कोल्हापूर नाक्यावर नवीन डांबरी रस्ता करण्यास प्रारंभ;सातारा बाजूकडील वाहतूक पून्हा मूळ मार्गावरुन जाणार...
कोल्हापूर नाक्यावर नवीन डांबरी रस्ता करण्यास प्रारंभ;सातारा बाजूकडील वाहतूक पून्हा मूळ मार्गावरुन जाणार...
कराड दि.28-(प्रतिनिधी) पुणे-बेंगलोर महामार्गावर सहापदरीकरण अंतर्गत कराडच्या कोल्हापूर नाक्यावरील उड्डाणपूल पाडल्यानंतर आता त्या ठिकाणी नवीन डांबरी रस्ता करण्यास आज प्रारंभ झाला आहे. हॉटेल पंकज ते पादचारी पूलापर्यंत हा रस्ता उद्यापर्यंत पूर्ण केला जाणार आहे. सातारा बाजूकडून कोल्हापूर बाजूकडे जाणारी वाहतूक या डांबरी रस्त्यावरून वळवण्यात येणार आहे (सध्या ही वाहतूक पंकज समोर वळवली आहे) त्याचबरोबर कराडातून सातारा बाजूकडे जाणाऱ्या वाहनांना सध्या ढेबेवाडी फाटा इथून वळून जावे लागत होते ते आता हा रस्ता झाल्यानंतर हॉटेल संगम समोरून जाता येणार आहे. या ठिकाणी महामार्गावर वळण मार्ग तयार करण्यात येणार आहे. मात्र या मार्गातून कोणतीही वाहने अथवा नागरिकांना शहरात येता येणार नाही. कराड तालुक्यातून व कोल्हापूर बाजू कडून कराड शहरात येणारी सर्व वाहतूक पाटण तिखटने येथूनच शहरात येईल.
दरम्यान कोल्हापूर नाक्यावर सध्या अलीकडे लावण्यात आलेली सर्व बॅरिगेट्स नवीन डांबरी रस्ता झाल्यानंतर त्या बाजूस आत लावण्यात येतील व पलीकडे महामार्गावर असणारी बॅरिगेट्स आणखी महामार्गावर लावण्यात येऊन नवीन उड्डाणपुलाच्या कामास प्रारंभ केला जाणार आहे. याचबरोबर मलकापूर भराव पूल पाडण्या कमी वाहतूक वळवण्याबाबत आणखी एकदा चाचणी घेण्यात येणार असून पुढील आठवड्यात हा भराव पूल पाडण्याचे काम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती डी पी जैन कंपनीच्यावतीने देण्यात आली....पूढे वाचा...
सध्या साडेतीन किलोमीटरच्या नवीन उड्डाणपुलाच्या कामांतर्गत हॉटेल पंकज ते लोटस फर्निचर दरम्यान ठीक ठिकाणी काम सुरू असून रिलायन्स पंपासमोर या पुलाच्या पिलर क्रमांक 22 साठी खुदाई करण्यात आली आहे. या ठिकाणी कॉलम टाकल्यानंतर पिलर उभा राहणार आहे. पूलासाठी एकूण 92 पीलर उभे केले जाणार आहेत. त्याचबरोबर मलकापूर हद्दीतीलच आणखी एक भराव पूल पाडण्याचे काम सध्या सुरू आहे. यासह पेठ नाका ते शेंद्रे यादरम्यान कराड शहर व तालुका हद्दीतील महामार्गावर ठिकठिकाणी सहापदरीकरण कामाच्या कामास गती आली आहे. अनेक ठिकाणी झाडे तोडून त्या ठिकाणी दुभाजक गटर व अन्य रस्ते करण्याचे काम सुरू आहे.
Comments
Post a Comment