाहने ही हॉटेल आसरा येथे सर्विस रोडने पुढे जातील व कोयना औद्योगिक वसाहती समोरून मलकापूर पुलावरून पुढे मार्गक्रमण करतील. दरम्यान मलकापूरसह परिसरातील नागरिकांनी कोल्हापूर बाजूला म्हणजेच डाव्या बाजूला पुढे जाण्यासाठी सर्विस रस्त्यावर प्रवास करण्यासाठी अन्य वाहनांची वाट पाहत उभे राहू नये व वाहनचालकांनी मलकापूर फाटा ते मळाई देवी पतसंस्था या दरम्यानचा डाव्या बाजूचा सर्विस रस्ता कमीत कमी वापरावा. जखिणवाडी नांदलापूर या परिसरातून उलट दिशेने या सर्विस रस्त्याने कोणीही वाहनचालकांनी प्रवास करू नये...

आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त कुस्ती मैदान ; शंभरहून अधिक चित्तथरारक कुस्त्या...

Image
  अक्षय मोहिते विरूद्ध मनीष रायते यांच्यातील लढत बरोबरीत... आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त कुस्ती मैदान ; शंभरहून अधिक चित्तथरारक कुस्त्या... कराड 18- माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त काल कराड येथील बैलबाजार मैदानात झालेल्या निकाली कुस्त्यांच्या जंगी मैदानात प्रथम क्रमांकाच्या अक्षय मोहिते विरूद्ध मनीष रायते यांच्यातील कुस्तीत बराच वेळ घमासान झाले. कुस्ती निकाली होत नसल्याने पंचांनी अखेरीस ती बरोबरीत सोडवली. माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त अधिकराव चव्हाण, युवा नेते इंद्रजीत चव्हाण व राहुल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या बैल बाजारात काल झाले. मैदानात शंभरहून अधिक चिमुकल्या मल्लांसह अनेक नामांकित पैलवानांनी चित्तथरारक कुस्त्या केल्याने शौकिनांच्या डोळ्याचे पारणे फिटले. आ. पृथ्वीराज चव्हाण, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस उदयसिंह पाटील - उंडाळकर, अजितराव पाटील - चिखलीकर, प्रा. धनाजी काटकर, कराड दक्षिण काँग्रेसचे अध्यक...

बेलवडे बुद्रुक येथिल मोफत दंत तपासणी शिबिरास मोठा प्रतिसाद...

Image
  बेलवडे बुद्रुक येथिल मोफत दंत तपासणी शिबिरास मोठा प्रतिसाद... कराड दि.17-भारतीय जनता पार्टीचे लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात विविध समाज उपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत आज बेलवडे बुद्रुक येथे मोफत दंत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला. कृष्णा दंत महाविद्यालय डिपार्टमेंट ऑफ पेरियोडाॅन्टोलाॅजीचे यावेळी मोठं सहकार्य मिळाले. यावेळी बोलताना कृष्णा सहकारी बँकेचे संचालक हर्षवर्धन मोहिते म्हणाले की, आमचे नेते डॉ.अतुल भोसले बाबा यांच्या वाढदिवसानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये आज बेलवडे बुद्रूक येथे मोफत दंत तपासणी शिबिर संपन्न झाले. या शिबिराला गावातील व परिसरातील ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.पूढे ही असे सामाजिक उपक्रम राबवणार आहोत. दरम्यान आज हर्षवर्धन मोहिते (आण्णा ) यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला असून हे शिबिर शांततेत पार पडले. या प्रसंगी डाँ गिरीश सुरगीमठ, डाँ समीर झोपे, डाॅ. वैशाली मासाळ, डाॅ. अपुर्वा...

इन्फल्यूएंझा ए (H3 N2) विषयी खबरदारी घेण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन...

Image
  इन्फल्यूएंझा ए (H3 N2) विषयी खबरदारी घेण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन... सातारा दि. 17 – सध्या राज्यात फ्लु अर्थात एच 3 एन 2 या इन्फल्यूएंझाची साथ आहे. इन्फल्युएंझा आजार विषाणुमुळे होणारा आजार आहे. तातडीने उपचार सुरु केल्यास आजार लवकर बरा होण्यास मदत होते. त्यामुळे लक्षणे आढळल्यास वेळीच उपचार सुरु करावेत. या आजाराविषयी नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे. आजाराची लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत - ताप, घसादुखी, घशाला खवखव, खोकला , नाक गळणे, अंगदुखी, डोकेदुखी, बालरुग्णांमध्ये सौम्य व मध्यम स्वरुपाचा ताप आढळतो, घसादुखी असणऱ्या बाळांमध्ये तोंडातून अतीप्रमाणात लाळ गळताना आढळते, काही रुग्णांना जुलाब व उलटया होतात. लक्षणानुसार रुग्णांची पुढीलप्रमाणे वर्गवारी करण्यात येते. वर्गवारी अ – लक्षणे - सौम्य ताप ( 38 अंश सेल्सिअस पेक्षा कमी ) खोकला, घशाला खवखव, अंगदुखी, डोकेदुखी, जुलाब, उलटया. यावर पुढीलप्रमाणे उपाययोजनाकराव्यात स्वॅबची आवश्यकता नाही. घरच्याघरी विलगीकरण करावे. 24 ते 48 तासामध्ये लक्षणे वाढलेस ऑसेल्टामीवीर सुरु करावी. वर्गवारी ब – लक्षणे - वर...