आज देशात सहा महिन्यांतील सर्वाधिक 3016 ताज्या कोरोना बाधितांची वाढ....
सातारा जिल्ह्यात आज 5 कोरोना बाधितांची नोंद ...
कराड दि.30 (प्रतिनिधी) सातारा जिल्ह्यात आज आलेल्या आवाहलात 5 कोरोना बाधित रुग्णाची नोंद झाली आहे. यासाठी जिल्ह्यात 101 चाचण्या घेण्यात आल्या. जिल्ह्यात सध्या 27 सक्रिय (अॅक्टिव्ह) रूग्ण असून 0 रूग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत बरे झाले आहेत. तसेच सध्या 4 रूग्णावर हाॅस्पिटलमध्ये उपचार सूरू आहेत.
आज नमूने-चाचणी-101 (एकूण-26 लाख 39 हजार 555)
आज बाधित वाढ- 5 (एकूण-2 लाख 80 हजार 794)
आज कोरोनामुक्त- 0 (एकूण-2 लाख 74 हजार 28)
आज मृत्यू- 0 (एकूण-6 हजार 728)
उपचारार्थ रूग्ण-27
रूग्णालयात उपचार -4
देशात गेल्या 24 तासांत 3 हजार 16 नवीन कोरोना बाधितांची वाढ झाली आहे. दिवसभरात 14 कोरोना बाधिताचा मृत्यू झाला आहे. देशात 13 हजार 509 अॅक्टीव्ह रूग्ण आहेत.गुरुवारी अद्ययावत केलेल्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, भारतात जवळपास सहा महिन्यांतील सर्वाधिक 3 हजार 16 ताज्या कोरोनाव्हायरस प्रकरणांची एकाच दिवसात वाढ झाली आहे, तर सक्रिय प्रकरणांची संख्या 13 हजार 509 वर पोहोचली आहे. गेल्या वर्षी 2 ऑक्टोबर रोजी एकूण 3 हजार 375 कोरोना बाधितांची नोंद झाली होती.

Comments
Post a Comment