सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई कोरोना बाधित;गृहविलगीकरणात उपचार सूरू...
सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई कोरोना बाधित;गृहविलगीकरणात उपचार सूरू...
कराड दि.28-(प्रतिनिधी) गेल्या पंधरा दिवसापासून सातारा जिल्ह्यात कोरोना संसर्ग झालेले रुग्ण आढळून येत असून सद्यस्थितीला जिल्ह्यात 16 रुग्ण अॅक्टिव्ह स्वरूपात आहेत, आज आलेल्या अहवालात 9 रुग्ण कोरोना बाधित आढळल्याचे अहवालात नमूद केले आहे. हा संसर्ग आता वाढू लागला असून सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनाही कोरोनाचे लागण झाली असून ते सध्या डॉक्टरांच्या सल्यानूसार उपचार घेऊन गृहविलगीकरणात आहेत.पूढे वाचा...
याबाबत सातारा जिल्हावासियांसाठी त्यांनी आवाहन केले आहै की,माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी गृह विलगीकरणात डॉक्टरांकडून उपचार घेत आहे. माझी प्रकृती ठीक असून काळजी करण्याचे कारण नाही. गेल्या तीन-चार दिवसांमध्ये माझ्या प्रत्यक्ष संपर्कात आलेल्यांनी त्यांना काही लक्षणे आढळल्यास त्वरित कोविड चाचणी करून घ्यावी, ही विनंती आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन यानिमित्ताने करतो.
- पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेब
Comments
Post a Comment